श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट

  "पुंडलिकासाठी आले परब्रम्ह तैसे 
  चोळपांसाठी राहिले स्वामी समर्थ"

श्री स्वामी समर्थांचे परमभक्त चोळप्पा महाराजांच्या जन्मोजन्मीच्या चांगल्या कर्मामुळे श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने त्यांचे घर पावन झाले.
नमस्कार मी प्रियंका पवार आपल्याला या लेखातून श्री स्वामी समर्थांचे समाधी मठ व चोळाप्पा महाराजांचा वाडा याबद्दल माहिती सांगणार आहे .त्याविषयी सांगणार आहे.  इ.स.1856 सुमारास स्वामी समर्थ अक्कलकोटास आले. मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा ते अक्कलकोट नगरीत प्रवेशले, तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला. तो दिवस चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, अनल नाम संवत्सरे,रविवार दि. ०६/०४/१८५६ हा होता
संप्रदायदत्त संप्रदाय
भाषामराठी
कार्यमहाराष्ट्र व कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार
प्रसिद्ध वचन'भिऊ नकोस,
मी तुझ्या पाठीशी आहे'
संबंधित तीर्थक्षेत्रेअक्कलकोट, गाणगापूर
परमभक्त चोळपा महाराज यांच्या निवासस्थानी 1856 साली श्री स्वामी समर्थ महाराज चोळपामहाराज यांच्या घरात येऊन राहिले. आणि 21 वर्ष निज वास्तव्य केले. श्री खंडोबा मंदिर येथे श्री स्वामी समर्थांचे प्रथम आगमन स्थान मानले जाते. तेथे श्री स्वामी समर्थ यांनी तीन दिवस मुक्काम केला होता. अक्कलकोट बस स्थानकापासून पाच ते दहा मिनिटात चालत गेल्यावर  श्री स्वामी समर्थ समाधी मठ लागते. समाधी मठाचा कळस आपल्याला दक्षिण भारतातील मंदिराप्रमाणे भासतो. महाराज श्री स्वामी समर्थ यांनी चोळप्पा यांच्या घरी बराच काळ घालवला आहे. तर आपण जाणून घेऊया चोळप्पा महाराजांचा वाडा  महाराजांचे चोळापाच्या घरी घरचे अक्कलकोटचे वास्तव .त्यांनी तेव्हा त्यांच्या घरीच बराचसा काळ घातला या लेखातून आपण चोळप्पा यांच्या घराची माहिती व श्री स्वामी समर्थ समाधीची माहिती घेणार आहोत.

।।श्री स्वामी समर्थ यांचे परमभक्त
 चोळाप्पा महाराजांचे घर।।

समाधी अक्कलकोट येथील बुधवार पेठेतील मठात आहे. त्यांनी जिथे देह निजानंदी निमग्न केला व सतत जिथे त्यांचे वास्तव्य असे, त्या वटवृक्षाची साक्ष देत असलेला श्री वटवृक्ष स्वामी महाराज मठही विख्यात आहे.

चोळप्पा व बाळप्पा हे त्यांचे प्रमुख शिष्य होते. बाळप्पांच्या मठात त्यांचा दंड, रुद्राक्षमाळ व पादुका असून तो मठ गुरुमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. चोळप्पांच्या घराजवळच त्यांचे समाधिस्थान असल्याने बुधवार पेठेत तो समाधिमठ म्हणून प्रसिद्ध आहे. ‘द्या’ म्हणून प्रार्थना केल्यास जे दिले जाते, त्याला ‘दत्तकृपा’ असे म्हणतात. दत्तांची परंपरा व त्यांचे अवतारित्व यांविषयीचा उल्लेख त्यांच्या ‘श्रीगुरुचरित्र’ व ‘श्रीगुरुलीलामृत’ या दोन प्रमाणग्रंथांत पाहावयास मिळतो.

गेल्या एक-दोन वर्षातच या मंदिराची नूतनीकरण झालेले आहे. मठात आत  चोळप्पा महाराजांचा मोठा फोटो आहे. मठात स्वामींच्या काही लीला आपणास फोटो स्वरूपात पाहण्यास मिळतात. समाधी मठाला दररोज फुलांनी सजवतात त्यामुळे समाधी मठाची सुंदरता अजूनच वाढते. समाधी मठाचा सुरुवातीलाच वर स्वामी समर्थांचा फोटो आहे. पादुकांचे  दर्शन घेऊ शकतात. मठात भाविकांची रेलचेल कायमच पाहायला मिळते. मुख्य गाभाऱ्याच्या बाजूलाच स्वामींचे परमभक्त चोळाप्पा महाराज यांची मूर्ती आहे.  मुख्या गाभाऱ्याच्या मुख्य दरवाजावर श्री दत्त परंपरेतील श्री दत्तगुरु श्रीपाद वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थांचे फोटो आहेत व मधोमध नागदेवता आहे.

 10:30 ची स्वामींची वस्त्रालंकार पूजा

सर्वप्रथम स्वामींच्या समाधीला स्वच्छ पाण्याने धुतले जाते. त्यानंतर त्यावर दुधाभिषेक करतात. मंत्रोपचारामुळे गाभाऱ्यात अध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. स्वामींचे पादुका मागे स्थापन करतात. मग पुन्हा पाण्याने समाधीला स्वच्छ पाण्याने धुऊन घेतात. व पुसून घेतात. त्यानंतर स्वामींना प्रिय असलेले हिना अत्तर समाधीवर शिडंकवण्यात येते. त्यानंतर हिना अत्तर मिश्रित श्री चंदनाचा लेप समाधीला लावतात. खूप प्रसन्न वाटतं… त्यानंतर सामाधीला बेल ,पान ,फुलं वाहतात. त्यानंतर समाधीला चांदीच्या पत्र्याने झाकून देतात. व त्यानंतर समाधीवर स्वामींचा मुखवटा बसवतात. मग स्वामींना वस्त्र घालून हार फुलांनी सजवण्यात येते. त्यानंतर स्वामीना किटक प्रधान  करण्यात येते. दोन्ही कानांना मत्स्य बसवण्यात येतात. समाधीला सजवल्यानंतर स्वामींचे रूप एकदम देखणे सुंदर वाटते.

श्री चोळप्पा महाराज यांचा वाडा
स्वामींचे परमभक्त सोळाप्पा महाराज यांचा वाडा पाहण्यासाठी खूप सुंदर आहे. समाधी मठाला भेट दिल्यानंतर अवश्य पहावा स्वामींनी हाताळलेल्या वस्तू येथे आहेत.स्वामीच्या अस्तित्वाची जाणीव होते. स्वामी खरोखर येथे वास्तव्य केले. याची निशाणी म्हणून खूप सार्‍या वस्तू आहे. की स्वामी येथे वास्तव्याला होते. समाधी मठात म्हणा किंवा महाराजांच्या वाड्यात स्वामी  येथेच आहे असा भास होत असतो. तेथे तुम्हाला स्वामींच्या अस्तित्वाची सतत जाणी होत असते. एकेकाळी ते देह रूपाने येथे या ठिकाणी वावरत होते पण आजही शक्ती रूपाने ते आपल्या पाठीशी कायम आहे. याची अनुभवती येथे क्षणाक्षणाला येते.

गणेश मूर्ती
चोळप्पा महाराज यांच्या वाड्यात गणेश मूर्ती आहे. 
या अनोख्या गणेश मूर्तीची कथा अशी की, येथेच मागे स्वामींच्या स्नानांची जागा होती.स्वामी समर्थ महाराज यांनी समाधी घेतल्यानंतर त्या जागी रुईचा झाड आलं आणि 21 वर्षानंतर त्या खोडामध्ये 1866 साली हा गणपती प्रकट झाला. या गणपतीला मंदार गणेश असे नाव आहे. 

वाड्यात एक राजदंड आहे. तो स्वामींना बडोद्याच्या संस्थानकांनी अर्पण केला आहे.तेथे स्वामी समर्थांच्या अंघोळीचा हंडा देखील आहे. यांच्या घराच्या बाजूला श्री स्वामी समर्थ भंडारखाना आहे अत्यंत प्रिय गाय कपिला समाधी देखील आहे बीड जिल्ह्यातील नानासाहेब देशपांडे यांची समाधी देखील येथे आहे.

 कुशावर्ततिर्थ विहीर
 स्वामींच्या पूजेसाठी जे पाणी वापरले जाते ते याच कुशावर्ततिर्थ विहिरीतून वापरले जाते. या विहिरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे पाणी खूपच शुद्ध आहे. व पिण्यासाठी खूप चव देखील आहे. व ही विहीर कधीच आटत नाही.

समाधी मठाच्या बाजूलाच औदुंबराच्या झाडाखाली छोटी छोटी मंदिरे आहेत व स्वामींनी स्थापित केलेले दत्त मंदिर देखील आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शनैश्वर मंदिर, श्री हनुमान मंदिर, म्हसोबा मंदिर येथे आहेत. 

श्री स्वामी समर्थ समाधी मठ म्हणजे चोळप्पा महाराज यांचे निवासस्थान या निवासस्थानी 1856 सली श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट मध्ये चोळप्पा महाराज यांच्या घरात येऊन राहिले. 21 वर्ष तेथे वास्तव्य केले. 1869 साली स्वामी समर्थ महाराज यांनी वाड्याचा अंतर्गत पोषण पाडून समाधी मठाचा दगडी बांधकाम स्वतः महाराजांनी करून घेतले.व आत मध्ये जसा गाभारा आहे. तसाच खाली एक तळघर महाराजांनी बांधून घेतलं आहे. त्याला ब्रम्हानंदी गोवा असे नाव दिलेले आहे. 1872 साली बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आत मध्ये  कोटेश्वर नावाचा शिवलिंग, गणपती, खंडोबा, मयुरेश्वर नावाचा गणपती खंडोबाच्या मूर्ती, व दत्ताचे पदस्पर्श, स्वतः त्यांनी तिथे स्वामी समर्थांनी बांधून त्याची स्थापना केली.  स्वामी समर्थांनी स्वतः पाच वर्ष  येथे पूजा केली. आणि चैत्र वैद्य त्रयोदशी शके 1800 ला स्वामी महाराजांनी योग समाधी लावलेली. वटवृक्षाच्या झाडाखाली त्यांचे आज्ञेनुसार त्यांचा देह येथे समाधीस्थ करण्यात आला. हे मूळ स्थान आहे स्वामी समर्थ महाराज यांचे समाधी स्थान.

चोळप्पा महाराज
चोळप्पा महाराज हे मूळचे खेड जिल्ह्यातील काही अंतरावर भीमा नदीच्या काठावर गाव आहे. या ठिकाणी राहत होते. व्यापाराच्या निमित्ताने येथे आले. व येथे स्थायिक झाले.त्यांना दोन मुले कृष्णप्पा आणी वासुदेव व बायको हे चोळपा यांच कुटुंब होतं.
 बडोद्याच्या संस्थानिकांनी स्वामी समर्थ महाराजांना हा राजदंड अर्पण गेला. त्याचा उपयोग महाराज हे छडी म्हणून करायचे.त्याप्रमाणे स्वामी महाराजांनी हंडा स्वतः  वापरलेला आहे. त्याच्यानंतर हाच स्वामी समर्थ महाराजांचा अंघोळीचा हंडा त्याच्यामध्ये आपले साधारण 40 घागरी पाणी मावेल एवढं स्वामी महाराजांना दिवसातून दोन-तीन वेळा पाणी लागायचं. चोळप्पा भरून ठेवायचे त्यासाठीच महाराणी एकली ह

हिना अत्तर आणि विडा
हिना सर्व विडा महाराजांना खाद्यपदार्थांमध्ये बेसन लाडू हे अत्यंत प्रिय असायचे

देवी रूपातील स्वामी महाराजांनी स्वामी महाराज
महाराजांचं देवीचे रूपात आदिशक्तीच्या रूपत साडी नेसलेलं रूपात दर्शन महा सर्व शेतीच्या रूपात जे आपण फोटो पाहतो त्यामागील अनेक होते त्यांना महाराजांनी दुर्गादेवीच्या आईच्या रूपात दर्शन दिलेले आहे त्यामुळे हे आधी मायेचा रूप म्हणून नवरात्रीचे पैठणी नेसवले जाते म्हणून स्वामी महाराज हे काही ठिकाणी साडी नेसलेल्या देवींच्या रूपात दिसतात.

सबसे बडा गुरू... गुरूसे बडा गुरू का ध्यास... और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज... तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...! अशा शब्दांंमधे स्वामी समर्थांंची महती वर्णन केली जाते.

अवतार कार्य समाप्ती
स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन १८७८ मध्ये त्यांचा एक आविष्कार संपविला असे नाटक केले आहे. स्वामी महाराजांचे अवतार कार्य आजही सुरू आहे. स्वामींनी अवतार कार्य संपवलेले नाही. स्वामी समर्थ महाराज आजदेखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळपर्यंत करीत राहतील. आज भी श्री स्वामी महाराज जो-जो भेटेल त्याचा उद्धार अनेक मार्गातुन करत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर