सप्तशृंगी देवी(Saptshrungi Devi)

सप्तशृंगी देवी

(Saptshrungi Devi)


नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन "आर्धे शक्तीपीठ" झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीचे तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. १८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो.
या मंदिरात राम सीता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घेतले चा उल्लेख आढळतो.चला तर मग जाणून घेऊ या या स्थळाचं इतिहास आणि थोडीशी माहिती.

सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर…

सप्तश्रृंगी. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले हे ठिकाण. सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरे आहेत. त्यावरून या गडाला सप्तश्रृंगी म्हटले जाते. गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा, शिवतीर्थ अशी पवित्र स्थळे आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या वणीतले हे रमनीय ठिकाण. समुद्रसपाटीपासून गडाची 4569 फूट उंची आहे. या गडाला एकूण 472 पायऱ्या आहेत. गड चढण्याचा आणि उतरण्याचा दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत. 

भागवत पुराणात उल्लेख

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजे वणीची सप्तश्रृंगी देवी. साडेतीन शक्तीपीठांना ॐ काराचे सगुण रूप मानतात. ओंकारात साडेतीन मात्रा आहेत. त्यातील ‘अ’कार पीठ म्हणून माहूर ओखले जाते. ‘उ’कार पीठ तुळजापूर, ‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा म्हणजेच सप्तश्रृंगी. हे अर्धपीठ आहे. कारण या देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही, असा उल्लेख भागवत पुराणात आढळतो. शुंभनिशुंभ व महिषासुरांचा वध केल्यानंतर देवीने या गडावर वास्तव्य केल्याचे म्हटले जाते.

आठ फूट उंची, अठरा भुजा…

ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून गिरिजा महानदी प्रकटली. तिचे रूप म्हणजे सप्तश्रृंगी. देवीची मूर्ती स्वयंभू असून, ती आठ फूट उंच आहे. तिला अठराभुजा आहेत. मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र आहेत. महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपापली आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते. मंदिराच्या गाभाऱ्याला तीन दरवाजे आहेत. शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. या दरवाजातून मातेचे दर्शन होते. असे म्हटले जाते की, चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते. शारदीय नवरात्रात गंभीर. निवृत्तीनाथ या मातेला आपली कुलस्वामिनी मानत. समाधी घेण्यापूर्वी त्यांनी या गडावर ध्यान केल्याचे म्हटले जाते. सप्तशृंगी देवी ही खानदेशी देवी म्हणून ओळखली जाते. येथे जास्त प्रमाणे जळगाव, मालेगाव, चाळीसगाव  या ठिकाणातील भावीक जास्त दर्शन घेण्यासाठी येतात.मंदिरात उच्चसनावर उभी असलेली देवीची मूर्ती नऊ फूट उंच आहे. व तिला आठरा हात आहे.470 पायऱ्या चढून वरती गेल्यावर देवीच्या प्रसन्न रुपाचे दर्शन होते. देवीच्या प्रसन्न रूपाचे दर्शन झाल्यावर आपोआप हात जोडल्या जातात.  नतमस्तक होते.

उत्सव

दर नवरात्रीत देवीचा गड भाविकांनी गजबजून जातो.नवरात्री हा प्रमुख मुख्य उत्सव येथे साजरा केला जातो.दर पौर्णिमाला येथे खूप प्रमाणे भाविक जण दर्शन घेतात.चैत्र पौर्णिमा लाखाच्या संख्येने येथे भाविकांची गर्दी उसळत असते. दर चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. जत्रेचा आनंद भक्त जण लुटतात.साड्या ओटी भरून चोळी खाणानि आईचा गाभारा  पूर्ण भरून जातो.

महिषासूरमर्दिनी

महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून देवी प्रकट झाली होती. सिंहासनावर आरुढ झालेल्या देवीच्या अठरा हातात निरनिराळी अस्त्रे होती. तिने त्या राक्षसाचा नि:पात केला. म्हणून या देवीला ‘महिषासूरमर्दिनी’ असेही म्हणतात.

मागील पाच वर्षात मंदिरात थोडासा कायापालट

नवीन सुविधा गेल्या पाच वर्षात सप्तश्रृंग गडाचा कायापालट करण्यात आला आहे. पाय-यांवर छप्पर आले आहे तर आजूबाजूला कठडे बांधण्यात आले आहेत. वर जायचा व यायचा रस्ता वेगवेगळा आहे. वर चढतांना दम लागल्यानंतर थांबायला विश्रांतीसाठी जागा तयार करण्यात आल्या आहेत. धर्मशाळेत उतरण्याची चांगली सोय आहे. गाद्या व ब्लकेटस् पुरविली जातात तर नाममात्र किंमतीत जेवण्याची सोय ट्रस्टने केली आहे. सप्तश्रृंग गडावर एक छोटे नगर वसले गेले आहे. पाण्याची नवी टाकी तयार करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निवासासाठी खास विश्रामगृहे बांधली आहेत. देवीची फोटो, पुस्तके, प्रसाद तसेच पुजेचे साहित्य या सर्व गोष्टी लगेच मिळतात. पूजा सांगायला तसेच विविध विधी करायला पुरोहीत वृंद हजर असतो. घरगुती जेवणही गुरुजींकडे मिळू शकते. एकूण काय भक्त मंडळी प्रसन्न होऊनच परत जातात.



सप्तश्रृंगी मातेचा ध्वज

ध्वज महात्म्य चतुर्दशीला मध्यरात्री १२ वाजता भगवतीच्या देवळावर ध्वज फडकला की भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. ध्वज फडकविण्याचे काम कळवण तालुक्यातील एका गवळी घराण्याकडे आहे. ध्वज नेणारा कोठून, कसा जातो, एवढया उंचीवर ध्वज कसा लावतो व त्याचे नवे कोरे कपडे कसे फाटतात याचे त्यालाही आकलन होत नाही. सप्तश्रृंगी मातेचा ध्वज नेहनी उत्तरेकडे फडकत राहतो.


स्वामी प्रकाशानंद सरस्वती यांनी धर्मशाळेसमोर बांधलेल्या होमकुंडात नवचंडी, शतचंडी आदि यज्ञ होतात. देवीसमोर भक्तांचा गोंधळ चालू असतो. भगवती नवसास पावते म्हणून भक्तांचा सतत ओघ येथे येतो. विशेषत: पुत्रप्राप्तीसाठी स्त्रीया नवस करतात. तसेच इतर पिडा टळावी म्हणून देवीला सांकडे घालतात.


क्षेत्र सप्तशृंगी देवीक्षेत्र सप्तशृंगी गडाची देवी भगवती महाराष्ट्रातील भाविकांचे हे जागृत देवस्थान नाशिक पासून ५५ किलोमीटर अंतरावर आहे.नांदुरी गाव सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी आहे.या गडावर जायला 11 किलोमीटर चा घाटाचा रस्ता पार करावा लागतो.ज्या गडावर देवीची देऊळ आहे त्या गडाला साथ शिखरे आहेत.सप्तशृंगी गड म्हणून भगवतीचाा उल्लेख होतो.देवीच्या समोर  मार्कंडेय या ऋषीचा डोंगर उभा आहे.सप्तशृंगी गडावर अनेक औषधी वनस्पती व पवित्र कुंडे आहेत.रामायणाच्या एका ऋषीनुसार हनुमानाने  याच गडावरून जखमी लक्ष्मणाच्या उपचारासाठी मुळी नेली होती.वणीच्या गडावर शिवालय तीर्थ कोटी तीर्थ अशी 108 तीर्थ आहेत.

प्रचंड शीत कडा

तीर्थाच्या पुढे प्रचंड मोठी दरी शीत कडा म्हणून उभी आहे.ती सुमारे 1500 फूट खोल असावी.एका सवाशेर महिलेने हे भगवती देवी मला पुत्र होऊ दे मी गडावरून या शीतगडावरून बैलगाडी सहहे भगवती देवी मला पुत्र होऊ दे मी गडावरून या शीतगडावरून बैलगाडीसह पुढे घेईन अशी अनावस बोलली होती त्याप्रमाणे भगवती देवीने तिला पुत्र प्राप्त करून तिची कामना पूर्ण केली तर त्या सव्वाची महिलेने खरोखर बैलगाडी सह व आपल्या मुलासह बैलगाडीतून या कड्यावरून खाली उडी घेतली त्या बैलगाडीचे चाकाचे निशाण अजूनही या शितकड्यावर दिसते अशी ही वनी ची देवी नवसाला पावणारी म्हणून ओळखले जाते.व असे हे शीटाकड्याचे महत्त्व आहे.हा प्रसिध्द शीतकडा समुद्र सपाटीपासून ४६३८ फूट उंच आहे. वणीच्या देवीच्या मंदिरात जाण्यासाठी ४७० पाय-या चढून जाव्या लागतात. इ.स. १७१० मध्ये या पाय-या उमाबाई दाभाडे यांनी बांधून घेतल्याची नोंद आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर