मकर संक्रांती

मकर संक्रांती

म... मराठमोळा सण
क... कणखर बाणा
र... रंगीबेरंगी तिळगुळ
सं... संगीतमय वातावरण
क्रां... क्रांतीची मशाल
त... तळपणारे तेज

सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. प्रत्येक महिन्यात सुर्य एक रास बदलतो. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांती म्हणतात.

मकर संक्रांतीला महाराष्ट्रात नुसतेच संक्रांत म्हणतात. मकर संक्रांती (उत्तरायण/ माघी/ संक्रांती), ज्याला पश्चिम बंगालमध्ये मोकोर सोनक्रांती म्हणूनही ओळखले जाते आणि नेपाळमध्ये माघे संक्रांती, येथे 'संक्रांती' म्हणजे 'हस्तांतरण', हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो. सूर्य या देवतेला समर्पित, अनेक स्थानिक बहु-दिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्याशी सुसंगत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे.

कधी असते मकर संक्रांती

लीप वर्षांमध्ये एक दिवस जोडल्यामुळे, मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते. लीप वर्षात ते 15 जानेवारीला येते, अन्यथा 14 जानेवारीला मकर संक्रांति असते.

मकर संक्रांती सामाजिक सण

मकर संक्रांती सामाजिक सण जसे की रंगीबेरंगी सजावट, ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे, मेळे, नृत्य, पतंग उडवणे, बोनफायर आणि मेजवानी यांसारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते. इंडोलॉजिस्ट डायना एल. एक यांच्या मते मघा मेळ्याचा उल्लेख हिंदू महाकाव्य महाभारतात आहे. अनेक निरीक्षक पवित्र नद्या किंवा तलावांवर जातात आणि सूर्याला धन्यवाद देण्यासाठी स्नान करतात. दर बारा वर्षांनी, हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत पाळतात - जगातील सर्वात मोठ्या सामूहिक तीर्थक्षेत्रांपैकी एक, अंदाजे 60 ते 100 दशलक्ष लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. या कार्यक्रमात, ते सूर्याला प्रार्थना करतात आणि गंगा आणि यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करतात, ही परंपरा आदि शंकराचार्यांना दिली जाते.

मकर संक्रांती का साजरी करतात?

पौराणिक कथेनुसार, असे मानले जाते की संक्रांती ज्यांच्या नावावरून या उत्सवाचे नाव ठेवले गेले आहे - ती संक्रांती नावाची देवी होती.या संक्रांती देवीने शंकरासूर नावाच्या दुष्टाला मारले होते. मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti) नंतर दुसऱ्या दिवशी करीदिन किंवा किंक्रांत असते. या दिवशी देवीने दैत्य किंकरासुरचा वध केला होता. त्यामुळे मकर संक्रांती साजरी केली जाते अशी मान्यता आहे. म्हणून मकर संक्रांति साजरी करतात.

मकर संक्रांतीचे महत्व

महाराष्ट्रात बायकां वाण देण्यासाठी पंढरपूर, मोहोरची देवी,तुळजापूर येथे खास करुन जातात.सर्व विवाहित स्त्रिया त्यांच्या पहिल्या संक्रांतीला कापूस, तेल आणि मीठ इतर सुहागणांना (विवाहित स्त्री) दान करतात.सोबत तिळ गुळ घ्या गोड गोड बोला असा संदेश दिला जातो. त्यामुळे भारतात मकर संक्रांती उत्सवाचे स्वतःचे महत्त्व आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी त्याची स्तुती केली जाते आणि साजरा केला जातो.

मकर संक्रांतीला शास्त्रीय महत्त्व 

मकर संक्रांतीला शास्त्रीय महत्त्व आहे. या दिवसाच्या काही काळ आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांती नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. उत्तरायण जरी सुरू झाले असले तरी सुरवातीला काही दिवस थंडी रहाते व नंतर उन्हाळा सुरु होतो.

इतिहास

संक्रांतीला देवता मानलेले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे.

संक्रांतीविषयी पंचांगात असलेली माहिती

पंचांगात संक्रांतीचे रूप, वय, वस्त्र, जाण्याची दिशा इत्यादी माहिती दिलेली असते. ती कालमाहात्म्यानुसार तिच्यात होणार्‍या पालटाला अनुसरून असते. संक्रांतीदेवी ज्याचा स्वीकार करते, त्याचा नाश होतो.


1. मकरसंक्रांतीला हळदीकुंकू करण्याचे आणि तेव्हा देण्यात येणार्‍या वाणाचे महत्त्व

 मकरसंक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ

‘मकरसंक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज-सत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा काळ साधना करणार्‍यांना पोषक असतो.

हळदीकुंकू करण्याचे आध्यात्मिक महत्त्व

अशा पोषक काळामध्ये हळदीकुंकू करणे हे जिवाच्या दृष्टीने जास्त लाभदायक असते. हळदीकुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते. अन् श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावणार्‍या जिवासाठी कार्य करते. हळदीकुंकू करणे, म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय. हळदीकुंकवाच्या माध्यमातून जीव एकप्रकारे दुसर्‍या जिवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जिवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते.

२. हळदीकुंकवातील पंचोपचार

1. हळद-कुंकू लावणे

2. अत्तर लावणे

3. गुलाबपाणी शिंपडणे

4. ओटी भरणे

5. वाण देणे

1. हळद-कुंकू लावणे

हळद-कुंकू लावणे, म्हणजे दुसर्‍या जिवातील श्री दुर्गादेवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तीभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय.

2. अत्तर लावणे

अत्तरातून प्रक्षेपित होणार्‍या गंधकणांमुळे देवतेचे तत्त्व प्रसन्न होऊन जिवासाठी अल्प कालावधीत कार्य करते. गंधकणांकडे देवतेचे तत्त्व आकृष्ट झाल्याने ते जिवासाठी व्यापक रूपात, म्हणजेच आवश्यक त्या उपरूपांत कार्य करते.

3. गुलाबपाणी शिंपडणे

गुलाबपाण्यातून प्रक्षेपित होणार्‍या आपतत्त्वाशी संबंधित सुगंधित लहरींमुळे जिवाच्या सभोवताली असलेल्या वायूमंडलातील देवतेच्या सूक्ष्मतर लहरी कार्यरत होण्यास साहाय्य झाल्याने आपोआपच वातावरणशुद्धी होते. वातावरणातील त्रासदायक स्पंदने दूर झाल्यामुळे जिवाला कार्यरत देवतेच्या सगुण तत्त्वाचा लाभ अधिक मिळतो.

4. ओटी भरणे

ओटी भरणे, म्हणजे श्री दुर्गादेवीच्या ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या इच्छाशक्तीला आवाहन करणे. श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती ही तिच्या ओटीपोटात संपुटित झालेली असल्याने ओटी भरणे, म्हणजे तिच्यातील संपुटित इच्छाशक्तीला आवाहन करून शरण जाणे होय. ओटी भरण्याच्या प्रक्रियेतून ब्रह्मांडातील श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती कार्यरत झाल्यामुळे श्रद्धेने ओटी भरणार्‍या जिवाच्या देहातून बाहेर पडणार्‍या इच्छालहरींचे घनीकरण होऊन जिवाची अपेक्षित इच्छा पूर्ण होते. देवतेच्या कार्यरत इच्छाशक्तीतूनच देवतेची कृपा लवकर संपादन करता येते. इच्छाशक्तीतूनच जिवाला साधना करण्याची स्फूर्ती मिळते. त्यानंतर साधनेतील पुढच्या टप्प्यात जिवाला देवतेच्या कार्यरत क्रियाशक्तीतून साधना म्हणून प्रत्येक कर्म करण्याची शक्ती प्राप्त होते आणि त्यानंतर कार्यरत ज्ञानशक्तीतून जिवाला वैराग्य प्राप्त होते. ओटी भरणे, म्हणजेच श्री दुर्गादेवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबळ करणे होय.

5. वाण देणे

वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे, म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वसनाच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते, म्हणजेच दान सत्कारणी लागते.’वाण देणे’ म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते.

       सुगड


संक्रांतीच्या सणाला ‘सुगड’ लागतात. सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके. सुगडांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे (कांड्या), शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदीकुंकू इत्यादी भरतात. रांगोळी घालून पाट मांडून त्यावर पाच सुगड ठेवतात. त्यांचे पूजन करतात. तीन सुगड सवाष्णींना दान (वाण) देतात, एक सुगड तुळशीला आणि एक स्वतः करिता ठेवतात.’

बोरन्हाण

मूल जन्माला आल्यानंतर प्रथम येणार्‍या मकर संक्रांतीच्या दिवशी आप्‍तेष्टांच्या मुलांना बोलावून हा समारंभ करतात. त्यासाठी मुलाला झबले शिवतात. त्यावर खडी काढतात किंवा हलव्याचे दाणे बसवतात. मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालतात.

प्रथम औक्षण करून मुलाच्या मस्तकावर बोरे, उसाचे करवे, भुईमुगाच्या शेंगा व चुरमुरे हे सर्व पदार्थ एकत्र करून ओततात. यालाच बोरन्हाण म्हणतात. मुले खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात. मग सुवासिनींना हळदीकुंकू देतात. बोरन्हाण घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळयाची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले रहाते, असे समजतात. हा संस्कार मुख्यत: महाराष्ट्रात प्रचलित आहे.

तीळगुळाचे महत्त्व

तिळामध्ये सत्त्वलहरींचे ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते.

णभर तीळ मनभर प्रेम।
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा।।
तीळगूळ

मकरसंक्रांतीला दिलेल्या दानाचे महत्त्व

धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभरपटीने प्राप्त होते.

शरशय्येवर उत्तरायणाची वाट पहात संकल्प बळाने ५८ दिवस पडून रहाणारे भीष्माचार्य

शरशय्येवर भीष्माचार्य
शरशय्येवर भीष्माचार्य

उत्तरायण पर्वाची वाट पहाणार्‍या भीष्म पितामहांनी उत्तरायण चालू झाल्यानंतरच देहत्याग करणे पसंत केले होते. जगातील कोणत्याही योद्ध्याने शरशय्येवर अठ्ठावन्न दिवस काय अठ्ठावन्न घंटेही संकल्प बळाने जगून दाखवले नाही. ते काम भारताच्या भीष्म पितामहांनी करून दाखवले.’

किंक्रांत

संक्रांतीच्या दुसर्‍या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.

मकर संक्रांतीची कहाणी

एका राज्यात हरिदास ,विष्णू सेवक आणि त्याची पत्नी गुणवंती राहत होते. गुणवंती खूप सुशील होती, व ती भगवान विष्णूची पूजा करायची. ती भगवान विष्णूंना देवता म्हणून खूप मानायची.  गुणवंती ही एक पतिव्रता स्ञी होती. तिने सर्व देवतांचे सर्व व्रत केले होते. एकादशी, संकट चतुर्थी वगैरे सगळे उपवास ती करायची. परंतु तिने धनराज देवा साठी कधीही पूजा केली नव्हती. अतिथींचा आदर सत्कार करण्यात ती कधीही मागे सरकार नव्हते, अशा प्रकारे ती सर्व देवतांचे व्रतवैकल्य करून आपले जीवन व्यतीत करीत होती. व आनंदाने आपल्या पतीसह राहत होती.
 एकदा गुणवंती मृत्यु झाली. तर तिला एम लोकात घेऊन जाण्यासाठी यमराज आले तिने व्रतवैकल्य धर्म व्यवस्थित केले होते. त्यामुळे तिला यमराज अत्यंत व्यवस्थितरिते घेऊन चालले होते. धर्मकर्माच्या कर्मामुळे तिला व्यवस्थितरित्या यमराज घेऊन चालले. यमराज तिला धर्मराज यांच्या लोकात घेऊन गेले तेथे पाप पुण्याचे  मोजमाप करतात. तेथे ते गुणवंतीला घेऊन गेले.  तेथे तिने पाहिले त्या लोकाला चार दरवाजे आहेत. नगरच्या मध्योमध धर्मराज याचे भव्य सुंदर मंदिर आहे.    त्या मंदिरात धर्मराज बसलेले आहे. त्यांच्या बाजूला चित्रगुप्त बसलेले आहेत. जे व्यक्तींच्या पापाचे लिहिलेलं सगळं धर्मराज ला सांगतात. यमदूत गुणवंतीला तेथे घेऊन गेले. जेव्हा गुणवंतीने धर्मराज यांना पाहिले तर ते भयभीत झाली. तर खाली तोंड करून ती उभे राहिली. तर चित्रगुप्ताने धर्मराज ला गुणवंतीच्या धर्माचे पुण्याचे उपवासाचे सर्व काही लिहिलेलं त्यांनी वाचून सांगितलं. पण थोडेसे उदासही झाले, तर ते त्यांनी विचारलं गुणवंतीला की तू सर्व देवतांचे सर्व व्रतवैकले केले सर्वांसाठी दानधर्म केला. पण धर्मराज या नावाने कुठेही तू दान धर्म केला नाही. व कुठे तू व्रत उपवास काहीही केले नाही. असे का ?तर त्यावर उत्तर म्हणून तिने सांगितले की भगवान यामुळे याविषयी मला क्षमा करावी. कारण मला धर्मराज यांचा एकही उपवास कसा करावा याची विधीच माहित नव्हती. तर तुम्ही यासाठी मला क्षमा करावी. अशी विनंती गुणवंतीने केली असता. आपण कृपा करून मला याविषयी थोडासा माहिती सांगावी किंवा व्रत वैकल्ये कशी करावी हे सांगावे. तर याविषयी धर्मराज सांगायला लागले. सूर्य भगवान उत्तरायण जेव्हा जाईल तो दिवस असेल संक्रांति त्यादिवशी त्या दिवशी माझी पूजा करावी.वर्षभर माझी कथा ऐकून व संक्रांतीच्या दिवशी माझी पूजा करून तुम्हाला माझे फळ प्राप्त होईल. त्यादिवशी दानधर्म करून पूजा करून तुम्ही करावी अशा प्रकारे केल्यावर तुम्ही माझ्याजवळ आल्यावर खुश राहाल. गुणवंती बोलली हे भगवान हे सगळं खरं आहे.तर मला एम दूतांपासून सोडून मला धरती लोकात पुन्हा सोडवा. ज्यामुळे मी जाऊन उपवासाची विधी सर्व मनुष्य लोकात प्रचार प्रसार करीन. धर्मराज यांनी धरती वर जाण्यासाठी परवानगी दिली. तेव्हाच इकडे गुणवंतीच्या मृत शरीरात प्राण वापस आले. तिचे पुत्र बोलले की आमची आई पुन्हा जिवंत झाली. जिवंत झाल्यावर तिने आपल्या पुत्रांना व पतीला धर्मराज यांची कहाणी सांगितली व तेव्हापासून मकर संक्रांति या दिवशी धर्मराज यांची पूजा प्रतिवर्ष मोठ्या उत्साहात साजरी करू लागली. व कथा उपवास करू लागली. व त्याबरोबरच दानधर्म ऋषी जेवण सगळं काही करू लागली. हे सर्व उपभोग झाल्यानंतर ती जेव्हा पुन्हा मृत झाली.तेव्हा सर्व देवांनी तिच्या आधार सत्कार केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर