गुढीपाडवा 2023 गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने का खाल्ली जातात? | Gudi Padwa Information In Marathi
गुढीपाडवा 2023 माहिती, महत्त्व, पूजा विधी | Gudi Padwa Information In Marathi
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील खुप महत्त्वाचा सण आहे.गुढीपाडवा हा सत्संकल्पांचा दिवस मानला जातो.हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा (Gudi Padwa 2023). यंदा गुढीपाडवा 22 मार्चला येत असून या दिवशी सकाळी घरोसमोर गुढी उभारली जाते. महाराष्ट्रात नविन वर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा सण साजरा केला जातो. या वर्षी 22/3/ 2023ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी पूर्व क्षितिजावर सर्व ग्रह जवळजवळ शून्य अंशात असतात. म्हणजे पूर्व क्षितिजावर चंद्र असतो,मेष रास असते, सूर्य असतो आणि अशा रीतीने तेथून सुरुवात होते मंडलात फिरायची. मात्र नंतर प्रत्येक ग्रह आपापल्या गतीप्रमाणे फिरत राहतो.या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेय या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे. कडुलिंबाची (Neem Tree) कोवळी फुले,पाने, जिरे , हिंग ,चण्याची भिजलेली डाळ, मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. पण यामागाचं सत्य कारण काय आहेत ते जाणून घ्या...
गुढीपाडव्यादिवशी कडुलिंबाचे महत्त्व काय जाणून घ्या ....
गुढीपाडव्यादिवशी कडुलिंबाचे वेगळेचं महत्त्व आहे. ही पाने सदापर्णी आणि सदाहरितआहेत.कडुलिंबाची पाने ही जंतुनाशक असल्याने गुढीवर लावतात.कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहात असून यामध्ये कफ, ताप, उष्णता, पित्तनाशक असे अनेक गुण कडुलिंबामध्ये समाविष्ट असतात.वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे कडूलिंबाचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. यामुळे खोकला बरा होतो आणि आरोग्याला नवसंजीवनीही मिळते. त्यामुळेच याचा उपयोग गुढीपाडव्याला केला जातो. याचे पाने, फुले, खोड हे सर्व घटक औषधाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक दुर्धर नाहीशा करण्याचे गुण कडुलिंबात आहेत. त्यामुळे घरात येणाऱ्या रोगजंतूंना अटकाव होतो.साथीच्या आजारांना प्रतिबंध व्हावा म्हणून तसेच इम्युनिटी वाढण्यासाठी ही कडुलिंबाच प्रसाद उत्तम आहे. या प्रसाद फुले,पाने, जिरे , हिंग ,चण्याची भिजलेली डाळ, मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. घराघरांत हे माहिती असते. कडुनिंबाची वाळलेली पाने जाळली तर मच्छर-डासांपासून रक्षण होते.
जोपर्यंत मन प्रसन्न नसेल तोपर्यंत आरोग्य नीट राहत नाही. त्यामुळे या दिवशी सिनेमा, संगीत, नाटक, वगैरेंचा लाभ घेऊन कुटुंब आनंद घेतात. सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन वर्षभर मिळून चांगले काम करू, एखादा उद्योग सुरू करू, प्रगती करू, वगैरे ठरविले जाते. अशा रीतीने गुढीपाडवा हा मनुष्यमात्रासाठी आरोग्याचा एक उपचार आहे,आत्मिक आरोग्याचा उपचार आह, मानसिक आरोग्याचा उपचार आहे.आणि तो प्रत्येकाने त्यातील वैज्ञानिकता लक्षात घेऊन साजरा केला तर त्याचे खरे प्रयोजन पूर्ण होऊ शकते. सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा