गिरिजात्मक

गिरिजात्मक

गिरिजात्मक गणेशाची स्थापना उंच डोंगरात आहे.हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरुपात आहे इं गिरिजा म्हणजे पार्वती मत आणि पार्वतीचा पुत्र म्हणजे  तिचा आत्मज.त्यावरून त्याच गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले.
 गजाननाची पुत्र म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून या गुहेत पार्वतीने बारा वर्षे तपश्चर्या केली व गणेशाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. त्यानुसार भाद्रपद चतुर्थी सचेतन होऊन बटू रूपात पार्वतीने बारा वर्षे तपश्चर्या केली व गणेशाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली.त्यानुसार भाद्रपद चतुर्थी सचेतन होऊन बटू रूपात तो प्रकट झाला तेव्हा त्याला सहा हात व तीन नेत्र होते.गौतम ऋषींचा गणेशास येथे लाभ झाला. सतत 15 वर्षे गणेशाने गणेशाच्या हस्ते वास्तव्य केले. म्हणून या क्षेत्राचे महात्मा थोर आहे येथे एकूण 28 लेणी आहेत.मंदिर सातव्या लेणी त्याला गणेश लेणी म्हणतात. सहाव्या लेणी बौद्ध स्तूप असून येथे सात वेळा आवाजाचा प्रतिध्वनी उमटतो. लेणी जाण्यासाठी 321 पायऱ्या आहेत. गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंती स्वयंभू प्रकट झालेली आहे.
लेणी परिसरात गुरुतत्व विभागाच्या अधिकारात पुरावा आहे. मंदिरात प्रवेशासाठी पुरातत्व विभाग पाच रुपये शुल्क आकारते. जुन्नरजवळील लेण्याद्री हा लेणी असलेला पर्वत असून गिरीजात्मक मंदिर डोंगरावरील आठव्या गुहेत आहे. देवळात जाण्यासाठी 367 पायऱ्या आहेत. डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले असून दक्षिणभूमी आहे. दालनात गणपतीची प्रतिमा असून, त्याला एकही खांब नाही. तसेच दालन आकाराने मोठे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या गिरीजत्मकाच्या मूर्तीवर उजेड असतो. मंदिरात दगडात कोरलेली मूर्ती उत्तराभिमुख व ओबडधोबड मूर्ती असून, गणेशाची मान बाजूला वळलेली असल्याने गणपतीचा एकच डोळा दिसतो.

स्थान: पोस्ट- गोळेगाव, तालुका -जुन्नर ,जिल्हा- पुणे, पिन कोड 410 502
अंतर :मुंबई -कल्याण- माळशेज घाट- मढ -लेण्याद्री 108 किलोमीटर
पुणे- नारायणगाव- जुन्नर- लेण्याद्री 120 किलोमीटर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर

औंढा नागनाथ

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात जिथे महादेवा समोर नंदी नाही...