श्री विठ्ठलाची आरती

श्री विठ्ठलाची आरती 

(युगे अठ्ठाविस विटेवरी उभा)



युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।। 1।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।।
जय देव ।। 2।।

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवळिती राजा विठोबा सावळा।।
जय देव ।।3।।

ओवाळू आरत्या कुर्वड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।।
जय देव ।।4।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।
दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवळिती।।
जय देव जय देव ।।5।

युगे अठ्ठावीस मधील अठ्ठावीस युग म्हणजे किती काळ


सत्य,त्रेता, व्दापार,कलि अशा चार युगांचे चक्र म्हणजे एक फेरा होतो.सध्या पृथ्वी तत्वाचा सातवा फेरा चालु आहे. ७*४=२८ सध्या अठ्ठावीसावे युग चालु आहे.विठ्ठल २८युगापासुन उभा आहे.
४ युग १८ पुराणे ६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते;म्हणुन विठ्ठल युगे अठ्ठाविस उभा आहे;कारण हे सर्व (वेद, पुराणे,आणि शास्त्रे) त्याचेच गुणगान करणारी आहेत.
विठ्ठल २८ युगापासुन उभा आहे असे म्हटले आहे. उभा आहे याचा अर्थ विठ्ठल २८ युगांपासुन निर्गुण स्वरुपात म्हणजेच तत्वरुपाने कार्यरत आहे. यावरुन विठ्ठलाचे अनादित्व लक्षात येते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर

औंढा नागनाथ

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात जिथे महादेवा समोर नंदी नाही...