मकर संक्रांत 2023
मकर संक्रांत 2023
1. मकर संक्रांत कधी आहे?
2. कशावर बसली आहे?
3. वाहन आणि वस्त्र कोणते?
4 कोणत्या दिशेने जात आहे?
5. दान काय द्यावे?
प्रत्येक महिन्यात सूर्य एक रास बदलतो मकर संक्रातीच्या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशित प्रवेश करतो. त्यामुळे त्याला मकर संक्रात असे म्हटले जाते. सूर्य धनु राशि प्रवेश करतो. तेव्हा विवाह केले जात नाहीत. त्यानंतर दरवर्षी मकर संक्रांतीला सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत जातो. या दिवसापासून सर्व प्रकारचे शुभकार्य सुरू होतात. दरवर्षी मकर संक्रांति हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. पण 2023 मध्ये मकर संक्रांति 14 जानेवारीला साजरी होणार आहे, की 15 जानेवारीला साजरी होणार आहे..
मकर संक्रातीच्या शुभमुहूर्त आहे काय आहे? कशावर बसली आहे? वाहन आणि वस्त्र कोणते परिधान केले आहेत? कोणत्या दिशेने जात आहे? दान काय द्यावे? संक्रातीच्या पुण्यकाल काय आहे? हे सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या ब्लागमध्ये जाणून घेऊयात...
नमस्कार मी प्रियंका तुम्हा सर्वांचं आपल्या ब्लाग मध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. नवीन वर्ष सुरू होऊन केवळ काही दिवसच झाले आहेत. नवीन वर्षात पहिलाच महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांतीचा असतो. परंतु नेहमी मकर संक्रांतीच्या तिथी बाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.
2023 मध्ये 14 तारखेला आहे की 15 तारखेला आहे. आता जाणून घेऊयात हिंदू दिनदर्शिका नुसार 2023 मध्ये मकर संक्राती 15 जानेवारी रोजी म्हणजेच रविवारी साजरी केली जाईल. हे लक्षात घेता की, 14 जानेवारी रोजी रात्री आठ वाजून 21 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. आणि 15 जानेवारी 2023 रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांति आपल्याकडे साजरी केली जाईल. या दिवशी सूर्याला अर्ध देण्याला विशेष महत्त्व आहे. याशिवाय या दिवशी स्नान तीळ घालून करावी. तिळगुळ ,जमीन ,पैसा ,कपडे ,ब्राह्मणाला दान ,मंदिरात दान इत्यादी दान करण्याची परंपरा आहे. तर संक्रातीचा पुण्यकाळ हा रविवार दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आहे. तर आपल्याकडे अशी मान्यता आहे की, मकरसंक्रातीने ज्या वस्तू परिधान केले आहेत. तर ते आपल्याकडे आपण घालत नाही. म्हणजेच मकर संक्रातीने वस्त्र कोणते परिधान केले आहे. कशा तरी या सर्व सर्वांची माहिती आपण आता यापुढे जाणून घेऊयात...
मकर संक्रांती निवस्र कोणते परिधान केले आहे?
सूर्याचे मकर संक्रमण बाल तरणावर असल्याने वाहन वाघ असून उपवान घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून ,हातात गदा घेतला आहे. तसेच कपाळी केसरी लावला आहे. व यांनी ती कुमारी का असून बसलेली आहे. वासा करता जाईचे फुल हातात घेतले आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहेत. वार नाव राक्षसी असून नक्षत्र नाव मंदाकिनी आहे. व सामुदाय मूर्तीस आहेत. दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. व ईशान्य दिशेस पाहत आहे. म्हणजेच मैत्रिणींनो संक्रातीला संक्रातीने ज्या ज्या गोष्टी म्हणजे वस्तू परिधान केलेला आहे. त्या आपण वापरायचा नाही. तशीच अशा आपल्याकडे मान्यता आहे .तर तिने यावर्षी पिवळे वस्त्र घातलेला आहे. तर पिवळे वस्त्र पण आपल्याला घालायचे नाहीयेत. तसेच तिने जायचे फुल वासाकरता हातात घेतले, तर जाईच्या फुलाचा गजरा वगैरे पण आपण घालायचा नाही. ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत, त्या वस्तू महाग होतील. पर्व काळात द्यायचे दान नवे भांडे, गाईला घास, अन्न तीळपात्र, गुळ तीळ, सोने ,भूमी, गाय, वस्त्र ,घोडा इत्यादी आपल्याला दान करायचे आहे.
किंक्रांत
मकर संक्रांतिच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात आहे. सोमवार दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी साजरी करण्यात येईल. संक्रातीमध्ये वर्ज करायची कामे आहेत. कठोर बोलणे ,दात घासणे, व वृक्ष गवत तोडणे ,गाई म्हशींची धार काढणे ही कामे करू नयेत. तर मकर संक्रातीच्या शुभ मुहूर्तावर गंगास्नान, उपवास, कथा, दानधर्मानी, भगवान सूर्यदेव यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. तसेच त्या दिवशी सूर्याला अर्ज देण्यालाही विशेष महत्त्व आहे.
किंक्रांतीची माहिती
संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. संक्रांति देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या त्रासापासून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. हा दिवस अशुभ मानला जातो.
पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवला जातो. या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हाथ घालू नये. भोगीच्या दिवशीची राखून ठेवलेली शिळी भाकर खावी. केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी. दुपारी हळदी कुंकू करावे अशा काही प्रथा महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात.
दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस हा 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा केला जातो.या दिवशी गाई,बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात.त्यांच्या शिगांना बेगड लावून त्यांना सजवतात.गुरांना दुपारी गोडधोड जेवू घालतात.व दिवसभर मोकळे सोडतात.
संध्याकाळी गावातुन मिरवूण आणतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी ची सकाळची ही आंघोळ
संक्राती दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून, अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ आणि गंगाजल. काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे. काही भागांमध्ये संक्रांतीच्या दिवशी तीळ, आणि डाळ खिचडी चे सेवन इत्यादींचे सेवन केले जाते. तर करायचे आहेत.
पहिला दिवस भोगीचा दुसऱ्या दिवशी किक्रांत साजरा करत असतो. संक्रातीच्या दिवशी आपण मित्रमंडळींना लहान मुलांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत तिळगुळ वाटतो. म्हणून तिळगुळ देत असतो. स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे सांगून स्नेहबंध होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासूनच हळदी कुंकू करतात. रथसप्तमी हा संक्रातीच्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरिबांना दान करा. या दिवशी दान केल्याने शुभ प्राप्त होते. त्या दिवशी खिचडी खाण्याची परंपरा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या सणाला खिचडीचे पर्व म्हणूनही ओळखले जाते. आपली भारतीय सणवार उत्सव यांना धार्मिक सांस्कृतिक कारणे तर आहेत. त्याबरोबर शास्त्रीय कारणे सुद्धा आहे. तर आपण मकर संक्रांतीला तिळगुळ खातो. तसेच पतंग उडवल्या जातो. किंवा काळे कपडे परिधान केले जातात.
शास्त्रीय कारणे
या पाठीमागे शास्त्रीय कारण सुद्धा आहेत. मकर संक्रांतीला तीळ आणि गुळ यांचे लाडू किंवा वड्या करण्याची पद्धत आहे. यामागे भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यातील किंवा गोळी यांचा गोडवा भरवायचे असे म्हटले जाते. पण या गोष्टीला ही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. तीळ हे उष्ण आणि स्निग्ध असतात. थंडीत शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची आवश्यकता असते. तसेच गुळातही उष्णता असल्याने या पदार्थाचे सेवन केले जाते .तसेच आपल्याकडे या सणाला पतंग हा उडवला जातो. विशेषता गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये पतंगाचा सण म्हणून ओळखला जातो. यामध्ये करमणूक होणे हा उद्देश असला तरीही शास्त्रीय कारणे आहे. पतंग सकाळी सकाळी उठून उडाल्याने शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात विटामिन डी मिळते. याने थंड हवेपासून होणाऱ्या समस्या पासून दूर होण्यास मदत होते.
आपली संस्कृती परंपरा आपल्या आजी आजोबांच्या खाण्याच्या सवयी जाणून घेऊया व पुढील पिढीला योग्य ते ज्ञान देऊया तर मैत्रीनीनो दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल. आणि लवकरच मी आपल्याला सुगडपूजनाविषयी माहिती घेऊन येणार आहे.....
*मकर संक्रांत कधी आहे?
हिंदू दिनदर्शिका नुसार 2023 मध्ये मकर संक्राती 15 जानेवारी रोजी म्हणजेच रविवारी साजरी केली जाईल.
*कशावर बसली आहे?
वाहन वाघ असून उपवान घोडा आहे.
*वाहन आणि वस्त्र कोणते?
सूर्याचे मकर संक्रमण बाल तरणावर असल्याने वाहन वाघ असून उपवान घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून ,हातात गदा घेतला आहे.
*कोणत्या दिशेने जात आहे?
दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. व ईशान्य दिशेस पाहत आहे.
*दान काय द्यावे?
पर्व काळात द्यायचे दान नवे भांडे, गाईला घास, अन्न तीळपात्र, गुळ तीळ, सोने ,भूमी, गाय, वस्त्र ,घोडा इत्यादी आपल्याला दान करायचे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा