Ram Navami 2023 Date : रामनवमी 2023 मराठी माहिती

 

Ram Navami 2023 Date : रामनवमी 2023 मराठी माहिती

चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात नव्या दिवसाला रामनवमी म्हणतात. वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यांतील हा सर्वात मोठा उत्सव. दुष्ट शक्तींना ज्यावेळी भूतलावरील सज्जनांना भगवान करून सोडले तेव्हा या दृष्टी शक्ती निर्दालनासाठी श्रीविष्णुने भूतलावर अवतार घ्यावयाचे मान्य केले होते. हा अवतार म्हणजे प्रभू रामचंद्र.राम या शब्दाचा अर्थ अतिशय सुंदर असा आहे. राम म्हणजे स्वयंप्रकाश! अंतःप्रकाश! आपल्या आत्म्याचा प्रकाश.. राम
चैत्र नवरात्रात नवव्या दिवशी भगवान विष्णुचा सातवा अवतार म्हंटल्या जाणारे प्रभु श्रीराम या भुतलावर जन्माला आले.चैत्र शुध्द नवमी तिथीला रणरणत्या उन्हात दुपारी सुर्य माथ्यावर असतांना बारा च्या सुमारास प्रभु श्रीराम जन्माला आले आणि ही भुमी पतित पावन झाली. ज्याला पाहुन मन रमते, आकर्षित होते, मानुष्य सगल विसरतो, मुग्ध होता, भरवुन जातो अशी व्यक्‍ती म्हनजे राम. या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला.तेव्हा अयोध्येचा राजा देशाराज्य करित होता.त्याच राज्य मोठं व सुखी होतं; परंतु राजा मात्र दुखी होता. कारण त्याला मूलबाळ नव्हते; म्हणून त्याने वशिष्ठ ऋषींच्या सांगण्यानुसार मोठा यज्ञ केला. या यज्ञामुळे देव प्रसन्न झाले. व इच्छा लवकर पुरी होईल असा आशीर्वादही दिला. काही महिने निघून गेले ....

Ram Navami 2023

Ram Navami 2023 : रामनवमी 2023 मराठी माहिती


वशिष्ठ ऋषींनी सांगितल्याप्रमाणे दशरथाने यज्ञ केला त्यानंतर काही महिन्यांनी काय झाले...? हे जाणून घेण्यासाठी वाचन ठेवा...

काही महिने निघून गेले ......आनंदी वातावरण आयोध्या नगरीत दिसू लागले. कौशल्या राणी प्रस्तुत प्रसूत झाली .तिला मुलगा झाला हा मुलगा म्हणजे राम. श्रीराम जन्मला आले ती वेळ मध्यांनीची होती. नक्षत्र पुनर्वसू होते साऱ्या राज्यभरात हत्तीवर बसून मोठमोठ साखर वाटली. मोठे पनीर आम्हाला वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी ठेवले. शिक्षणात बारा वर्षे गेली राम हा सत्यवचनी व आज्ञाधारक होता. लढाईत अचूक बाण मारीन असे म्हणून रामबाण असा आता संकेत ठरला आहे. कित्येक राक्षसांना त्याने ठार मारले. हनुमानाच्या साहाय्याने रावणाचा वध  केला. रामाने पुढे अनेक वर्ष उत्तम राज्य कारभार केला प्रजेला सुखात ठेवलं. कॅनॉल रट्टास दिला नाही .आजही आदर्श राज्य म्हणजे राम राज्य ही वस्तुस्थिती आजच्या लोकशाहीतही मानली जाते .आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे बाबतीत सुद्धा गांधीजींनी राम राज्याचा आदर्श सर्वांच्या नजरेसमोर ठेवला होता. महर्षी वाल्मिकींनी आपल्या रामायणामध्ये राम राज्य कसे होते. याचे वर्णन केले आहे .राम राज्याच्या काळात कुठल्याही स्त्रीला विधवापणाचे दुःख नव्हते प्रजेला सर्प किंवा व्याधीचे भय नव्हते. चोर किंवा चोरी यांची नवनिशांनी नव्हती. कुठल्याही प्रकारचा अनर्थ ऐकू येत नव्हता, या काळात कुठल्याही प्रकारची हिंसा होत नव्हती. सर्वजण रोग शोकापासून मुक्त होते.

मर्यादा पुरुषोत्तम

मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम प्रभु आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ असुन भारतीयांच्या हृदयात कायम विराजमान आहेत.भगवान श्रीरामाच्या येण्याने आणि त्यांच्या जगण्याने संपुर्ण राष्ट्राला जगण्याचा पथ दाखविलेला आहे.मर्यादा पुरूषोत्तम श्री राम यांच्या आचरणातुन प्रत्येकाला एक उत्तम उदाहरण मिळालेले आहे.वास्तवामध्ये हे राज्य लोककल्याण नजरेसमोर ठेवूनच चालत होते. रामाने दुसऱ्याला दिलेले वचन पाळण्यासाठी अनंत हलापिष्ट सहन केल्या दृष्टावर वाचक बसविणे व सज्जनांना अभय देणे ,हे त्याचे जीवित कार्य होते. राम एक बानी, एक वचने व एक पत्नी होता; म्हणूनच रामचंद्राला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. यापुढील असेही म्हणता येईल की, श्रीराम हे आदर्शपुत्र, आदर्श ,पती, बंधू, शिष्य, पिता व आदर्श राजा होता. आराम हा विष्णूचा अवतार म्हणून सर्व लोक त्याला देवा समान मानू लागले. रामाची देवळी झाली नंतर देवळात राम नवमीचा उत्सवही सुरू झाला. या दिवशी दुपारी गावातील मंडळी देवळात येतात. कथे करीन चे किर्तन ऐकतात. त्यात राम जन्माची कथा सांगतात. दुपारी बारा वाजता रामाचा जन्म झाले. म्हणून त्याचवेळी हा जन्मोत्सव साजरा करतात. यावेळी पाळण्यात श्रीरामाची हे फोटो ठेवलेला असतो .साऱ्या देशभर हा जन्मोत्सव साजरा होतो. अयोध्ये तो मोठ्या प्रमाणात होतो राम वनवासात असताना पंचवटीत राहत होते, म्हणून पंचवटीत उत्सव मोठा होतो.

रामनवमीचा इतिहास – Ram Navami History

हिंदु बंधुबांधव हा दिवस अत्यंत उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतात.चैत्र नवरात्रात नऊ दिवस ठिकठिकाणी रामायणाचे पारायण, भजन, किर्तन, प्रवचानाचे आयोजन करण्यात येतं.प्रभु रामचंद्राच्या जिवनावर, कार्यावर प्रकाश टाकला जातो.नवरात्राच्या नवव्या दिवशी रामचंद्राच्या जन्माचे किर्तन होते आणि घडयाळाच्या काटयावर ठिक बारा वाजता रामाचा जन्म केला जातो.फटाके फोडुन, रोषणाई करून आनंद साजरा केल्या जातो. रामाच्या मुर्तिला हार आणि गाठी घातल्या जातात.आरती आणि प्रसाद वितरण केल्या जाते. प्रसाद म्हणुन सुंठवडा वितरीत केला जातो.प्रभु रामचंद्राच्या मुर्तीला पाळण्यात ठेउन आवर्जुन पाळणा म्हंटल्या जातो. अनेक ठिकाणी रामचंद्राचे संपुर्ण कुटुंब या झाॅंकीत दाखविले जाते. झाॅंकी देखील प्रदर्शनात ठेवल्या जातात.
रामाच्या गोष्टी ऐकून त्या नेहमी कृतीत आणाव्यात मुलांना संध्याकाळी रामरक्षा स्त्रोत म्हणावयास घराची मंडळी सांगतात. या पृथ्वीवर रामासारखा राजा झाला नाही, आणि होणार नाही श्रीराम आपल्या अमोघ पण पवित्र शौर्य बद्दल इतके प्रसिद्ध होते ,की प्रत्येक श्रीकृष्णांनी आत्मविभूती सांगताना राम शास्त्रामृता महम अशी त्यांची गीतेत प्रशस्ती केली आहे. श्रीरामाच्या या महिम्यामुळेच आपण सारे उत्साहाने आणि भक्तीने रामनवमी साजरी करतो. इतकेच काय, एकमेकांशी कुठेही गाठ पडली, तरी लोक याच रामनामाने एकमेकांना अभिवादन करतात व म्हणतात ‘राम राम!’ 


प्रश्न 1: 2023 मध्ये रामनवमी कधी आहे?

उत्तर: 30  March

प्रश्न 2: रामनवमीचा शुभ मुहूर्त कोणता आहे?

उत्तर: 11:06 ते 13:38

प्रश्न 3: रामनवमी कधी येते?

उत्तर: रामनवमी चैत्र महिन्याच्या नवरात्रीच्या नवव्या तारखेला असते.

प्रश्न 4: राम नवमीला राम नवमी का म्हणतात?

उत्तर: कारण याच दिवशी भगवान रामाचा जन्म झाला होता.

प्रश्न 5: चैत्र नवरात्र कधी सुरू होत आहे?

उत्तर: 22 March pasun

राम ज्यांचे नाव आहे
अयोध्या ज्यांचे गाव आहे.. 
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.

दशरथ नंदन राम, 
दया सागर राम, 
रघुकुल तिलक राम, 
सत्यधर्म पारायण राम, 
श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!

दशरथ नंदन राम, 
दया सागर राम, 
रघुकुल तिलक राम, 
सत्यधर्म पारायण राम, 
श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर