विघ्नेश्वर
विघ्नेश्वर
परंपरा आम्ही जपतो..
मोरयाचा गजर आम्ही करतो..
हक्काने वाजवतो
आणि
बाप्पाला नाचवतो..
म्हणूनच बोलतो,
बाप्पा मोरया
🙏🙏🌸
अष्टविनायका पैकी विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे.
श्रींच्या डोळ्यात माणिक व कपाळावर हिरा आहे.अशी श्रींची मूर्ती प्रसन्न वाटते.मंदिराच्या चहुबाजूंनी तटबंदी असून कुकडी नदीच्या तीरावर हे मंदिर आहे.सर्वात श्रीमंत समजला जाणारा गणपती बाप्पा म्हणजे विघ्नेश्वर.बप्पा विघ्नांचे हरण करतो म्हणून या बाप्पाला विघ्नेश्वर असे म्हणतात.प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश याला विघ्नेश्वर असे म्हणतात.शिवाजी महाराजांचा जन्म किल्ला असलेला शिवनेरी किल्ला इथून जवळच आहे.
सर्व देवांनी मिळून या गणेशाची येथे स्थापना केली आहे.विघ्नासूरचे पारिपत्य करण्यासाठी गणेशाने येथे अवतार धारण केला.अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ सुरु केला. ही वार्ता इंद्रास कळताच त्याने यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूराला आज्ञा दिली.विघ्नासूर केवळ यज्ञाचा नाश करून थांबला नाही तर त्याने सर्वच देव धर्माला आव्हान दिले.देवांनी संकट दूर करण्यासाठी गणेशाची आराधना केली मग गणेशाने पराशर ऋषींचा परत्र म्हणून येथे अवतार घेतला.व विघ्नेश्वराचा वध केला.माझे नाव धारण करून आपण येथेच राहावे ही विघ्नेश्वराचे प्रार्थना गणेशाने स्वीकारली व तेथे विघ्नेश्वर नावाने राहिले.चिमाजी अप्पांनी वसई च्या लढ्यात विजय मिळवल्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार केला.ट्रस्ट कडून दरवर्षी नाममात्र दरात तीनशे सामुदायिक विवाह येथे लावले जातात.तसेच गजानन सागरात नौका विहाराची सोय करण्यात आलेली आहे.अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा व विघ्नांचे हरण करणारा विघ्नेश्वर कुकडी नदीच्या तीरावर बसलेला असून ते गणपतीचे एक जागृत स्थान आहे.मंदिराला दगडी तटबंदी आहे.मंदिराचा कळस व शिखर सोन्याचा आहे प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला दगडात कोरलेले भालदार-चोपदार आहेत.मंदिर पूर्वाभिमुख आहे.महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन उंच दीपमाळा नजरेस पडतात.मंदिरात एका ते काशी सभामंडपाची रचना असून प्रवेशद्वारातून प्रवेश करताच काळ्या पाषाणातील उंदीराची मूर्ती आहे.देवळाच्या भिंतीवर चित्र काम केलेले आहे दोन सभामंडपातून आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे गाभार्यात डोलदार अशा कमानीत बसलेली पूर्णा कृतीतील विघ्नेश्वराची डाव्या सोंडेची मूर्ती आहे.मूर्तीच्या दोन्ही डोळ्यात माणके तसेच कपाळावर व बेंबीत हिरे आहेत या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पितळाच्या मूर्ती आहेत थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात इतिहासात आढळतो.
आख्यायिका
राजा अभिनंदन याच्या इंद्रस्थान प्राप्तीच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी देवेंद्राने विघ्नासूराला पाचारण केले. त्यामुळे विघ्नासुराने तेथील यज्ञात विघ्न आणायला सुरुवात केली. तसेच पृथ्वीवर विध्वंस करायलाही सुरुवात केली त्यामुळे त्रस्त झालेल्या ऋषींनी ब्रह्मदेव व भगवान शंकरांच्या आज्ञेप्रमाणे श्री गणेशाकडे प्रार्थना केली. तेव्हा श्री गणेशाने विघ्नासुराने बरोबर युद्ध करून त्याचा पराभव केला. शरण आलेल्या विघ्नासुराने आपले नाव श्री गणेशाच्या नावाबरोबर घेतले जावे अशी इच्छा व्यक्त केली तेव्हापासून या गणपतीला विघ्नहर असे म्हटले जाऊ लागले.
आंतर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वरील नारायणगाव च्या पश्चिमेस
नारायणगाव- ओझर १२ किलोमीटर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा