रक्षाबंधन
कुठल्याच नात्यात नसेल
एवढी ओढ आहे.
भाऊ बहिणीच हे नातं
खूप खूप गोड आहे
रक्षाबंधन भातुकलीच्या खेळातल्या चुलीवरचा गरमागरम चहा आणि पोळी म्हणजेच बहीण.इवल्याशा बॅटने फूटभर मारलेला सिक्स ची हुशार कि म्हणजेच भाऊ.चेहरा पाहून काय बिनसलं चटकन सांगणारी म्हणजेच बहीण.आपली गरज बाजूला ठेवून तिची गरज पुरवणारा तो भाऊ असतो.भारतात गणेशोत्सव, होळी, पोळा ,नागपंचमी जेवढ्या उत्साहाने साजरे केले जाणारे सण आहे. त्याच बरोबर रक्षाबंधन ही खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते. हिंदू परंपरेनुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो.रक्षाबंधन या सणाला राखी असेही म्हणतात. भारतात प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रक्षाबंधन नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा कजरी पौर्णिमा या नावानेही ओळखली जाते.
रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण आहे.बहिणीने भावाला रक्षा चा बांधलेला पवित्र धागा म्हणजेच रक्षाबंधन.रक्षाबंधन जुलै ते ऑगस्ट या महिन्यात येते. रक्षाबंधन हा धागा इतिहासिक ,सामाजिक धाग्यांनी घट्ट बांधलेला आहे.रक्षाबंधन हा सण फक्त भारतातच नव्हे तर नेपाळ आणि मोरेशिया या देशातही खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा हा सण आहे.
भाऊच्या कपाळी टिळा।
ओवाळून त्यास घ्यावा।।
मनगटावर पवित्र धागा।
राखीचा सुंदर देखावा।।
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भाऊ सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करून नवीन कपडे परिधान करतात.बहिण बाजारातून राखी घेऊन येते.पाठ सजवला जाते भोवती रांगोळी काढून भावाला पाटावर बसून त्याच्या उजव्या हाताला राखी बांधून त्याला ओवाळले जाते.राखी बांधन्या अगोदर भावाच्या कपाळावर टिळा लावतात. टिळा लावण्याची कारण असे की भावाची समृद्धी जागृत करावी.भावाच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी प्रार्थना करते व भावाला मिठाई खाऊ घालते.या दिवशी घरामध्ये वेगळी मिठाई बनवली जाते.भाऊही बहिणीला मिठाई खाऊ घालतो व भेटवस्तू देतो. बहिणीला रक्षा करीन असे वचन देतो.रक्षाबंधनाचा अर्थ असा की या प्रेम रुपी बंधनातून भाऊ-बहिणीच्या रक्षा करण्याची जबाबदारी स्वीकारतो.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात..,
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवर ही,
असेल माझी तुझी साथ…
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण
इतिहास
रक्षाबंधनाचा इतिहास हिंदू कथांमध्ये आढळतो.वामनावतार या कथेमध्ये रक्षाबंधनाचा उल्लेख आला आहे.
भाऊ बहिणीचे नाते
बहिण-भावाचे नाते अतुलनीय आहे, एकमेकांसाठी काहीही करण्यास ते कधीही मागेपुढे पाहत नाहीत. जसजसे ते मोठे होतात तसतसे त्यांचे नाते अधिक दृढ होते. याच पवित्र नात्याचे प्रतिक असलेला हा सण भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. हा सण त्यांच्या या पवित्र नात्याला अधिक घट्ट करण्यासाठी साजरा केला जातो.
या दिवशी बहिण आपल्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिचे अभिवादन करतो आणि तिचे रक्षण करण्याचे तिला वचन देतो.
कथा
राजा बलि यांनी यज्ञ करून स्वर्गावर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न केला.तेव्हा देवराज इंद्र यांनी विष्णू प्रार्थना केली. विष्णू वामन कडे ब्राह्मण बनवून भिक्षा मागायला गेले.गुरु दान देण्यास नाही म्हटल्यावर ही बलि यानि तीन पग जमीन दान दिली.आकाश पाताळवामन भगवान यांनी आकाश पाताळ आणि जमीन मोजून विष्णु भगवान यांना पाठवले.राजा बलि यांनी आपल्या शक्तीच्या जोरावर विष्णूंना सतत आपल्या समोर राहण्यास भाग पाडले.यामुळे देवी लक्ष्मी खूप चिंतेत झाल्या. देवींना खूप चिंता वाटू लागली की विष्णु भगवान कसे परत येतील.चिंतेने ग्रस्त असलेल्या लक्ष्मी मातेला नारद यांनी एक उपाय सांगितला.त्यानंतर ला माता लक्ष्मी राजा बलि यांच्याकडे गेली व रक्षासूत्र बांधून आल्या. रक्षा स्तोत्र बांधण्याचे कारण से रक्षासूत्र बांधल्याने लक्ष्मी यांचा भाऊ राजा बलि झाला.या राखी च्या बदल्यात लक्ष्मी मातेने विष्णू यांना सोडून आणले.व आपल्या सोबत घेऊन आल्या. तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सुरू झाले व आजतागायत चालूच आहे.त्या दिवशी श्रावण महिन्यातील पौर्णिमा होती त्यामुळे रक्षाबंधन रक्षासूत्र हे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.
पौराणिक कथा
इतिहासात राखीचे उल्लेख भरपूर ठिकाणी आढळले आहे, व त्याचे महत्त्व ही खूप आहे.मेवाड ची महाराणी कर्मावतीने मुघल राजा हुमायू याला राखी पाठवून रक्षा करण्याची याचना केली होती.राजा हुमायु ने मुसलमान होऊनही राखीचा मान ठेवला होता.अगोदर रक्षाबंधनाची सुरुवात राणी कर्णावती व सम्राट हुमायु यांनी केली होती.मध्यकालीन युगात राजपूत व मुसलमान यांच्यात मोठी युद्ध चालू होते.राणी कर्णावती ही चितौडच्या राजाची विधवा होती.त्यावेळचा गुजरातचा सुलतान बादशाह,आपल्या आणि प्रजेच्या संरक्षणाचा कोणताही एक ही रस्ता त्याला दिसत नव्हता. त्यावेळी त्यांनी सम्राट हुमायू राजाला राखी पाठवली होती.
म्हणतात सिकंदराच्या पत्नीनेही शत्रू पुरुषाला राखी बांधून भाऊ मानले होते.युद्धाचे वेळेस ,सिकंदराला न मारण्याचे वचन तिने त्या भावा कडून घेतले होते.पुरु ने युदधाचवेळी सिकंदराला जीवनदान देऊन राखीचा मान ठेवला होता .
रक्षाबंधनाचे महत्व
आज हा उत्सव आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक भारतीयाला या सणाला अभिमान आहे. ही अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे की ज्या देशात स्त्रीला देवीसमान मानले जाते तेथे स्त्री-भ्रूणहत्येची प्रकरणे होतात. हा सण आपल्याला बहिणींचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे याची देखील जाणीवही करून देतो. म्हणूनच या उदात्त आणि पवित्र सणाचे रक्षण करून नैतिक भावनेने आपण त्याला आनंदात साजरा केला पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा