शारदीय नवरात्र

 शारदीय नवरात्र

मित्रांनो  नवरात्र म्हणजे हिंदू धर्मात नऊ दिवस चालणारा देवीचा उत्सव  होई.तसे पाहिले गेले तर, आपल्या लक्षात येईल की हिंदू धर्मामध्ये  सर्वस उत्सव हे विविध प्रकारे साजरे केले जातात.पण नवरात्र उत्सव हा आपल्या धर्मात विविध रंगी प्रकारे आणि साजरा केला जातो.की ते पाहून अगदी सर्वांना थक्क व्हायला होते.मित्रहो हिंदू वर्षाप्रमाणे चैत्र महिना चालू झाला की आपले सर्व सण उत्सव चालू होतात.खरं तर यात गणपती उत्सव संपला की आपल्या सर्वांना वेध लावतो तो शारदीय नवरात्रोत्सवाचा.

या दरम्यान येणारा पित्र पंधरवाडा नवरात्रीच्या साज सजावटीत कधी सांगतो हे समजतच नाही.नवरात्र उत्सव चालू झाला की जागोजागी चौकाचौकात मंडप उभारले जातात.गणपती सारखी अनेक मंडळे जरी नवरात्रोत्सवात नसली तरी मोजके मंडळी मोठ्या धूमधडाक्याने नवरात्र उत्सव साजरा करतात.

पावसाळा सरतो आणि थंडीचा मागोवा देणा-या शारदाची नांदी लावत अश्विन मास अवतरतो. त्याच्या शुध्द प्रतिपदेपासूनच नवरात्र महोत्सवाला भारतभर प्रारंभ होतो. अश्विन महिन्याच मूळ नाव आहे ‘ईष’. ‘ईष म्हणजे उडून जाणे जेव्हा गेले अनेक महिने सतत वर्षणारा पर्जन्यपक्षी उडून जातो तेव्हा हा ‘ईष’ म्हणजे अश्विन मास सुरू होतो. त्याच्या प्रारंभापासूनच सुरू होणा-या या नवरात्रोत्सवाच मूळ काय खालीलप्रमाणे.

नवरात्रोत्सवाच मूळ काय?

हा नवरात्रोत्सव पूर्णत: निगडीत आहे देवी दुर्गेशी. विश्वव्यापक, त्रिगुणात्मक आदिमायेच सर्वप्रथम प्रकटलेल सगुण रूप म्हणजे देवी दुर्गा. का प्रकटली ती? तर कोण्या एकेकाळी देवांच्या नाशासाठी ‘दुर्गम’ नावाच्या असुरान घनघोर तपश्चर्या मांडून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतल. वर म्हणून त्यान, देवांच्या नाडया आखडणारे प्रत्यक्ष चारी वेदच मागून घेतले. परिणामी सर्व यज्ञ बंद पडले. सर्वत्र अनावृष्टीच भय पसरल. जागोजागीच्या आश्रमातील ब्रम्हवृंदांनी व्याकुळतेन आदिमायेची करूणा भाकली. ती शतनेत्रयुक्त रूप धारण करून प्रकटली. तिन उन्मत दुर्गम असुराला वधल. दुर्गमला वधल म्हणून ही दुर्गा. त्याचा ‘दुर्ग’ म्हणजे किल्ल्यांशी काहीही संबंध नाही. दुर्गेचीच दुसरी नाव काली, अंबा, भवानी अशी पुढे विस्तारीत झाली. 

दुर्गेच्या असुरांवरील विजयाच प्रेरणास्मरण म्हणून विजयादशमी.हा विजयादशमीचा नवरात्रोत्सव, संवत्सरांचे व्यापक संस्कार घेत घेत सीमोल्लंघनापर्यंत विस्तारित झाला. आपल्या प्रत्येक सणात वर्षांवर्षांची आशी नवीच भर पडत गेलेली दिसेल.

दुर्गादेवीच्या या मूळ उत्सवात रावणवधाचा जल्लोष मिळाला. खंडेनवमीच्या दिवशी पांडवांचा शमीवृक्षावरून शस्त्रे उतरवून विराटाच्यावतीने अरिजुनान कौरवांवर विजय मिळवला. त्याचा आनंदोत्सव यात अंतर्भूत झाला.

आजचा हा उत्सव दुर्गादेवीचा, शस्त्र पूजनाचा व सीमोल्लंघनाचा असा आशय घेऊन अपार उत्साहान देशभर साजरा होतो. दुर्गापूजेच्या रूपात बंगालात साजरा होतो बंगालचा तो सर्वाधिक महत्वाचा सण आहे.

नवरात्रोत्सव, विजयादशमी व सीमोल्लंघन असा पूर्ण प्रगत झाला. पुढे शिवरायांच्या संग्रामशील व कालोचित अशा सीमोल्लंघनाच्या पायडयाने नवरात्राला एक जबरदस्त ऐतिहासिक परिमाण बहाल केल आहे.

विजयादशमीला आपटयाची किंवा शमीच्या वृक्षाची पान ‘सोन’ म्हणून सर्वांना वाटण्याची प्रथा सुरू झाली. पेशवाईत सरंजाम, नगारा, नोबत्ती याची त्यात उत्साही वाढ झाली.

महाराष्ट्रात विजयादशमीचा मुहूर्त धरून गावाची सीमा ओलांडण्याचा विधी आजच करायचा असतो हे प्रतीक पराक्रमाच आहे.

तशी वर्षभरात आणखीही चार नवरात्रे लोक संपन्न करतात.

पण महाराष्ट्राचा मावळा नवरात्रांच्या नऊ दिवस आपल्या कुलदैवतांच्या टाकांसमोर नऊ रोज नऊ माळा टांगून, विजयादशमीची पोळी खाऊन संध्याकाळी सोनचौक फोडून गावभर सोन वाटतो. दुस-या दिवशीच पाठीला खंडेनवमीची पूजलेली हत्यार पेलत नवरात्रीची कात चाकून विजयादशमीचे पराक्रमाचे नवकोंभ मिरवत-सीमोल्लंघन करतो हे आगळ वेगळ वाटत नाही काय? नक्कीच वाटेल सशक्त मनोबैठक असेल तर तशी दृष्टी असेल तर।.


शारदीय नवरात्र उत्सवाची माहिती 

 घटस्थापना

सर्वांना उत्सुकता असणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी म्हणजेच आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते.आता घटस्थापना म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल; तर मित्रहो एका मडक्या खाली धान्य पेरले जाते, व तेथे अखंड दीपप्रज्वलन केले जाते.किंवा अखंड नंदादीप लावतात.त्याचबरोबर घटाची सकाळ संध्याकाळ पूजा करून दररोज माळ बदलावली जाते.या दिवशी मातीच्या वेदीवर घटाच्यावर पसरलेल्या ताम्हणात कुलदेवतेच्या प्रतिमेची व कुलदेवाच्या टाकांची प्रतिष्ठापना करून घटाभोवती पसरलेल्या निवडक मातीच्या गादीवाफ्यात गहू, ज्वारी, मका अशी सप्त धान्य पेरली जातात. ही पहिली रात्र असते. या दिवशी घटाजवळ एकदा शिलगावलेला नंदादीप पुढे नऊ दिवस-रात्र तेवता राहणार असतो. (प्राचीन अखंड अग्निहोत्र व्रताचच हे बाळप्रतीक होय.) हा घटस्थापनेचा दिवस.
सार्वजनिक नवरात्रोत्सवातहि या गोष्टी उत्सुकतेने केल्या जात्या.खरंतर घटस्थापना करण्याची पद्धत प्रत्येक घराची वेगळी असते.कुणाकडे उठता बसता उपवास केला जातो. तर कोणाकडे पूर्ण नऊ दिवस उपवास केला जातो.
दसरा (विजयादशमी )

कथा

नवरात्र संपले की दहावा दिवस म्हणजे दसरा येतो. पौराणिक कथेनुसार देवांविरूध्द राक्षसांचे घनघोर युध्द आश्विन शुध्द प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नऊ दिवस चालले होते. दहाव्या दिवशी पार्वतीने विजयी होऊन काशीत प्रवेश केला. तो दिवस होता आश्विन शुध्द दशमीचा. विजयारूपी पार्वतीने विजय मिळविला म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात. कोणत्याही मंगल कार्याचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा श्रीगणेशा या दिवशी करतात. लहान मुलांकडून ह्या दिवशी सरस्वतीपूजन करून शिक्षणाचा प्रारंभ करतात.

या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते. रामाने रावणाशी युध्द करून त्याचा वध केला व वनवासात जाताना शमीच्या वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रास्त्रे परत ताब्यात घेतली म्हणून शमीच्या वृक्षाला या दिवशी महत्त्व आहे. उत्तरभारतात या दिवशी रावणाची प्रतिमा जाळण्याची प्रथा आहे. वनवासाला जाताना सीतेचे सुवर्ण अलंकार आपटयाच्या झाडामधे ठेवले होते असे मानतात. म्हणून आपटयाची पाने सोने म्हणून सर्वांना वाटतात. या दिवशी वाहनांचीही पूजा करतात.

या दिवशी घरातील कर्त्या पुरूषांनी सीमोल्लंघन करावयाचे असते. सोने घेऊन देवीचे दर्शन घ्यावयाचे. घरी आल्यावर बहिणीने अथवा घरांतील मुख्य जी सवाष्ण स्त्री असेल तिच्याकडून ओवाळून घ्यायचे असा प्रघात आहे. पूर्वी साम्राज्य वर्धनाच्या दृष्टीने ज्या मोहिमा आखल्या जात त्यांची सुरुवात या दिवशीच्या सीमोल्लंघनाने होत असे.

या दिवशी स्वयंपाकात मुख्यतः पुरणपोळी करतात. तळण, खीर व इतर स्वयंपाक सणाप्रमाणे करतात.


नवरात्रीच्या नऊ माळा

नवरात्र उत्सव(Navratra) हा 9 दिवसांचा असतो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ माळी असतात. म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला पहिली माळ म्हणतात. अश्या 9 माळी असतात. नवरात्रीच्या नववा दिवस म्हणजे नववी माळ होय. प्रत्येक दिवसाला वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करण्यात येतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ कलर असतात. त्याच प्रमाणे आपण नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करत असतो. जसे की पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी ची पूजा करतो. तर दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची, तिसऱ्या दिवशी चंद्रघटा देवी ची पूजा केल्या जाते तर चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते. पाचव्या दिवशी स्कंदमाता देवी ची पूजा तर सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करण्यात येते तर सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा करण्यात येते तर आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा तर नवव्या दिवशी सिद्धिदात्री या देवीची पूजा करण्यात येते.

नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे.



पहिली माळ - शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ

दुसरी माळ - अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ

तिसरी माळ - निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा

चौथी माळ - केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले

पाचवी माळ - बेल किंवा कुंकवाची माळ

सहावी माळ - कर्दळीच्या फुलांची माळ

सातवी माळ - झेंडू किंवा नारिंगीची फुले

आठवी माळ - तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ

नववी माळ - कुंकुमार्चन करतात.

तर अशा या नऊ दिवसांच्या नऊ माळा आहेत. या नवरात्रीच्या देवीला नऊ दिवस नऊ विविध रंगांच्या साड्या परिधान करण्याचीही प्रथा आहे. महाराष्ट्रातील भोसले घराण्याचे आद्य दैवत दुर्गा भवानी होते, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात या उत्सवाचे महत्व फार वाढले. पुढे पेशव्यांनीदेखील ही प्रथा अखंड चालू ठेवली. नवरात्रीनंतर आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात. याच दिवशी देवीने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला अशी आख्यायिका सांगितली जाते.

नवरात्रीचे रंग 2022



नवरात्रीची पौराणीक कथा

महिषासुर नावाचा एक राक्षस म्हणजेच दैत्य होता. हा महिषासुर राक्षस दैत्य जरी असला तरी सुद्धा तो ब्रह्मदेवाचा भक्त होता. त्यांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले होते, त्याने ब्रह्मदेवाला वरदान मागितले होते. पृथ्वीवर वास्तव करणारा अस्तित्वात असणारा कोणताही मानव, देव किंवा मनुष्य किंवा दानव यापैकी कोणीही महिषासुराला मारू शकणार नाही असे वरदान हे महिषासुराने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून मागितले होते. आता महिषासुराला हे वरदान प्राप्त झाल्यामुळे त्याला कोणीही मारू शकणार नाही म्हणून त्याने पृथ्वीवर तसेच स्वर्गात आणि पातळावर खूप मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला होता, महिषासुर या राक्षसाने जिकडे तिकडे हाहाःकार माजवला होता. या राक्षसाला पृथ्वीवरील तसेच इतरही ठिकाणावरील सर्व लोके घाबरू लागली. महिषासुराची दहशत आता वाढतच गेली होती. त्यामुळे आता महिषासुर या राक्षसाचा वध करण्याकरिता कुणीही सामोरे जात नव्हते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिदेवांनी दुर्गा मातेला महिषासुराचा वध करण्यासाठी साकडे घातले होते. तेव्हा दुर्गा मातेने नऊ दिवस महिषासुरासी लढाई केली त्यानंतर दहाव्या दिवशी महिषासुराचा दुर्गा मातेने वध केला. त्यामुळे दुर्गा मातेला  ‘महिषासुर मर्दिनी’ असेही म्हणतात. त्यामुळे आपण नऊ दिवस वाईट गोष्टींची लढा देण्यासाठी दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करीत असतो. ज्याप्रमाणे मा दुर्गा ने महिषासुराचा वध केला, त्याचप्रमाणे आपण आपल्या वाईट विचारावर वाईट कृत्यावर विजय मिळवण्यासाठी नवरात्र उत्सव साजरा करत असतो. नवरात्र उत्सवात दुर्गा मातेची मनाभावातून पूजा केल्यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदते.अशाप्रकारे महिषासुराच्या वधापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपण दरवर्षी आनंदाने मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करीत असतो.

विजयादशमी

दुर्गेच्या असुरांवरील विजयाच प्रेरणास्मरण म्हणून विजयादशमी.हा विजयादशमीचा नवरात्रोत्सव, संवत्सरांचे व्यापक संस्कार घेत घेत सीमोल्लंघनापर्यंत विस्तारित झाला. आपल्या प्रत्येक सणात वर्षांवर्षांची आशी नवीच भर पडत गेलेली दिसेल.

दुर्गादेवीच्या या मूळ उत्सवात रावणवधाचा जल्लोष मिळाला. खंडेनवमीच्या दिवशी पांडवांचा शमीवृक्षावरून शस्त्रे उतरवून विराटाच्यावतीने अरिजुनान कौरवांवर विजय मिळवला. त्याचा आनंदोत्सव यात अंतर्भूत झाला.

आजचा हा उत्सव दुर्गादेवीचा, शस्त्र पूजनाचा व सीमोल्लंघनाचा असा आशय घेऊन अपार उत्साहान देशभर साजरा होतो. दुर्गापूजेच्या रूपात बंगालात साजरा होतो बंगालचा तो सर्वाधिक महत्वाचा सण आहे.

नवरात्रोत्सव, विजयादशमी व सीमोल्लंघन असा पूर्ण प्रगत झाला. पुढे शिवरायांच्या संग्रामशील व कालोचित अशा सीमोल्लंघनाच्या पायडयाने नवरात्राला एक जबरदस्त ऐतिहासिक परिमाण बहाल केल आहे.

विजयादशमीला आपटयाची किंवा शमीच्या वृक्षाची पान ‘सोन’ म्हणून सर्वांना वाटण्याची प्रथा सुरू झाली. पेशवाईत सरंजाम, नगारा, नोबत्ती याची त्यात उत्साही वाढ झाली.

महाराष्ट्रात विजयादशमीचा मुहूर्त धरून गावाची सीमा ओलांडण्याचा विधी आजच करायचा असतो हे प्रतीक पराक्रमाच आहे.

तशी वर्षभरात आणखीही चार नवरात्रे लोक संपन्न करतात.

पण महाराष्ट्राचा मावळा नवरात्रांच्या नऊ दिवस आपल्या कुलदैवतांच्या टाकांसमोर नऊ रोज नऊ माळा टांगून, विजयादशमीची पोळी खाऊन संध्याकाळी सोनचौक फोडून गावभर सोन वाटतो. दुस-या दिवशीच पाठीला खंडेनवमीची पूजलेली हत्यार पेलत नवरात्रीची कात चाकून विजयादशमीचे पराक्रमाचे नवकोंभ मिरवत-सीमोल्लंघन करतो हे आगळ वेगळ वाटत नाही काय? नक्कीच वाटेल सशक्त मनोबैठक असेल तर तशी दृष्टी असेल तर।.


दुर्गा माता चे 9 अवतार कोणते आहेत?

दुर्गा माता चे 9 आवतार हे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंद माता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री हे आहेत.

महाराष्ट्रात नवरात्रीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे?

यवतमाळ


भारतातील नवरात्रीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे?

कोलकत्ता 


भारतात नवरात्रीसाठी प्रसिद्ध राज्य कोणते?

गुजरात

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर