श्री भद्रा मारुती

श्री भद्रा मारुती
श्री भद्रा मारुती मंदिर हे खुलताबाद( प्राचीन मुळ नाव भद्रावती) येथील हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे .हे येथे सोयगाव येथे जवळ औरंगाबाद महाराष्ट्र येथे स्थित आहे. हे मंदिर वेरूळ लेण्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते.या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो. त्यावेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. महाराष्ट्रात हनुमानाला मारुती म्हणतात. महाराष्ट्र शनिवार तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. त्या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल, तसेच रुईची फुले आणि पाणे अर्पण करण्याची प्रथा आहे. मारूतीला नारळ फोडण्याची रूढी ही पूर्व फार चालत आलेली आहे.

खुलताबाद हे ठिकाण हिंदू दैवत भद्रा मारुती संस्थान यासाठी देखील विशेष प्रचलित आहे .भद्रा मारुती या ठिकाणी हनुमानाचे निद्रस्थ अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. अशा प्रकारचे निद्रिस्त मारुतीची मूर्ती भारतात  तीन ठिकाणी आहेत. त्यातील एक ठिकाण उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हे असून दुसरे खुलताबाद आहे. व तिसऱ्या ठिकाण मध्य प्रदेशातील जामसावळी येथे आहे. खुलताबाद येथे दरवर्ष हनुमानजी ते निमित्त भव्ययात्रा भरते या दिवशी खुलताबाद खुलताबाद येथे हजारो लोक आसपासच्या गावातून पायी चालत येतात.

नवसाला पावणारा मारुती हे जागृत देवस्थान येथे आहे. हनुमान जयंती व चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी आणि रामनवमी अशा शुभप्रसंगी येथे लोक लाखोंच्या संख्येने जमा होतात. व दर्शन घेतात. येथील मूर्ती शयाना अवस्थेत असलेली मारुतीची मूर्ती अजून दोन ठिकाणी आहे .प्रयागराज व तिसरे मध्य प्रदेशातील जाम सवाली येथे आहे. 
हनुमान ही महादेवाचे रूप असल्याने शनिवारी शिवभक्त भद्रा मारुतीच्या दर्शनाला येतात. श्री हनुमान जी यांना स्मर्पित असलेले खुलताबाद हे समर्पित आहे. आपण सर्वांनी हनुमान जी विविध मूर्ती रूपे पाहिले असतील त्यांना कुठेतरी उभे राहताना, हातात पर्वत उचलताना, छाती फाडताना आणि रामाच्या सुरात लीन होताना पाहिले असेल पण झोपेच्या मुद्रेत हनुमानजी हिची मूर्ती पाहणे हा एक अनोखा अनुभव असेल हे मंदिर प्रसिद्ध आहे. कारण भारतात फक्त तीन ठिकाणी हनुमानजींची मूर्ती या अवस्थेत स्थापित आहे. आणि भद्रा मारुती मंदिर हे त्यापैकी एक आहे. ज्यामुळे हे मंदिर पर्यटकांचे मुख्य केंद्र आहेत ही आगळीवेगळी मूर्ती पाहण्यासाठी लांबून लांबून प्रवासी दर्शन घेण्यासाठी येत असतात व गर्दी करतात .

श्री भद्रा मारुती खुलताबाद औरंगाबाद येथील मंदिराचा इतिहास
औरंगाबादचे भद्रा मारुती मंदिर पूर्वी भद्रावती म्हणून ओळखले जात असे. कारण खुलताबादचा राजा भद्रा सेन हा रामाचा मोठा भक्त होता. ज्याने या मंदिराची स्थापना केली होती. अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे की एकदा राजा भद्रसेन रामाच्या भक्तीतलीन होऊन भजन गात होते. आणि ते मधूनच हृदय ऐकत असताना श्री हनुमानजी त्यांच्या शेजारी बसला. आणि  स्ञोत ऐकत भाव समाधीत मंत्रमुग्ध झाले .जेव्हा राजाने हनुमानजींना पाहिले तेव्हा त्यांना येथे कायमचे स्थायिक होण्याची विनंती केली .तेव्हा त्याने त्यांना रामभक्त चे वरदान देण्यास सांगितले. तेव्हापासून श्री हनुमानजी त्यात समाधी मुद्रित बसलेले आहेत. काही लोकांचा असाही विश्वास आहे की लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी हनुमानजींनी संजीवनी आणताना या ठिकाणी विश्रांती घेतली होती.

भद्रा मारुती मंदिराला भेट देण्याची योग्य वेळ भद्रा मारुती मंदिरात रामनवमी आणि हनुमान जयंतीला भाविकांची मोठी गर्दी होते. याशिवाय हिंदू कॅलेंडरची श्रावण महिन्यानुसार महिन्याच्या शनिवारी लाखो प्रवासी हनुमानजींची पूजा करण्यासाठी मंदिरात येतात. जर तुम्ही औरंगाबादला भेट देण्याचे विचार करत असाल तर औरंगाबाद मधील भद्रा मारुती मंदिराला भेट देण्याची संधी गमावू नका. कारण येथील अप्रतिम आणि अद्वितीय मूर्ती संपूर्ण भारतात दुर्मिळ आहे. भद्रा मारुती मंदिराच्या विस्तीर्ण संकुलात तुम्हाला खूप शांतता जाणवेल आणि थोड्या काळासाठी तुम्ही तुमच्या सर्व चिंतांपासून मुक्त व्हाल.

भद्रा मारुती मंदिर औरंगाबाद जवळ भेट देण्याचे ठिकाणे- भद्रा मारुती मंदिरात भेट दिल्यानंतर तुम्ही येथून इतर  ठिकाणांनाही भेट देऊ शकता. त्यापैकी एलोरा लेणी सर्वात प्रमुखांनी सर्वात आकर्षक आणि सुंदर लेणी आहे. या लेण्यांमध्ये तीन धर्मातील घटक असलेले प्राचीन शिल्प ही जतन करण्यात आलेली आहे. एलोरा लेणीच्या अगदी जवळच ग्रीनश्वर मंदिर आहे. या प्राचीन आणि पवित्र मंत्राला भेट दिल्यास तुम्हाला एक सुखद अनुभव मिळेल. याशिवाय भद्रा मारुती मंदिराच्या अगदी जवळ असलेल्या औरंगजेबाच्या मग बर्‍यालाही तुम्हाला भेट देऊ शकता. याकर्षक थोडक्यात मुघलशेरीत बांधलेले खांब ,घुमट, आणि इतर वास्तुकलेच्या नमुना बघायला मिळतो .म्हणजेच भद्रा मारुतीच्या दर्शन तुम्ही या सर्व ठिकाणांच्या प्रवासाचा एकत्रित आनंद घेऊ शकता.



भारतात असलेल्या हनुमानांच्या विविध मूर्ती

  • गुडीवाड आंध्र प्रदेश 
  • मैलम्पावली
  •   हळ्ळेबीड 
  • ग्वालियर मध्य प्रदेश
  •  बुलढाणा
  •  बेंगलोर
  •  दमणजोडी
  •  अब्बिरजुपालेम
  •  विशाखापट्टणम्
  •  छत्तरपुर
  •  निमच, मध्य प्रदेश 
  • गिरीसोला ओडिशा 
  • नृसिंहनाथ
  •  परिताला ,विजयवाडा ,आंध्र प्रदेश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर