सिद्धिविनायक

सिद्धिविनायक

सिद्धटेकच्या गणपती बाप्पा ला सिद्धिविनायक असे म्हणतात.अष्टविनायकातील हा तिसरा  गणपती बाप्पा आहे.हा गणपती उजवी सोंड असणारा एकमेव गणपती बाप्पा आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठी  वसलेल आहे.सिद्धिविनायक हे मंदिर स्वयंभू असून .याच्या गाभाऱ्याचे रुंदी खूप मोठी आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची ही एकमेव मूर्ती. उजव्या सोंडेच्या मूर्तीस सिद्धिविनायक असे संबोधले जाते.

सिद्धिविनायकाचि मंत्र व आरती


ओम ओम ओम …
वक्रतुंड महा -काय सूर्य -कोटी समप्रभ
निर्विघ्नम कुरु मी देवा सर्व -कार्येषु सर्वदा !!
ओम्म्म …..
ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धिविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया

मंगल मूर्ती नमो नमः -2
ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धिविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया

मंगल मूर्ती नमो नमः -2

श्री सिद्धिविनायक आरती
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची।

सर्वांगी सुन्दर उटि शेंदुराची।

कण्ठी झळके माळ मुक्ताफळांची॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ति।

दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।

चन्दनाची उटि कुंकुमकेशरा।

हिरे जड़ित मुकुट शोभतो बरा।

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ति।

दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

लम्बोदर पीताम्बर फणिवर बन्धना।

सरळ सोण्ड वक्रतुण्ड त्रिनयना।

दास रामाचा वाट पाहे सदना।

संकटी पावावे निर्वाणीरक्षावे सुरवरवन्दना॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ति।

दर्शनमात्रे मनकामना पुरती॥

इतिहास


पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विश्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.

छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.


बाप्पाचे मंदिर

मंदिरातील सिद्धिविनायकाची(siddhivinayak) मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे.प्रभावळीवर चंद्र, सूर्य,गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय फलदायक आहे. एक प्रदक्षिणा म्हणजे ५ किमीचा प्रवास कारण ही मूर्ती डोंगराला जोडलेली आहे. एका प्रदक्षिणेला जवळजवळ अर्धा तास लागतो.भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असे म्हटले जाते.भगवान विष्णूने येथील गणेश मूर्तीची स्थापना केली.मधु व कैटभ या दैत्यांचा वध करण्यासाठी श्री विष्णूने येथे विनायकाची आराधना केली. विष्णूस येथे सिद्धी प्राप्त झाली. म्हणून येथील गणेशास सिद्धिविनायक म्हटले जाऊ लागले. येथील दक्षिणवाहिनी असणाऱ्या भीमा नदीला पूर आला तरी परिसरात नदीच्या प्रवाहाचा आवाज होत नाही.या नदीवरील दगडी घाट आहिलाबाई होळकर यांनी बांधला. अष्टविनायकापैकी उजव्या सोंडेची असणारे ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक  आहे. गणेशा सकाळी खिचडी, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी दूध भात व रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो. हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे. महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्यापुढे गाबरत उजव्या सोंडेची व शेंदूर लावलेली सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. त्याची एक मुंडे दुमडलेली असून त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गाभार्‍यातील मखर पितळेचे असून त्यावर चंद्र-सूर्य-गरूड नागराज यांच्या आकृती कोरलेल्या असून दोन्ही बाजूला जय-विजय आहेत.


जवळची इतर दर्शनीय स्थळे

  • पेडगांव येथील भीमा नदीच्या तीरावरील प्राचीन मंदिरे आणि किल्ला. अंतर अंदाजे ९ किमी.
  • राशीन येथील झुलती दीपमाळ आणि देवीचे मंदिर. अंतर अंदाजे २१ किमी.
  • रेहेकुरी येथील अभयारण्य. अंतर अंदाजे ३१ किमी .
  • भिगवण येथील पक्षी अभयारण्य. अंतर अंदाजे २७ किमी.
  • दौंड येथील भैरवनाथ आणि श्री विठ्ठल मंदिर. अंतर अंदाजे २६ किमी.
  • स्थान: तालुका -कर्जत, जिल्हा- अहमदनगर
  •  आंतर: अहमदनगर -पारगाव फाटा- श्रीगोंदा सिद्धटेक 82 किलोमीटर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर

औंढा नागनाथ

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात जिथे महादेवा समोर नंदी नाही...