महाशिवरात्री 2023

महाशिवरात्री 2023


ओम नमः शिवाय 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो स्वागत आहे, पुन्हा एकदा तुमचे माझ्या पोस्ट मध्ये... आज मी तुम्हाला महाशिवरात्री 2023 याविषयी माहिती देणार आहे. महाशिवरात्री 2023 मध्ये कधी आलेली आहे? पोस्ट संपूर्ण शेवटपर्यंत वाचवा हीच विनंती आहे....

2023 मध्ये महाशिवरात्र फेब्रुवारी महिन्यात 18 तारखेला शनिवारी आलेली आहे.शंकराची पूजा करून हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्णपक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री 18 मार्च रोजी साजरी करणारा आहोत. असा मानलं जाते की महाशिवरात्रीला भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. महाशिवरात्रीच्या विशेष मुहूर्तावर "भगवान शंकराला", प्रसन्न करण्यासाठी भाविक उपवास करतात. माता पार्वती प्रमाणेच ,मुलीही इच्छित वर मिळवण्यासाठी उपवास ठेवतात. आणि सर्व विधींचे पालन करून त्यांची पूजा करतात, या दिवशी उपवास केल्याने सौभाग्य प्राप्त होते ,असं म्हटलं जातं. याशिवाय या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने, जीवनातील सर्व संकटे आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. महाशिवरात्रीच्या  दिवशी भगवान शिव सोबत पार्वतीची ही पूजा केली जाते. तर, आज आपण या पोस्टमध्ये महाशिवरात्रीची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत काय आहे? याबद्दल माहिती बघणार आहोत.यंदा महाशिवरात्री 18 मार्च शनिवारी साजरी करण्यात येणार आहे.आणि सर्व विधींचे पालन करून त्यांची पूजा करतात. उपवास केल्याने सौभाग्य प्राप्त होते असं म्हटलं जातं. याशिवाय या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान शिवा सोबत पार्वतीची ही पूजा केली जाते. 
 आज आपण या पोस्टमध्ये महाशिवरात्रीची तिथी शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत काय आहे. याबद्दल माहिती बघणार आहोत. 

महाशिवराञीचा शुभ दिवस

यंदा महाशिवरात्रीचा शुभ दिवस शनिवार 18 मार्च रोजी पहाटे 12.27 पासून सुरू होणार आहे. आणि 1.17वाजता समाप्त होईल. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 17 फेब्रुवारी रोजी रात्री 8:02 पासून सुरू होईल आणि 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4:18 पर्यंत चालेल. उदयतिथीनुसार 18 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी होणार आहे. यामध्ये 18 आणि 19 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12.16 ते 1.6 मिनिटांपर्यंत निशीथ काल पूजा मुहूर्त असेल. दुसरीकडे, महाशिवरात्री व्रताचा पारण मुहूर्त १९ फेब्रुवारी रोजी सकाळी 6.57 ते दुपारी 3.33 पर्यंत असेल.

महाशिवरात्रीची पूजा कशी करावी?

पूजेची पद्धत आणि मुहूर्त लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासमोर हात जोडून महाशिवरात्री व्रताची प्रतिज्ञा घ्यावी. यानंतर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला अभिषेक करा, पूजा करा. जर तुम्ही घरी पूजा करत असाल तर नियमानुसार शुभ मुहूर्तावर पूजा करा. यासाठी प्रार्थनास्थळ स्वच्छ करावे. ते स्थान गंगाजलाने पावन करावे. शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करा. बेलपत्र, फुले, दिवा आणि अक्षतांनी भगवान शंकराची पूजा करा. फळे आणि मिठाईचा आनंद घ्या. शिव चालिसा वाचा. पूजेनंतर प्रसादाचे वाटप करावे.  महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण भक्तीभावाने केलेली प्रार्थना नक्कीच मान्य होते. म्हणूनच या दिवशी भगवान भोलेनाथ यांची पूजा नियमानुसार केली पाहिजे. 
महाशिवरात्री दिवशी सकाळी डोमामूर्तावर उठून महाशिवरात्रीची पूजा केली जाते. तर महाशिवरात्रीची पूजा करण्याची योग्य पद्धत आपण जाणून घेऊया.. पहिल्यांदा शिवलिंगावर पंचामृत अर्पण केलं जातं. तर पंचामृतांमध्ये दूध, दही, गंगाजल ,केशर महत्व ,पाणी यापासून तयार केलेलं पंचामृत अर्पण करावे व इतर पवित्र वस्तूंचा अभिषेक करत असताना रुद्र पटन करावे. तीन पानाचे बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्राचे तोंड आपल्याकडे करून ,ते अर्पण करावे. शिवलिंगावर पांढऱ्या रंगाचे फुल अर्पण करावे. इतर कोणतीही फुले कोणत्याही रंगाची फुले शिवलिंगावर अर्पण करू नयेत. महाशिवरात्रीला रात्रीला चार पहरी पूजा अर्चना करावी. यालाच या पूजा असेही म्हणतात. या या पूजेत देवाला अभ्यंग्य स्नान घालून अनुलेपन करावे, व बेल पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळूका व शिवपिंडीवर पहाव्यात तसेच धोत्रा व आंबा यांची पत्री ही पाहण्याची पद्धत आहे. 26 तांदळाच्या पिठाचे दिवे करून त्याने शिवलिंग ओवाळलं जातं. आणि पूजेच्या शेवटी 108 दिव्यांचा दान दिले जातात. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर स्नान करून पुन्हा पूजा करून पाण्याला ब्राह्मण भोजन घालून ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन काच समाप्ती करावी. याच दिवशी शिव व पार्वतीचा विवाह झाला. असल्यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे भोलेनाथाचे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची समाप्ती होते दुसऱ्या दिवशी स्त्रिया ब्राह्मणाला भोजन घालून व्रताचा समारोप करतात. "पृथ्वीतलावरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकाचा एक दिवस शिवशंकर रात्रीच्या एका प्रहार विश्रांती घेतो. शिवांच्या याच विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं". तरी या दिवशी महादेवाची भक्तीभावाने उपासने केली असता. जीवनातील अडचणी दुःख पाक आर्थिक समस्या दूर होतात. असुरांनी, देवतांनी ,ऋषीमुनींनी प्राचीन काळापासून महादेवाची तपश्चर्या करून वरदान प्राप्त केले आहे.

शिवपुराणातील कथा
एक पारधी जंगलात सावज शोधण्याकरता झाडावर बसला होता. संपुर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही. सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढयात त्यातील एक हरीण पुढे येउन पारध्याला म्हणाला.

‘हे पारध्या तु बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटुन येऊ दे, माझी कर्तव्ये मला पार पाडुन येउ दे’, हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली.

दुरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते.

सहज चाळा म्हणुन एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातुन शिवउपासना घडली.

हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हंटले ’की आता मला मार मी माझे कुटूंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावुन आलो आहे. तेंव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तीने म्हंटले ‘त्यांना नको मला मार मला माझे पत्नीधर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे’.

त्वरीत हरणाची लहान पिल्लं पुढे आली आणि म्हणाली ‘आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडूदे’.

ते पाहाता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणीमात्र असुन देखील आपापल्या कर्तव्याला चुकत नाहीत, तर मी माझा मानवधर्म, दयाधर्म का सोडु? त्याने सर्वांना जीवदान दिले.

देवाधिदेव महादेव हे सर्व पाहुन हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपाआशिर्वाद दिला.

सर्वांचा उध्दार केला हरिणाला मृग नक्षत्र म्हणुन व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणुन अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता . . . .

महाशिवरात्रीच्या उपवासाचे नियम

शिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी स्नान करूनच भाविकांनी पूजा करावी किंवा मंदिरात जावे.

रात्री भगवान शंकराची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी स्नान करून उपवास सोडावा.

व्रताचे पूर्ण फळ मिळण्यासाठी भक्तांनी सूर्योदय आणि चतुर्दशी तिथीच्या दरम्यानच उपवास संपवावा.

परंतु, दुसर्‍या मान्यतेनुसार उपवास संपण्याची नेमकी वेळ चतुर्दशी तिथीनंतर सांगितली आहे.

दोन्ही संकल्पना परस्परविरोधी आहेत. परंतु, असे मानले जाते की शिवपूजा आणि पारण (उपवासाची समाप्ती) दोन्ही चतुर्दशीच्या तारखेपूर्वी कराव्यात.

रात्रीच्या चारही टप्प्यात शिवपूजा करता येते.

शिवरात्रीची पूजा रात्री एक किंवा चार वेळा करता येते. रात्रीचे चार प्रहार असून प्रत्येक प्रहारात शिवपूजा करता येते.

समर्थ रामदास स्वामी रचित शंकराची आरती

रामदास महाराज रचीत शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ 

जय देव जय देव० ॥ ४ ॥




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर