श्री शंकराची आरती

श्री शंकराची आरती


लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।

रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ 

जय देव जय देव० ॥ ४ ॥


भगवान शिव शंकर

शिव शंकर ही हिंदूधर्मातील देवता आहे.

 भगवान शिव शंकर हे तमोगुणाचे कारक आहे. सृष्टीचा संहार‌व विघटन भगवान शिव शंकराच्या आधीपत्याखाली होते. यांना त्रिवेद म्हटले जाते.म्हणजे नित्य नियमित जन्म मरण चक्राची रुपके आहेत.

भगवान शिव शंकराची उभा महेश्वर ,अर्धनारीश्वर ,पशुपती, कृतीवास, दक्षिणामूर्ति, योगेश्वर अशी रुपे प्रसिद्ध आहेत. भगवान शिव शंकराचे कैलास पर्वत हे निवासस्थान आहे. त्यांचे वाहन नंदी असून. शस्त्र त्रिशुळ आहे.  शिवशंकर यांची पत्नी सती व पार्वती आहे. तर त्यांचे अपत्य कार्तिकेय ,गणपती ,अशोक सुंदरी आहे. खंडोबा आणि ज्योतिबा हे महादेवांचे अवतार आहे. महादेव मुख्य अवतार भगवान शिवशंकर यांचा आहे.त्यांचा नमोल्लेख लिंग पुराणात आढळतो. भगवान शिव शंकराची तीर्थक्षेत्र हे 12 जोतिर्लिंग आहे.

भगवान शिव शंकर हे महादेव ,उमापत,भोलेनाथ,उमेश,गंगाधर,त्रिणेत्र, त्र्यंबक,नीलकंठ,महेश,रुद्र,शंकर,शंभू,शुलपाणी ,सदाशिव,सांब, गौरीहर,दीनानाथ,खंडोबा,या नावांनी ही ओळखले जाते. ही त्यांची इतर नावे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर