ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग(Omkareshwar jyotirling)

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग

(Omkareshwar jyotirling)


ओंकारेश्वर एक हिंदू मंदिर आहे. हे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे.हे नर्मदा नदीमध्ये मंधाता अथवा शिवपुरी नामक बेटावर बसलेले आहे. हे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला ओंकारेश्वर किंवा आमलेश्वर असे म्हणतात.हिंदू धर्मानुसार जेथे जेथे शंकर स्वतः प्रकट झाले ते ठीकन म्हणजे शिव लिंग स्थित ज्योतिर्लिंग  म्हणून पुजले जाते.

मध्यप्रदेशातील इंदूर जवळ असलेले ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग भारतातील सर्वात पवित्र स्थान यापैकी एक आहेे.   मध्यप्रदेशात बारा ज्योतिर्लिंग मधून दोन ज्योतिर्लिंग आहेत. येथे नर्मदा नदी वाहते. आणि नदीच्या प्रवाहामुळे ओमचा आकार डोंगराभोवती तयार होतो. हे ज्योतिर्लिंग प्रत्यक्षात ओमच्या आकाराचे आहे. म्हणूनच ते ओंकारेश्वर म्हणून ओळखले जाते. ओंकारेश्वर मंदिराला पौराणिक महत्त्व आहे. लोकांचा असा विश्वास आहे, की एकदा देवाने राक्षसांमध्ये युद्ध झाले. आणि देवतांनी भगवान शिव यांना विजयासाठी प्रार्थना केली. प्रार्थनेने समाधानी होम भगवान शिव येथे ओमकारेश्वराच्या रूपात प्रकट झाले. आणि त्यांनी देवतांना वाईटावर विजय मिळवून मदत केली.

ओंमकारेश्वर मध्ये दर्शन वेळ

ओंकारेश्वर आला भेट देण्याची वेळ सकाळी 5 ते रात्री 10पर्यंत आहेत. तुम्ही सकाळी 5:30 ते 12:20 आणि सकाळी 4ते 8:30 पर्यंत संध्याकाळचे दर्शन करू शकता.

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला कसे जायचे

ओंकारेश्वरला जाण्यासाठी आधी इंदूरला जावे लागते. इंदूर ते ओंकारेश्वर हे अंतर फक्त 80 किलोमीटर आहे. जर तुम्ही तुमच्या कारणे किंवा बसणे जात असाल ,तर तुम्ही खंडवा रस्त्यावरील बारवा आणि मोराटकर मार्गे सुमारे अडीच तासात ओंकारेश्वरला पोहोचाल. इंदूरहून ओंकारेश्वर साठी बसेसही उपलब्ध आहे. येथून सकाळी ओमकारईश्वराला जाण्यासाठी 8:15 वाजता तुम्ही मपी टुरिझमच्या एसी बस मध्ये आगाऊ बुकिंग केले तर तुम्हाला लवकरच सीट मिळेल.दुसरीकडे तर तुम्ही रेल्वेने ओंकारेश्वरदुसरीकडे तर तुम्ही रेल्वेने ओंकारेश्वर जात असाल तर तुम्हाला ओंकारेश्वर रोड स्टेशनवर उतरावे लागेल. इथून मंदिराच्या अंतर तेलात 13 किलोमीटर आहे. तुम्ही मंदिरात जाण्यासाठी कोणते साधन घेऊऊ शकता.

ओंकारेश्वर मंदिराला भेट देण्याची उत्तम जवळ

मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यात असल्याने हिवाळा आणि उन्हाळा भरपूर अनुभवतो. त्यामुळे ओंकारेश्वराला भेट देण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते मार्च आहे. यादरम्यान तुमचा प्रवास सार्थ आहे. आणि तुम्ही शांतपणे मंदिरातील ज्योतिर्लिंगाला भेट देऊ शकता.

ओंकारेश्वर मंदिरासाठी तिथल्या स्थानिक नरम दगडाचा वापर केला आहे. दगड नरम असल्यामुळे मंदिरावर अतिशय नाजूक कलाकुसर केलेली जाणवते. हे मंदिर नागरशैलीतीलबांधलेल्या असून त्यात अन्नपूर्णा व गणेशाच्या मुर्त्या आहेतमांडवा नावाच्या पर्वतावर दोन मंदिरातून त्यापैकी ओमकारेश्वर दुसरे अमलेश्वर या नावाने ओळखले जाते.

ओंकारम अमलेश्वरम

एकदा विंध्य पर्वताने शंकराची आराधना करून आपण येथे वास्तव्य करावे अशी विनंती केली शंकराने ही विनंती मान्य केलीपण आपण दोन भागात वास्तव्य करावे अशी तर देवाने प्रार्थना केली तेव्हा शिवलिंगाची ओंकारेश्वर आणि अमलेश्वर असे दोन भाग झाले आणि हे ज्योतिर्लिंग 'ओंकारम अमलेश्वरम' या जोड नावानेओळखले जाते.

कथा

स्कंदपुरांना रेवा खंडात या क्षेत्राविषयी माहिती दिलेली आहे. राजा यौवनाश्र्व या वरूण यज्ञ करत होता. त्यापैकी चुकून तो अभिमंत्रित केलेले पाणी प्यायला.त्यामुळे त्याला जो पुत्र झाला त्याचे नाव मांधवा असे ठेवले विश्वाकू वंशातील हा मांधवा राजा अतिशय पराक्रम होता.त्याने इंद्राच्या सिंहासनावर आपला हक्क सांगितला. त्यामुळे इंद्राला अतिशय राग आला आणि त्याने पाऊस पाडणे बंद केले दुष्काळ पडला.

सगळीकडे आहाकार माजला पशु,पक्षी मनुष्यप्राणी, सर्वजण पाण्या वाचून तडफडू लागले. तेव्हा मानधवा राजाने राजाने तप केला आणि त्याच्या वरामुळे पाऊस पडला. इंद्रावर विजय मिळवला. त्याच्या तपश्चर्यामुळे शंकराने वर मागण्या सांगितले.तेव्हा आपण येथे वास्तव करावे अशी राजाने प्रार्थना केली.म्हणून शंकर या ठिकाणी स्थित आहे.आणि हे क्षेत्र ओंकारमांधवा म्हणून प्रसिद्धीला आहे. मांधवा चा मुलगा मुचुकंद आणि या क्षेत्राची स्थापना केली. महर्षी च्यवन यांनीही या तीर्थाचे दर्शन घेतलेले आहे होते. आधी  शंकराचार्यांचे गुरु गोविंद भागवत यांचे इथल्या गुहात वास्तव्य होते.

नर्मदेच्या डोंगरावरील अमलेश्वर

ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-काठी आहे. हे नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थाने आहेत. दुसरे ॐकार या नावाचे लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकार अमलेश्वर असे म्हणतात.

ओंकारेश्वर क्षेत्रात खूप पूर्वी आदिवासींची वस्ती होती. त्यांच्यात बळी देण्याची प्रथा होती, त्यामुळे भाविक या ठिकाणी क्वचितच येत असत. दारीयाई नावाच्या महान पुरुषाने ही प्रथा बंद करण्याचे प्रयत्न केले. या नंतर या ठिकाणी उत्सव होऊ लागले. इ. स. ११९५ मध्ये राजा भारतसिंहाने आदिवासींचा पराभव केला.

या नंतर मात्र मराठय़ांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती नव्याने झाली. काही कालावधी उलटल्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराच्या मोठया प्रमाणावर सुधारणा केल्या. त्यांच्या काळातच कोठीलीन्गार्चान प्रथा सुरू झाली. महाशिवरात्री, कार्तिक पौर्णिमेस उत्सव, श्रावण सोमवारी पूजा-अभिषेक केला जातो.

ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग विशेष

ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मनुष्यनिर्मित नसून ते प्रकृती निर्मित शिवलिंग आहे.व हे शिवलिंग चहू बाजूनी पाण्याने भरलेले असते.

सामान्यतः प्रत्येक मंदिरात ज्योतिर्लिंग हे गाभाऱ्यांच्या मध्यभागी ज्योतिर्लिंग ठेवलेल्या असून. त्यावरच मंदिराचे कलश स्थापना केलेली असते.पण याचे विशेषत्व म्हणजे हे गाभाऱ्यावर ज्योतिर्लिंगाच्या वरच मंदिराचा कलश स्थापनाकेलेली नाही आहे.

या ज्योतिर्लिंगाचे एक विशेष म्हणजे मंदिराच्या शिखराच्या वरती महाकालेश्वराचि मूर्ती आहे.काही लोकांचे  मान्यता आहे ,की हे पर्वतच ओमकास्वरूप आहे.

हे मंदिर पाच मजली आहे.पहिल्या तळावरून ओंकारेश्वर लिंग ,दुसऱ्या तळावर महाकालेश्वराची लिंग व तृतीया तळावर सिद्धनाथ लिंग चतुर्थातळावर गुप्तेश्वर लिंग व पाचव्या तळावर ध्वजेश्वर लिंग स्थित आहे.

प्रत्येक महिन्याची‌ पुजा

प्रत्येक महिन्यातील एकादशी अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी विशेष प्रकाराने पूजा केली. दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. भारतात फक्त नर्मदा नदीची परिक्रमा केली जाते .या परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर येथे होते. नर्मदेच्या दक्षिण तीरापासून सुरुवात करतात. आणि भडोच जवळचा सागर संगमाजवळ व नर्मदा पार करून  अमरकंटला वळसा घालून परत ओंकारेश्वराला येऊन या परिक्रमेची सांगता होते. असे या क्षेत्राचे महिमा आहे.

ओमकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे महत्व

ओमकारेश्वर तीर्थ हे नर्मदा क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ मानलेले आहे.शास्त्रानुसार कोणी पण यात्री किती पण तीर्थ करो,पण सगळ्या तीर्थांचे पाणी या तीर्थावर आणून  जोपर्यंत चढवीत नाही. तोपर्यंत त्याचे सगळे पहिले केलेले तीर्थ व्यर्थ आहे. ओंमकारेश्वराच्या तीर्थ बरोबरच नर्मदा तीर्थ पण खूप महत्त्वाची आहे.

ओंमकारेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना कशी झाली?

शंकराच्या जटापासून  निघालेली कावेरी नदी पौराणिक कथेनुसार धनपती कुबेर भगवान यांची परम भक्त होती.कुबेर शंकरांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपासा केली.तेव्हा त्यांनी शिवलिंग स्थापना केली. भगवान शंकर कुबेरांच्या भक्तीने प्रसन्न होऊन. कुबेरला देवतांचा धनपती बनवले.

ओंकारेश्वर येथे कोणत्या कोणत्या नदिचा संगम आहे.

ओंकारेश्वर  12 ज्योतिर्लिंगापैकि एक येथे नर्मदा व कावेरी या नंद्यांचा संगम आहे.

 ओंकारेश्वराचे रहस्य

ओमकारेश्वर ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग या गावाचे मूळ नाव म्हणजे पौराणिक नाव मांधता हेच आहे.पुराणा नुसार सूर्यवंशराजा मांधता याने नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर ओम पर्वतावर घोर तपस्या केली होती.व भगवान शंकर यांना प्रसन्न केले.तेव्हा शंकर प्रकट झाले.तेव्हा सूर्यवंशी राजाने शंकराकडे ओमकार पर्वतावर कायमचा निवास करण्याचे वरदान मागितले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर