संकष्ट चतुर्थी

संकष्ट चतुर्थी

हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात.[1] एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो.[2]गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्त्वाचा भाग आहे.
 दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्री गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडायचे अशी या व्रताची थोडक्यात पाळणूक आहे. श्री संकष्ट हर गणपती हे या व्रताच्या देवतेचे नाव आहे. हे व्रत करणाऱ्या स्त्रियागर पुरुषांनी व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी किंवा अंगारकी चतुर्थी नंतर जी पहिली संकष्टी चतुर्थी येईल,त्या दिवसापासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता. सतत 21 संकष्ट करून व्रताचे उद्यापन करावे. काही जण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेक जण सतत संकष्टीचा उपवास करतात. संकष्टी करणाऱ्यांनी उपवास सोडण्यापूर्वी नेहमी संकष्टी चतुर्थी महात्मे अवश्य वाचावे. संकष्ट चतुर्थीचे व्रत करणाऱ्याने त्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी. दिवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा. शक्यतेनुसार उपवासात चालणारे पदार्थ खावे. दिवसभर आपला उद्योग धंदा करावा. संध्याकाळी रात्री आवश्यक वाटल्यास आंघोळ करावी, नंतर पुजा कशी करायची .हे मी पुढे पोस्ट मध्ये सांगितल आहे. तत्पूर्वी संकष्टी चतुर्थी एक व्रत आहे. ते पुरुष व स्त्री दोघांनी करायचे असते. हे व्रत दोन प्रकारे करतात.
1. एक मिठाची संकष्ट चतुर्थी 
2. एक पंचामृति चतुर्थी
 दिवसभर उपवास करून. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे. त्यानंतर भोजन करावे. या व्रतात काल आमरण 21 वर्ष किंवा एक वर्ष असा आहे. व्रतराज ग्रंथात हे व्रत सांगितलेले आहे. या दिवशी भावी  उपवास करतात. श्री गणेशाच्या प्रार्थनेपूर्वी चंद्राचे दर्शन शुभ दर्शन घेतल्यानंतर ते रात्री उपवास सोडतात. चंद्रप्रकाश यापूर्वी गणपतीच्या आशीर्वादासाठी गणपती अथर्वशीर्षाचे पठण केले जाते. तर हे व्रत आणि या दिवशी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी पूजा करायची याची माहिती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची पूजा कशी करावी
 नमस्कार मी प्रियंका तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे. सर्वप्रथम पाठ घेऊन त्या भोवती रांगोळी काढून घ्यावी. तर या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करायचा आहे. रोजची देवपूजा करून घ्यायचे आहे. आपण जिथे पूजा मांडणार आहोत, ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तुम्ही ही पूजा संध्याकाळी ही करू शकता, किंवा सकाळीही करू शकता. तर इथे चौरंगावरती मी एक लाल कपडा अंथरलेला आहे. आता त्याचबरोबर आपण काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊया.

साहित्य
1.दोन पाठ 2. एक तांब्या  3.हळद-कुंकू 4.तांदूळ 5.पंचामृत 6.कापसाचे वस्त्र माळ7. मोत्यांची माळ 8.ध्रुवांची पेंडी 9. जास्वंदीचे फुलं  10.हळद कुंकू 11.लाल फुले 12.चंदन  13.गूळ खोबरे चा नैवेद्य 14.अक्षदा  15.कापूर  16.अगरबत्ती  17. माचिस  18.पाणी 19. एक ताम्हण 20.दूध तूप मध साखर यांचा पंचामृत इत्यादी...

 एक पाठ आपल्याला बसण्यासाठी घ्यायचा आहे. आणि एक पाठ गणेशाच्या पूजनासाठी घ्यायचा आहे. तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यावे. हळद-कुंकू घेतलेला आहे. तांदूळ घेतलेले आहे. इथे मी पंचामृत बनवून घेतलेला आहे. कापसाचे वस्त्रमाळ घेतलेली आहे. जाणव घेतलेले आहे. मोत्यांची माळ घेतलेली आहे. 21 दुर्वांचा एक दुर्वांची पेंडी बनवलेली आहे. जास्वंदीची फुले घेतलेली आहेत. इथे लाल फुले ही चालू शकतात. चंदन घेतलेला आहे. हळदी कुंकू लावलेला. अक्षदा घेतलेले आहेत. गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे. आरती करण्यासाठी कापूर घेतलेला आहे. माचीस अगरबत्ती घ्यायची आहे. तर इथे मी पंचामृत बनवून घेतलेला आहे. श्री गणेशाला अभिषेक करण्यासाठी आणि प्रसाद म्हणूनही या पंचामृताचा आपण वापर करणार आहोत, तर याच्यामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर इत्यादी साहित्य वापरलेला आहे. आणि नैवेद्यासाठी तुम्ही फळ घेतलेले आहेत. तरी ते नैवेद्यासाठी आपण 21 मोदकांचा वापर करायचा आहे. त्या दिवशी पेढे किंवा लाडू घेऊ शकतात. तर इथे मी एक वस्त्र घेतलेला आहे. देवबाप्पांना पुसण्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे. तुमच्याकडे जशी मूर्ती असेल चांदीची पितळेची ती तुम्ही इथे वापरू शकता. किती थोडसं साहित्य कमी जास्त असलं तरीही चालू शकत. मनोभावी फक्त पूजा करावी.

संकष्टी विशेष बाप्पाची पुजा
तर यानंतर देवासमोर बसून प्रथम आचमन करायचा आहे. देव मूर्तीचे मूक पूर्वेस किंवा पश्चिमेस असावे. म्हणजे देवा समोर बसल्यास आपले मुक पश्चिमेस किंवा पूर्वेस होईल. त्यानंतर आपण आचमन करणार आहोत.तामनामध्ये बप्पाची मुर्ती ठेवुन. प्रत्येक आश्मनानंतर हातावरून तामनामध्ये पाणी सोडायचा आहे. हात जोडून गणपती बाप्पांचा स्मरण करायचा आहे.
 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।
 निर्वघ्न कुरु मे देव सर्व कार्य सु सर्वदा।।
   यानंतर आवाहन करायचा आहे. तर देवाला पूजेसाठी बोलवायचं आहे. देवांना आवाहन केल्यानंतर आपण गणपती बाप्पांना स्नान करून घेणार आहोत, तर त्याआधी इथे मी चौरंगावर ती लाल वस्त्र ठेवले आहे. आता सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेऊ,  दिवा लावून घ्यायचा आहे. तर इथे मी अक्षदा वस्ञावर टाकुन दिव्यासाठी आसन करून त्यावर दिवा ठेवला.
यानंतर आपण दिव्याची पूजा करणार आहोत. हळदी कुंकू व्हायचं आहे. अक्षदा व्हायच्या आहेत. फुल व्हायचं आहे. आणि आपण दिव्याची इथे पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण श्री गणेशाला दूध आणि पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे. तर इथे मी एक छोटासा तांबून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण जी गणपती बाप्पांची मूर्ती घेतलेली आहे. ती ठेवून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम गणपती बाप्पांना पाण्याने आपण स्नान करून घेऊयात.तर ही पूजा करताना सतत तोंडामध्ये ओम श्री महागणपतये नमः असा मंत्र्याचा उच्चार हा मंत्र बोलायचा आहे. तर यानंतर आपण पंचामृत आणि गणपती बाप्पांना स्नान घालून घेणार आहोत. पंचामृताने स्नान घालून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपण अजून एकदा गणपती बाप्पांना स्नान घालून घेऊयात, आणि मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे. तर गणपती बाप्पांना पंचामृताचा अभिषेक करून झालेला आहे. तर मूर्ती स्वच्छ करून घेतल्यानंतर एका स्वच्छ कपड्याने आपण ही मूर्ती पुसून घेणार आहोत. तर हे पंचामृत तुम्ही प्रसादामध्ये घेऊ शकता किंवा तुळशीमध्ये ही टाकू शकता,  यानंतर चौरंगा वरती आपण अशी तांदळाची रास घालणार आहोत. त्या तांदळाच्या राशीवरती आपल्याला गणेशाची मूर्ती स्थापित करून गणपतीची पूजा करायची आहे. आता तांदळाच्या राशीवरती प्रथम हळदीकुंकू वाहून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जी अभिषेक घालून घेतली होती. ती मुर्ती आपण इथे स्थापित करून घेऊया.ओम श्री महागणपतेय नमः  त्यानंतर गणपती बाप्पांना चंदन लावून घ्यायचा आहे. अष्टगंध लावून घ्यायचा आहे. हळदीकुंकू लावून घ्यायचा आहे. अक्षदा व्हायच्या आहेत. फुलं व्हायचे आहेत. जानवं व्हायचं आहे. ज्या पण वस्त्र माळ करून घेतली होती. कापसाची तीही गणपती बाप्पांना व्हायची आहे ,तर इथे माझ्याकडे छोट्याशा मोत्यांची माळ आहे, तर ती मी गणपती बाप्पांना घालून घेणार आहे. यानंतर आपण अक्षदा व्हायच्या आहेत. फुलं व्हायचे आहेत. दुर्वा व्हायचे आहेत. तरी या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे. दिवसभर तुम्ही फलाहार करू शकता किंवा उपवासाचे पदार्थही खाऊ शकता. जर तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल आणि काही कारणामुळे तुमचा जर हा उपवास सुटला असेल, तर तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थी या दिवसापासून संकष्टी चतुर्थीचा उपवास करण्यास सुरुवात करू शकता. विद्येची देवता असलेले गणपती गणेश भक्तांचे आराध्य दैवत आहेत. आपल्यावर आलेले संकट तो दूर करतो आणि कठीण प्रसंगी तू आपल्याला योग्य मार्ग दाखवतो अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे. याच गणेशाचे मनोभावे पूजा करण्यासाठी श्री गणेशाला धूप दीप दाखवायचा आहे. आरती करायची आहे. तसेच गणेशाला आवडत्या मोदकांचा नैवेद्य या दिवशी तुम्ही नक्की दाखवायचा आहे. संध्याकाळी चंद्र उदया नंतर आपण उपवास सोडणार आहोत. आणि पूजाही करणार आहोत चंद्राला हळदीकुंकू व्हायचं आहे. अक्षदा व्हायचं आहे. त्याला आपण ओवाळायच आहे. आणि त्यानंतर आपण उपवास सोडणार आहोत. नंतर आपले संकट निवारण्याची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करायची आहे. अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे किंवा संकष्ट चतुर्थी महात्मा असते ते वाचायचा आहे 21 मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. आरती झाल्यावरती चंद्र दिसत नसेल तर पंचांगानुसार चंद्रोदयाची वेळ पाहून पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर आरती आठवणीने करायचे आहे. आणि प्रसाद म्हणून सर्वांनी अन्नग्रहण करायचा आहे. जेवणात मोदक असावे गोड पदार्थ असावेत खारट व आंबट पदार्थ नसावेत. चंद्रोदयाची वेळ पंचांगात दिलेली असते. जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करून गणपतीची मूर्ती अगर तसबीर उचलून ठेवायचे आहे. धान्य आपण वापरतानाच आहे, आणि पाणी तुळशीत होत आहे. 

बाप्पाची कथा
एकदा गणपती उंदरावर बसून घाई घाईने जात असताना. घसरले तेव्हा त्यांना चंद्र उपवासाने हसले ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की, आज पासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहिल त्यावर खोटा येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस भद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही. आणि जो कोणी पाहिल त्यावर त्यावर्षी खोटा येईल असे सांगितले, त्यावर चंद्राने प्रार्थना केली. की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे. तेव्हा गणपतीने सांगितले की त्यांनी संकष्ट चतुर्थी व्रत करावे. म्हणजे खोट्या काळातून त्याचे मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर सम्यन्तक मनी चोरल्याचा खोटा आळाला होता. तो कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला, अशी कथा आहे. आबाला वृद्ध स्त्री पुरुषाने सर्वांनी करायचे असे हे साधे सोपे व शीघ्र फलदायी व्रत आहे. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारे अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात.

श्रावणी संकष्टी चतुर्थी
श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थीचा (Sankashti Chaturthi) दिवस आहे. हिंदू धर्मीयांच्या पवित्र महिन्यातील ही संकष्टी असल्याने गणेशभक्तांमध्ये आज विशेष उत्साह, आनंद आहे. दरम्यान प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात. त्यापैकी वद्य पक्षातील चतुर्थी 'संकष्टी' तर शुक्ल पक्षातील चतुर्थी 'विनायकी' म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. गणपती बाप्पाचे भक्त आजच्या दिवशी संकष्टीचं व्रत म्हणून उपवास करतात. सार्‍या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि संकटं दूर व्हावी या कामनेतून संकष्टी चतुर्थीचं व्रत केले जाते. सायंकाळी चंद्रोदयानंतर या व्रताची सांगता करण्याची प्रथा आहे.

अंगारकी संकष्टी चतुर्थी 2023
Angarki Sankashti Chaturthi 2023: हिंदू धर्मात अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष महत्त्व आहे. भगवान श्रीगणेशाच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. एका अंगारकीला व्रत केल्यावर वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचे पुण्य लाभते असेही मानले जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षात दोन संकष्टी चतुर्थी येतात. तर सहा महिन्यांमध्ये एकदा अंगारिकेचे मुहूर्त असतो. मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. पुराणानुसार असं म्हटलं जातं की जो कोणी या दिवशी गणेशाची पूजा करतो आणि उपवास ठेवतो, त्याला शुभ फळ प्राप्त होते. म्हणून उपवास केला जातो.

अंगारकी संकष्टी चतुर्थी चे महत्व (agarki sakasht chaturthi importants2023)
अंगारकी चतुर्थीविषयी पुराणात वेगवेगळ्या कथा आहेत. मंगळवारी येणाऱ्या गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. प्राचीन कथेनुसार, पार्वती देवीच्या सांगण्यावरून भगवान शिव जी ने हत्तीचा चेहरा आपल्या मुलाला लावला आणि त्याच नंतर त्याचे नाव गजानन झाले. या दिवशी अनेक माता आपल्या मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर

औंढा नागनाथ

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात जिथे महादेवा समोर नंदी नाही...