पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरातील गरुड खांबाचे रहस्य

पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरातील गरुड खांबाचे रहस्य

नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे या लेखांमध्ये स्वागत आहे. सध्या पंढरीची वारी चालू आहे. सर्वजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला चालले आहे. पंढरपूर मधील विठ्ठल मंदिर म्हणजे वारकरी संप्रदायाचे आराध्य स्थान आहे. दरवर्षीच मोठ्या संख्येने हे वारकरी दर्शनासाठी जात असतात. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य पालख्या एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जातात. व वारकरी मोठ्या भक्ती भावाने हे शेकडो किलोमीटर चालत पंढरपूरला येतात. तरीसुद्धा यांच्या शरीराची ऊर्जा संपत नाही; ते थकत नाही. कारण त्यांच्या मनात फक्त पांडुरंगाच्या दर्शनाची इच्छा असते. वारकऱ्यांना कधी पांडुरंगाचे दर्शन होईल याच असे पोटी एक एक पाऊल एक एक किलोमीटर पुढे चालत असतात. व तो दिवस येतो एकादशीचा. व त्या दिवशी सर्व वारकऱ्यांना आपल्या विठू माऊली चे दर्शन होते.
विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेण्या अगोदर सर्वजण एका खांबाचे दर्शन घेतात .तो तर फक्त दगडाचा आहे. पण त्याला गरुड खांब असे नाव दिले आहे. व त्याचे दर्शन  घेतल्यानंतरच सर्वजण विठ्ठलाच्या मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेतात. पण का? या खांबाचे सर्वजण दर्शन घेतात? यामागच्या रहस्य काय ? या मागचा इतिहास काय? आपल्या सर्वांना पण हा इतिहास जाणून घ्यायचा असेल.. तर लेख पूर्ण वाचा. तुम्हा सर्वांना पण हा प्रश्न पडतच असेल ना की, विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी गरुड खांबाचे दर्शन घेणे का महत्त्वाचे आहे? का गरुड खांबाचे दर्शन अगोदर घेता? व नंतरच विठुरायाचे दर्शन घेतात? चला तर मग जाणून घेऊया..

महाराष्ट्रात सोबतच वारकऱ्यांच्या गर्दीत श्री विठ्ठलाच्या भक्तांमध्ये अनेक प्रांतातील भक्त सुद्धा येतात. त्याचप्रमाणे कर्नाटकातील संत परंपरेतील मुख्य संत पुरंदर दास यांचे नाव समोर येते. यांचा काळ म्हणजे इसवी सन 1484 ते 1564 हा होता. या काळात पुरंदर दास या नावाचे मोठे विठ्ठल भक्त होऊन गेले. त्यांच्या वडिलांचे नाव वरद आप्पा तर लहानपणीचे त्यांचे नाव तिमप्पा किंवा शिवप्पा असे होते. लहानपणीच विद्वान आचार्य जवळ तिमाप्पाचे संस्कृत व कन्नड या भाषेचे उत्तम अध्ययन झाले होते. संगीतातही ते विशारद होते. लवकरच त्यांचे लग्नही झाले, आणि वैवाहिक  जीवनाला सुरुवात झाली. त्यांना एक कन्या तर चार पुत्र होती.

त्यांचे लग्न झाले. मुलं बाळ झाले. पण त्यांना विठ्ठल भक्तीत जास्त रस होता. त्यांचा वैवाहिक जीवनात लक्ष लागेना. ते अस्वस्थ होते. एकदा त्यांना विठ्ठलाने स्वप्नात येऊन पंढरपूरला ये म्हणून सांगितले. पुरंदर दास भारताचे तीर्थयात्रा करून पंढरपूर या तीर्थक्षेत्री आले. शेवटी ते  पंढरपुरात आले. तेथे त्यांच्यावर एक अत्यंत दुर्धर प्रसंग ओढावला. श्रीहरींनी आपला भक्त पुरंदर दास किती महान आहे ,हे दाखवून देण्यासाठी ही लीला रचली.

पंढरपूर शेत्रे एक अतिशय कुशल नर्तकी राहत होती. आणि तिची विशेषता अशी की ती नर्तकीचा व्यवसाय करत असतानाही सदैव हृदयात विठ्ठल चिंतन करत असे. ही भगवंताची एकनिष्ठ भक्त होती. एक दिवस स्वतः पांडुरंगाने ठरवले की, त्या नर्तकिचे नृत्य व गायन बघण्यासाठी जावे. पण भगवंतांनी पुरंदर दासाचे रूप घेतले होते. नर्तकीने अत्यंत भक्ती भवानी आपल्या नृत्याची मधुर गायनाद्वारे प्रस्तुती केली. आणि त्या प्रस्तुतीवर प्रसन्न होऊन पुरंदर दास रुपी भगवंत प्रसन्न झाले. आणि त्यांनी हातातील विशेष कंगन तिला भेट स्वरूप दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजाराने भगवंताच्या हातातिल कंगन बघितले तर ते गायब होते. सर्वत्र शोधा शोध सुरू झाली, आणि शेवटी ते कंगन नर्तकीच्या घरी सापडले.

जेव्हा तिला पकडण्यात आले तर, तिने पुरंदर दासाचे नाव सांगितले. नंतर पुरंदर दासालाही पकडून देवळात आणण्यात आले. आणि संशयास्पद धरून श्री विठ्ठलाच्या समोर असलेल्या दर्शन मंडपातील एका खांबाला बांधून ठेवले. पुरंदर दासाला अनेकांनी येथे यतेच्छा मारले. आपल्या भक्ताची अशी अवस्था पाहून भगवंताला दया आली, आणि अचानक गाभाऱ्यातून भगवंतांनी दिव्या आवाजात सर्वांना थांबण्यास सांगितले. आणि भगवंत म्हणाले की मीच काल पुरंदर दासाच्या वेश्यात त्या नर्तकीच्या घरी तिकडे गेलो होतो. आणि भेट स्वरूप कंगन दिले होते. आता तुम्ही पुरंदर दासाला सोडा. यापुढे हा खांब सर्वतोपरी पूजनीय मानला जाईल, आणि या स्तंभाला 'पुरंदर दास स्तंभ' म्हणून ओळखला जाईल. सर्वजण माझ्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी 'पुरंदर दास स्तंभ' किंवा 'दासर स्तंभ' किंवा 'गरुड स्तंभा'ला वंदन करूनच आत येतील असा पुरंदर दासाला आशीर्वाद दिला. व  आता पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरात जाण्यापूर्वी विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी गरुड स्तंभाला वंदन करून, दर्शन घेऊनच  विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण जातात. काही भक्तिने गरुड स्तंभाला आलिंगन सुद्धा घालतात. व गरुड स्तंभाचे आशीर्वाद घेतात. अशा प्रकारे विठ्ठल मंदिरातील गरुड खांबाचा इतिहास आहे. आस्थागायत परम पवित्र स्तंभ विठ्ठल मंदिरात अत्यंत शोभायमान असून प्रत्येक भक्तगण वंदन करूनच गाभाऱ्यात प्रवेश करतो.

ज्यावेळेस आपण पंढरपूरला विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जाऊ त्या ठिकाणी कान्होपात्रा वृक्षाच्या जवळच हा खांब आहे. याचे दर्शन आवश्यक घ्यावे. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर, नक्की लाईक करा. आणि तुमच्या मित्र कुटुंबा परिवाराला हा लेख नक्की शेअर करा. आणि लेख कसा वाटला ,हे देखील कमेंट करून कळवा ;आणि अशाच नवनवीन लेखांसाठी आपल्या पेजला लाईक करा धन्यवाद ...

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर