बल्लाळेश्वर
बल्लाळेश्वर
बल्लाळाची कथा गणेश पुराण व मुद्गल पुराणात आहेत. कल्याण नावाच्या व्यापाऱ्याच्या बल्लाळ हा सुपुत्र.बालपणापासून त्याची विनायकावर श्रद्धा होती. त्याने गावातील इतर मुलांनाही भक्तीमार्गात प्रवृत्त केले. त्यामुळे गावातील मुलांचे अध्ययन व व्यवहाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. हे पाहून त्याच्या पित्याचा क्रोध अनावर झाला. त्याने बल्लाळाच्या गणेशास दूर फेकून दिले. या बाल्लाळाची हाल करून त्यास झाडाला टांगून दिले. मल्हार आणि गणेशाची आराधना केली.
गणेश प्रसन्न झाले व त्याची इच्छेनुसार पाषाणारुपी मूर्ती तेथेच राहिले. व बल्लाळेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले. बल्लाळेश्वर मंदिराच्या अगोदर श्रीधुंडीविनायकाचे मंदिर आहे. बल्लाळाच्या पित्याने फेकून दिलेली ही मूर्ती प्रथम या मूर्तीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.येथील बल्लाळेश्वराची पूजा सकाळी ११:३० पर्यंत स्वहस्ते करता येते.
माघच्या चतुर्थीस मध्यरात्री श्री बल्लाळेश्वर स्वहस्ते प्रसादाचे सेवन करतात, अशी श्रद्धा असल्यामुळे असंख्य भाविक या समारंभासाठी येतात.
रायगड जिल्हा सुधागड तालुक्यातील अंबा नदीच्या सान्निध्यात स्वयंभू असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे .हे मंदिर पूर्वाभिमुख असून सूर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात.मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभार्यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वरा कडे पाहणाऱ्या उंदीराची मूर्ती आहे. आतील गाभार्याच्या वरील बाजूला घुमटकार असून त्यावर अष्टकोनी कमळ आहे. या गाभाऱ्यात बल्लाळेश्वराची डाव्या सोंडेची पाषाणाची मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ विशाल असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत.चांदीच्या थाळीवर रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती चौर्या डाळीत आहेत.
स्थान: तालुका- सुधागड, जिल्हा- रायगड, पिन कोड ४१० २०५
अंतर :पाली -खोपोली, २८ किलोमीटर पुणे १११ किलोमीटर मुंबई १२०किलोमीटर
पुण्यात जाण्यासाठी आता दोन मार्ग आहे ते खोपोली मार्गे व दुसरा ताम्हणी घाटातून मुलाशी मार्गे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा