श्री शनेैश्वर शनिशिंगणापूर

    श्री शनेैश्वर शनिशिंगणापूर


 " जहा किसी नगर और किसी
 द्वार पर कोई ना ताला डाले"
 वरील ओळ खूप नावाजलेल्या गाण्याची आहे ती खालील पणे:
"जहा डाल डाल पर 
सोनेकी चिडीया करती है बसेरा
 ओ भारत देश है मेरा"
 या गाण्यातील ही ओळी आहे.
संपूर्ण भारत देशात घराला कुलुप लावायची प्रथा नव्हती. कारण त्यावेळी सगळेजण इमानदार होते. त्यामुळे कोणीही दरवाजाला कुलूप लावून जात नसे. व कुलूप लावतच नसे त्यावेळी ही प्रथाच नव्हती, की दरवाजाला कुलूप लावावे. आता तर बहुतेक सर्वच घरांना कुलूप लावतात. दरवाजाला  कुलुप लावून मगच बाहेर पडतात. पण आज या काळात सुद्धा असे एक शहर आहे की तेथे आज सुद्धा कुलूप तर नाहीच पण घराला दरवाजाही नाही व खिडक्या ही नाही.
या भारत देशात आजही एक शहर असे आहे की येथे  दरवाजा पण नाही व कुलूप पण लावले जात नाही. कुलूप तर नाहीच पण दरवाजाही नाहीत, हे ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. पण हे खरे आहे की घराला कुलूप दरवाजा खिडक्या काहीच नाही.
चला तर त्या शहराविषयी तुम्हाला थोडी माहिती सांगते व त्याविषयी जाणून घेऊया ते गाव आहे शनिशिंगणापूर. शनिशिंगणापूर हे अहमदनगर जिल्ह्यापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. चला तर त्याविषयी जाणून घेऊया व दरवाजा व खिडक्याचे रहस्य काय? का? आजही तिथे दरवाजे खिडक्या घराला लावत नाही? हेही जाणून घेऊया.…..
हायवे पासून दोन किलोमीटर आत गेल्यावर स्वयंभू शनि देवाची मूर्ती तिचे दर्शन होते या मंदिरास स्वयंभू म्हणजे स्वतः धरतीतून प्रकट झालेल्या मूर्ती आहे.शनिशिंगणापूर मंदिराला भव्य असे प्रवेशद्वार आहे. शनिशिंगणापूर मंदिरात 400 वर्षांपासून स्त्रियांना किंवा महिलांना आत येण्यास परवानगी नव्हती. मुंबई हायकोर्ट च्या आदेशानंतर आता महिला पण तेल चढवायला शनि देवाचे दर्शन घ्यायला आता जाऊ लागले आहे. शनिशिंगणापूर येथे दररोज 40000 ते 50000 हजार श्रद्धाळु तेथे दर्शन घेण्यात जात असतात. शनि अमावस्या, शनिवारी ,शनि अमावस्येच्या दिवशी व शनी जयंतीच्या दिवशी दीड लाखाच्या वरती येथे श्रद्धाळू भक्त जण दर्शन घेण्यास येतात. व शनि देवाचे दर्शन घेतात शिंगणापूरचे हे मंदिर एक जागृत देवस्थान मानले जाते. येथील गावकऱ्यांचे असे मान्य आहे की, या गावात कुठेही चोरी जर झाली तर भगवान शनिदेव स्वतः त्यांना शिक्षा देतात. यामुळेच येथील पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा कुलूप नाही. या गावात कोणीही कुलूप लावत नाही. येथील घराला कोणीही कुलूप लावत नाही. एवढेच नाही तर तेथे बँक आहे. त्या बँकेला ही कुलूप नाही. शनी मंदिरात यांच्या मूर्ती जवळ तेथे मोठ्या मोठ्या टाक्या आहेत. तिथे जे पण आपल्याला शनि देवाला चढवायचे आहे. जसं तेल , फुल वगैरे काही पण जे चढवायचे ते टाकेत वरती सोडायचं मग ते ऑटोमॅटिक मशीनद्वारे शनि देवांच्या मूर्तीवर चढवले जाते.

 जाणून घेऊया शनी शिंगणापूरच्या मार्केट विषयी... शनिशिंगणापूरच्या मार्केटमधील छोटे दुकान असो व मोठे दुकान असो एकदम खुल्या प्रकारे सामान ठेवले जाते. कुठेही दरवाजा किंवा कुलूप नाही. मार्केट मध्ये सुद्धा 24 घंटे उघडे असलेल्या दुकानांनाही येथे कुलूप दरवाजा नाही. रात्र होते हे दुकान बंद होतात पण दरवाजा लागत नाही. त्या उघड्या आणि उघड्याच कायमच्या चालू दुकाना असतात .येथील पब्लिक बाथरूमला पण दरवाजे नाहीत .येथे सगळं भरोशावर  चालते घरात दरवाजांना पडदे आहेत मेन गेट पण नाही. व दरवाजे पण नाही.

  अहमदनगर पासून ३० किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. येथे श्री शनेश्वराचे स्वयंपूर्ण जाज्वल्य देवस्थान असुन शनी शनेश्वराची मुर्ती पाच फूट नऊ इंच उंचीची आहे. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते.
शनि देवाला न्यायचा देवता म्हटलं जातं. मान्यता आहे की शनिदेव सर्व कर्माचा हिशोब ठेवतात. आणि त्यानुसार ते फळ देतात. कुंडीमध्ये शनीदोष, महादशा, साडेसाती असल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जर कुठल्या व्यक्तीवर शनिदेव मेहरबान झाले, तर ते त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची समस्या येऊ देत नाही.
शनिशिंगणापूर येथे शनी जयंतीस मोठा उत्सव साजरा केला जातो.



 या देवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा देव उघड्यावरच राहतो. त्याला कोणतेही मंदिराचे छप्पर नाहीये. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे. एका व्यापाऱ्याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजीकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. शनि देवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. वर्ष प्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्यांचे चारही शनिवार येथे यात्रा भरते. शनि देवाला खुश राहणार करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लिटर तेल शनि देवाला अर्पण केले जाते. शनी अमावस्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. शनी जयंतीस(वैशाली अमावस्या)येथे उत्सव साजरा केला जातो.सपूर्ण महाराष्ट्रभरातून उत्सव साजरा करण्यासाठी यात्रीगण येतात. व शनि देवाचे दर्शन घेऊन घेतात.

भौगोलिक संरचना
    •    देश: भारत 
  •   राज्य: महाराष्ट्र 
  • जिल्हा: अहमदनगर 
  • स्थानिक नाव :शिंगणापूर
  •                 संस्कृती 
  • मूळ आराध्य दैवत: शनी किंवा शनिदेव
  •  महत्त्वाचे उत्सव: शनी अमावस्या 
  •                 स्थापत्य
  •  स्थापत्यशैली :मंदिर स्थापत्य शैली 
  • मंदिराची संख्या:  1  
  •  बांधकामाचे वर्ष: सतराव्या शतकाच्या पूर्वी 
  • निर्माण करता :अज्ञात.

  शनिशिंगणापूर ची कथा 
तुम्हाला विश्वास बसणार नाही की ,या गावात कोणत्याही घराला दरवाजा नाही दुकानाला ही दरवाजा नाही. याच गोष्टीमुळे हे गाव जगात प्रसिद्ध झाले आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूर गाव हे शनिशिंगणापूर नावाने ओळखले जाते. येथे हिंदू धर्माचे शनिदेव हे खूप प्रसिद्ध आहे. येथे शनि देवाचे चमत्कारी मंदिर स्थित आहे. आपल्याला विश्वास बसणार नाही की या गावातील घराला व दरवाजाला कशाला दरवाजे नाही. म्हणतात की याच गोष्टीमुळे हे गाव प्रसिद्ध आहे. तर चला याच गावाविषयी व शनिदेवा विषयी थोडीशी कथा सांगते.
 एकदा गावात खूप पाऊस झाला व खूप पाणी वाहू लागले. या पाण्यात सगळेजण डुबायला लागले. या पाण्याबरोबर एक दगड वाहून आला. तो पण नवीन सगळ्यांना अनोळखी असा दगड होता. व तो पाण्यावर तरंगत आला भयंकर पाण्यात या मोठ्या पाण्यात तो दगड वाहून आला. लोकांचे म्हणणे झाले की ही एक दैवीय शक्ती आहे .ती वाहून आली. असा नवीनच दगड पाहून एका माणसाचे मन लालचले व त्याने तो दगड फोडण्याचा प्रयत्न केला. तो दगड त्याने पहिले पाण्यातून उतरवून घेतला व तो फोडला. त्याने तो दगड फोडला तेव्हा त्याच्या निदर्शनास आले की त्यातून रक्त वाहते आहे. तो लगेच गावात गेला व लोकांना सांगितले की असा दगड आहे तो फोडल्यावर त्यातून रक्त येते. सगळं गाव गोळा झालं व व दगडाजवळ पाहू लागले. नेमकं काय आहे. असं तर कोणालाच काही कळेना तर सगळ्यांनी ठरवले की आता खूप उशीर झाला आहे. आपण सकाळी पाहू आता हा वापस घरी जाऊ गावात जाऊ. त्याच रात्री एका माणसाला स्वप्न पडले की, तू जो दगड खाली पाण्यातून खाली उतरून घेतला होतो. तो मीच शनिदेव आहे. मला गावात घेऊन ये व माझी स्थापना गावात कर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या माणसाने ही सर्व हकीकत गावकऱ्यांना सांगितली. त्याप्रमाणे गावकरी तो दगड उचलून आणण्यास गेले. पण सगळ्यांनी प्रयत्न केला तो दगड काय जागेचा सरकेना. सगळ्यांनी प्रयत्न केले पण दगड एक इंच पण बाजूला होत नव्हता. खूप प्रयत्न करून लोकांनी ठरवलं की आता आपण वापस जाऊ व नवीन काहीतरी योजनेसह येऊन दगडाला उद्या सकाळी घेऊन जाऊ. त्या रात्री पुन्हा शनिदेव स्वप्नात येऊन सांगितलं की मी तेव्हाच बाजूला सरकेल जेव्हा सखे मामा भांजे मला सरकवायला येतील. तेव्हापासून मामा भांजा जर सोबत दर्शनाला गेले तर त्यांना अधिक शनि देवाच्या आशीर्वाद जास्त भेटतो. त्यानंतर दगडाला उचलून  गावातील एका मोठ्या मैदानावर सूर्यप्रकाशात स्थापना केले गेले.

आज शिंगणापूर गाव शनिशिंगणापूर मंदिर हे गावात प्रवेश केल्यावर मोठे मैदान  लागते. त्या मंदिराच्या मध्यभागी ही शिळा आहे. जे शनि देव आहेत. येथे जास्तीत जास्त लोक केशरी वस्त्र घालूनच जातात. म्हणतात की मंदिरात एक पण पुजारी नाही. भक्तजन प्रवेश करून शनि देवाची दर्शन घेऊन लगेच मंदिराच्या बाहेर निघून जातात. दररोज मंदिरात शनि देवाच्या दररोज शनी देवाच्या स्थापित मूर्तीला सरसोच्या तेलाचा अभिषेक केला जातो. मंदिरात येणारे भक्त जण आपल्या इच्छेप्रमाणे येथे तेल वाहतात. जे भक्तजन येथे दर्शनाला जातात त्यांनी फक्त समोरच पाहायचे असते त्यांनी मागे वळून पाहायचे नसते.
पाठीमागून कोणीही आवाज केला असता, मंदिरात मागे वळून पाहणे योग्य नाही. शनि देवाच्या मूर्तीवर माथा टेकून सरळ बाहेर यावे मागे वळून पाहणे म्हणजे चांगले नाही.


 शनिशिंगणापूर मंदिराच्या गर्भगृहात पहिले महिलांना प्रवेश नव्हता पण 26 जानेवारी 2016 रोजी तिरुपती देसाई यांच्या नेतृत्वाखाली 500 महिलांनी एकजूट होऊन गर्भगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना अडकवले अडकवले सॉरी थांबवले नंतर तीस मार्च 2016 ला बॉम्बे हायकोर्ट महाराष्ट्र सरकारने मंदिर मंदिराच्या अंतर्गत गर्भगृहात महिलांना प्रवेश देता येईल अशी अनुमती दिली व आदेश काढला तेव्हापासून शनिशिंगणापूर मंदिराच्या गर्भगृहात महिलांनाही दर्शन घेण्यास परवानगी आहे

कसे जावे शनिशिंगणापूर
रस्ता मार्ग 
प्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिरात दर्शन घेण्यासाठी रस्ता मार्गाने जाणे खूप सरळ आहे. येथे MSRTC महाराष्ट्र राज्याच्या परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध आहेत. शिर्डी राहुरी वरून अहमदनगर होऊन पुणे, वाशी मुंबई येथून प्रमुख स्थळावरून येथे बस उपलब्ध आहेत. तसेच टॅक्सी रिक्षा बस हे पण उपलब्ध आहे.  

रेल्वेने मार्ग  
शनिशिंगणापूर  हे रेल्वे मार्गाने ही शहर जोडले गेलेले आहे. मुंबई ,पुणे ,दिल्ली, गोवा, अहमदाबाद, बेंगलोर, शिर्डी और चेन्नई या महत्त्वाच्या मुख्य शहरांना रेल्वे येथून जोडलेली आहे. शनिशिंगणापूर येथे राहुरी रेल्वे स्टेशन 32 किलोमीटर आहे. तर अहमदनगर रेल्वे 135 किलोमीटर ,श्रीरामपूर 54 किलोमीटर शिर्डी रेल्वे स्टेशन 75 किलोमीटर दूर आहे.

शनिशिंगणापूर मंदिराविषयी माहिती कशी वाटली हे नक्की सांगा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर