विठू माऊली च्या कानात मासा का असतो? तुम्हाला माहिती आहे का?
विठोबा हे संपूर्ण महाराष्ट्राचे हिंदू आराध्य दैवत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठोबाची मूर्ती खूप आकर्षक आहे. विठ्ठलाची मूर्ती ही पूर्णतः वालुकाश्म दगडची आहे.
भगवान विठ्ठल कानात माशाच्या आकाराची कुंडल का घालतात. याविषयी आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया...
विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः वैष्णव संप्रदायातील महत्त्वाची संकल्पना म्हणून ओळखली जाते. विठोबा हा कृष्णाचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे, असे मानले जाते परंतु शास्त्र पुराणांमध्ये विठ्ठलाला बौद्ध वादराज म्हटले जाते. बौद्ध हा विशाल भाल असलेला तेजस्वी नेत्राचा, मौन धारण केलेला, कटी-कर ठेवून उभा आहे.
विठ्ठलाचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आहे. पंढरपूरचे विठोबाने डाव्या हातात शंख, उजव्या हातात चक्र, किंवा कमळाचे फुल धारण केले आहे. ही सर्व आभूषण किंवा प्रतिक प्रभू विष्णूंच्या संबंधित आहे. काही प्रतिमांमध्ये विठोबा उजव्या हातात आशीर्वाद मुद्रा करतात. विठोबा शिवलिंगाचे प्रतीक असलेला शंकूच्या आकाराचा मुकुट धारण करतात. तुळशीमाळ गळ्यात धारण केलेली आहे. त्यात पौराणिक कस्तुभ रत्न जडलेले आहे. आणि विष्णूच्या प्रतिमेशी संबंधित मकर कुंडल माशाचा आकाराचे कुंडल आहे.
तर भगवान विठ्ठल कानात माशाचा आकाराची कुंडलिक का घालतात?
असे म्हणतात की एक गरीब मच्छीमार परमेश्वराला भेटायला आला होता. जात-पात आणि पंथाने विभागलेला समाज त्यांना देवाच्या जवळही येऊ देत नव्हता. सर्व ब्राह्मण आणि पंडितांनी त्याला तेथून ओढून नेण्यास सुरुवात केली. आणि त्याला हाकलून लावले ,की तुला भान आहे का? तू या भागात कसा प्रवेश करू शकतोस? तुला माहीत नाही का, की तुला तेथे विशेषता: त्या माशांसह येण्याची गरज नाही?
गरीब मच्छीमाराने उत्तर दिले मी येथे देवाला भेटायला आलो आहे. मी एक गरीब माणूस आहे .माझा व्यवसाय मासेमारी आहे. माझ्याकडे माझ्या भगवंताला भेट देण्यासाठी पैसेही नाहीत. माझ्याकडे हे दोन मासे आहेत. जे मला भगवंताला भेट द्यायची आहेत. कृपया मला माझ्या स्वामींना पाहू द्या. हे ऐकून भगवान विठ्ठल स्वतः बाहेर आले. त्यांनी मासे स्वीकारले आणि त्याला कानात घातले आणि त्याला सांगितले जो माझ्याकडे माझ्या हृदयात प्रेम आणि भक्ती घेऊन येईल. मी त्याच्याकडून काहीही स्वीकारतो शेवटी प्रेम आणि आपुलकी ही विश्वाची भाषा आहे. त्या गरीब मच्छीमार्गाकडे बघा तो प्रेम ,करूणा आणि भक्तीने माझ्याकडे आला आहे. माझा धर्म आणि पंत काहीही असले तरी माझ्याकडे मदतीसाठी येणाऱ्या प्रत्येकासाठी मी होतो. आहे .आणि कायमच राहील. आपण हे समजून घेतले पाहिजे, की प्रेम आणि फक्त प्रेमच तुमचे परिवर्तन करू शकते. तुम्हाला बरे करू शकते आणि तुम्हाला आत्मिक उंचीवर नेऊ शकते. म्हणून भगवान विठ्ठलाने आपल्या कानात एक मासा शोभेच्या रुपात धारण केलेला. आपण पाहतो विठ्ठल हा श्रीहरीचा द्वापार युगातील दुसरा तर दशावतारातील नववा अवतार मानले आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर तेराव्या शतकापासून उभे असल्याचे पुरावे सांगितले जातात विठ्ठलाची मूर्ती ही संपूर्णतः वालुकाश्म दगडाची आहे फक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठ्ठल त्याची वाट पाहत उभा असल्याची आखे का सांगितलेली आहे.
तर मित्रांनो... या कथेनुसार श्री विठ्ठलाच्या कानात माशाचा आकाराची कुंडल आहेत. हे आपल्याला समजले ,तर मित्रांनो ही कथा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व अशाच नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. जेणेकरून येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत योग्य त्यावेळी पोहोचू शकेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा