महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर
महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर
कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.
हे महालक्ष्मीचे मंदिर चालुक्य राजांनी इ.स.सातव्या शतकात बांधले गेले.हे तीर्थस्थान मातृक क्षेत्र म्हणजे करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र मानले जाते. कोल्हापूरनिवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महलक्ष्मी जगदंबा हिच्या देवळामुळे कोल्हापूरला महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रात देवीची साडे तीन शक्तिपीठे मानली जातात. कोल्हापुरं महास्थानं यंत्र
लक्ष्मी सदा स्थिता l मातुः पुरुं द्वितीयंच रेणुकाधिष्ठितम् l तुळजापूर तृतीयं स्यात् सप्तशृंग तथैवच ॥
या वर्णनाप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आर्ध शक्तिपीठ आहे. दुसरे माहूरची रेणुका माता, तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर सप्तशृंगीची देवी हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते.
हे मंदिर पौरोणात उल्लेख केलेला.108 मंदिरांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे मंदिराच्या काळ इसवी सन सहाशे ते सातशे या दरम्यान बांधलेले असावे असे वाटते.
किरणोत्सव सोहळा
महालक्ष्मीच्या मंदिरात होणारा किरणोत्सव सोहळा म्हणजे दिशा साधकांद्वारे साधण्यात आलेला, अलौकक चमत्कार. अंबाबाईच्या मंदिराची बांधणी 9 व्या ते 12 व्या या शतकामध्ये झाली असावी असा अंदाज आहे. संपूर्ण मंदिरात हवा आणि प्रकाश यांचा संपूर्ण मेळ घालण्यासाठी दिशांचा योग्य प्रकारे अभ्यास केल्याचे दिसून येते. करवीर निवासिनी माता महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मंदिर प्रांतात एकूणच मंदिर परंपरेमध्ये सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजे किरणोत्सव. सूर्यनारायणाची मावळती किरण आदिशक्तीच्या दर्शनाला येतात. हेच महत्त्वाचे 9,10, 11 नोव्हेंबर हे दक्षिणायनातील दिवस तर उत्तरायणामध्ये 31 जानेवारी आणि 1,2 फेब्रुवारी हे पारंपारिक किरणोत्सव ची दिवस. वर्षानुवर्ष या किरणोत्सवाचा सोहळा पाहताना भाविक अगदी तृप्त होऊन जातात. मावळत्या सूर्यकिरणामुळे देवीला येणारे तेज अत्यंत विलोभनीय दृश्य असते. 1800 शतकामध्ये रचलेल्या लक्ष्मी विजय नावाच्या ग्रंथामध्ये कोल्हापूरला मारल्यानंतर त्याच्या शरीराला शरीरामधून जे प्राण बाहेर पडले. त्या प्राण्यांचे तेज पहिल्यांदा जगदंबेच्या चरणावर दुसऱ्या वेळी छातीवर व पुन्हा चेहऱ्यावर पुन्हा छातीवर पुन्हा चरणावर असा क्रमांक त्या तेजाचा असा क्रम झाला असेल लक्ष्मी विजय या ग्रंथांमध्ये आपल्याला आढळतो.
मंदिराची रचना
हरी गोपाळ नांदगावकर यांच्या लिखित या कथनाची प्रचिती 1946 साली कोल्हापूर महानगरपालिकाने निरीक्षण नोंदवले त्यामध्येही आपल्याला पाहावयास मिळते. अंबाबाई मंदिराचे बांधकाम हे काळ्या दगडात आहे. मंदिराच्या सभोवती भव्य अशा दगडी तटबंदी व चारही बाजूला भली मोठी प्रवेशद्वारे आहेत. त्यातील पश्चिम दरवाजा म्हणजे महादरवाजा उत्तर दिशेचा दरवाजा म्हणजे घाटी दरवाजा हीच या दरवाजांची ओळख. उर्वरित दरवाजे पूर्व व दक्षिण दिशेला आहेत. या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर मंदिराचे भव्य अशी कलाकुसर वास्तू समोर दिसते. मंदिराची स्थापत्य जर पाहिले तर अकराव्या व बाराव्या शतकात बांधले आहे. 12 व्या शतकात बांधलेले गरुड मंडपाचा या कमानीतून किरणोत्सवाचा शिल्पांमध्ये झालेला आहे. किरणोत्सव सर्वात मोठा उत्सव मानला जातो. चेहऱ्यावरती छातीवरती मग चेहऱ्यावरती असा किरणोत्सव स्पर्श केल्याच्या त्यानंतर प्रवास झाल्यानंतर सर्वात मोठी ही आरती होती. व सर्वात मोठ्या घंटेचा निनाद होतो. अशाप्रकारे किरणोत्सव आनंदाने साजरा केला जातो. मोठ्या आनंदाने संपन्न होतो. अंबाबाई मंदिरात प्रवासी पर्यटक भावी यांची रेलचेल पहावयास मिळते. व भरपूर प्रमाणात गर्दी असते. त्यात किरणोत्सव प्रेमी हे दोन वेळा मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात. हा सोहळा याची डोळी, याची देही अनुभवण्यासाठी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी उसळलेली असते. कलेचा एक अत्यंत चांगले उदाहरण म्हणजे ले कोल्हापुरातील हे करवीर निवासने अंबाबाईचे मंदिर. आणि या मंदिरात होणारा किरणोत्सव सोहळा. हा वर्षातून दोन वेळा आपणास अनुभवास मिळतो. या मंदिरातील गरुड सभा मंडपातील कमानी पासून ते सूर्यकिरणे आई अंबाबाईच्या मूर्तीवर विराजमान होतात. मावळतीची सूर्यकिरणे मंदिराचे या कमानेतून आत जातात. हा विलोभनीय दृश्य हा सोहळा पाहण्यासाठी वेगवेगळ्या भागातून जिल्ह्यातून राज्यातून जगभरातून लाखो व्हावे येथे येत असतात. अद्भुत घटना घडवून आणण्यासाठी खगोलशास्त्राचा अत्यंत खोलवर अभ्यास केलेला आहे. मंदिराच्या बांधकामावेळी याचा प्रत्यय येथे येत असतो. हे अद्भुत खगोलीय घटना घडवून आणण्यासाठी मंदिर बांधतेवेळी या खगोलशास्त्राचा अत्यंत बारकाईने अभ्यास झाला असावा.
मंदिराच्या या दगडी व विशिष्ट बांधकामामुळे दिवसभरात मंदिरात कधीही सूर्यकिरणी आत येत नाहीत. पण उत्तरायण व दक्षणायनामध्ये किंवा सोहळ्या वेळी याच परिसरातून मूर्तीच्या माथ्यापर्यंत किरीटापर्यंत येत असतात. व किरणांचा अभिषेक होतो. या अल्पकाली सूर्यनारायणाचा अद्भुत चमत्कार हजारो वर्ष पूर्वीचे असामान्य वास्तू निर्माण करणारे शिल्पकार किती प्रतिभा संपन्न होते, याची प्रचिती नक्कीच प्रत्येकाला येऊन जाते.
खगोलशास्त्राचा व हेमाडपंथी बांधकामाचा व स्थापत्य शैलीचा अद्भुत व उत्तम नमुना म्हणजेच हा किरणोत्सव सोहळा.डोळ्यात साठवण्यासारखा क्षण असतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा