गणपती बाप्पाची आरती

गणपती बाप्पाची आरती


गणेश पुरण खूप महत्वाचे मानले जाते.मानव जीवनासाठी ते खुप  महत्वाचे आहे. गणेश पुरण आणी गणेश उपनिषदे हे दोन अत्यंत ग्रंथ खुप महत्वाची आहे.
हिंदू धर्मात बाप्पाला सर्व देवतांत अध्यस्थान आहे.गणपती बाप्पा सर्व शुभ कार्य करण्या अगोदर पूजन केले जाते.गणपती बाप्पाला शुभ देवता,संकट हरण करणारा देवता म्हणून मानले जाते.
लग्न  समारंभात ,वास्तूपूजेच्या वेळी ,यात्रेत ,उत्सव या  सर्व अतिमहत्वाच्या कार्यात बाप्पाचे पूजन अगोदर केले जाते.

बाप्पाची आरती फक्त गणेश चतुर्थीलाच महत्वाची नसते,तर पूर्ण वर्षच आरती महत्वाची असते.बाप्पाच्या आरतीने सगळ्या भक्तांना सुख,समृद्धी,आरोग्य प्रदान होते.
बाप्पाची आरती दररोज अंघोळी नंतर  व संध्याकाळी पण करावी. गणेशस्रोत हा पाट करावा.
(वक्रतुंड महाकाय गणेश मंत्र सगळ्यांना माहितच आहे.)
नंतर बाप्पाला चढवून आरती करावी.

गणपतीची (गणेश)आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥

जय देव, जय देव,
जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामनापु्र्ती
जय देव, जय देव

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुम केशरा।

हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया॥

जय देव, जय देव,
जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामनापु्र्ती
जय देव, जय देव

लंबोदर पीतांबर फणीवर बंधना।
सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना।

दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावें, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना॥
जय देव, जय देव


घालीन लोटांगण, वंदिन चरण।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे।
प्रेमे आलिंगीन आनंदे पुजिन।
भावें ओवाळिन म्हणे नामा॥


त्वमेव माता च पिता त्वमेव,
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव॥
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव,
त्वमेव सर्व मम देवदेव॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा,
बुध्दात्मना वा प्रकृतिस्वभावात्।
करोमि यद्यत् सकलं परस्मै
नारायणायेति समर्पयामि॥
त्वमेव माता च पिता त्वमेव,
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव

अच्युतं केशवं रामनारायणं,
कृष्णदामोदरं वासुदेवं हरि।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं,
जानकीनायकं रामचंद्रं भजे॥

हरे राम हरे राम,
राम राम हरे हरे।
हरे कृष्ण हरे कृष्ण,
कृष्ण कृष्ण हरे हरे॥

हरे राम हरे राम,
राम राम हरे हरे।
हरे कृष्ण हरे कृष्ण,
कृष्ण कृष्ण हरे हरे॥

🙏🙏🙏


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर

औंढा नागनाथ

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात जिथे महादेवा समोर नंदी नाही...