12 ज्योतिर्लिंग ☘️

12 ज्योतिर्लिंग ☘️


12 ज्योतिर्लिंग काय आहे? 
भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. 
हिंदू धर्मात पुराणांनुसार, शिवलिंग ज्या बारा ठिकाणी स्वतः प्रकट झाले तेथे शिवलिंगांची ज्योतिर्लिंगाच्या रूपात पूजा केली जाते. ही संख्या 12 आहे.

सौराष्ट्र प्रदेशातील श्री सोमनाथ (काठियावाड), श्रीशैल येथील श्री मल्लिकार्जुन, उज्जैनी येथील श्री महाकाल, कारेश्वर किंवा ममलेश्वर, परळीतील वैद्यनाथ, डाकिनीतील श्री भीमाशंकर, सेतुबंधातील श्री रामेश्वर, दारुकावनमधील श्री नागेश्वर, वाराणसी (काशी) मधील श्री विश्वनाथ, गौतमी (गोदावरी) च्या काठावर श्री त्र्यंबकेश्वर, हिमालयातील केदारखंडमधील श्री केदारनाथ आणि पॅगोडामध्ये श्री घृष्णेश्वर.

श्रद्धा आहे की, जो कोणी या बारा ज्योतिर्लिंगांची नावे रोज सकाळी आणि संध्याकाळी घेतो, त्याची सात जन्मातील पापं या लिंगांच्या केवळ स्मरणाने मिटली जातात. ज्याचे वर्णन शिव महापुराणातील कोटिरुद्र संहिताच्या पहिल्या अध्यायात आढळते.


भारतातील 12 ज्योतिर्लिंग


 सोमनाथ
नागेश्वर
भीमाशंकर
त्र्यंबकेश्वर
ग्रिशनेश्वर
वैद्यनाथ
महाकालेश्वर 
ओंकारेश्वर
काशी विश्वनाथ
केदारनाथ
रामेश्वरम
मल्लिकार्जुन 
12 ज्योतिर्लिंगाचि यात्रेचा क्रम
12 ज्योतिर्लिंगाचि यात्रेचा क्रम हा शास्रानुसार आहे.बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा कशी करावी व कोणत्या ज्योतिर्लिंगाचे प्रथम दर्शन घ्यावे व त्यानंतर कोणते हे विस्तृत खालील प्रमाणे.खाली दिलेल्या ज्योतिर्लिंगाच्या क्रमाने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने हे व्यवस्थित ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते.

हिंदु धर्मानुसार अस म्‍हणल जात की जी व्‍यक्ति "वरील बारा ज्‍योर्तिलिंगाचे नावानुरुप मंत्र" जर दररोज पहाटे व सायंकाळी जपन केला तर सात जन्‍मातील झालेला पाप ज्‍योर्तिलिंगाच्‍या स्‍मरणामुळे / जप केल्‍यामुळे सर्व पापांचा विनाश होतो.

  1. सोमनाथ(गुजरात -गिर सोमनाथ जिल्हा/वेरावळ)
  2. मल्लिकार्जुन (आंध्र प्रदेश - श्री शैल्य)
  3. महाकालेश्वर (मध्य प्रदेश - उज्जैन)
  4. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश - ओंकारेश्वर,खंडवा जिल्हा)
  5. वैजनाथ (महाराष्ट्र - परळी,बीड जिल्हा) - उत्तर भारतात झारखंड मधील देवघर स्थित वैद्यनाथ देवस्थानास वैजनाथ ज्योतिर्लिंग मानतात.
  6. भीमाशंकर (महाराष्ट्र - भीमाशंकर,खेड तालुका जिल्हा पुणे)
  7. रामेश्वर (तामिळनाडू - रामेश्वर,रामनाथपुरम जिल्हा)
  8. नागनाथ हिंगोली, (महाराष्ट्र) - उत्तर भारतात गुजरातच्या द्वारकेतील नागेश्वर देवस्थानास नागनाथ ज्योतिर्लिंग मानतात.
  9. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश वाराणसी)
  10. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र - नाशिक जिल्हा)
  11. केदारनाथ (उत्तराखंड - केदारनाथ,रुद्रप्रयाग जिल्ह)
  12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र -वेरुळ,खुल्ताबाद तालुका, औरंगाबाद जिल्हा ).

बारा ज्योतिर्लिंग विषयी थोडीशी माहिती


सोमनाथ
बारा ज्योतिर्लिंगातिल  सोमनाथ हे प्रथम ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे. हे गुजरात येथे वसलेले असून, याला वेरावळ हा जिल्हा आहे. गिर सोमनाथ जिल्हा वेरावळ येथे सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे.भारतातीलच नाही तर पृथ्वीवरील पहिले मानले जाणारे हे सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे. पृथ्वीवर सर्वात प्रथम सोमनाथ ज्योतिर्लिंग होते. गुजरातच्या सौराष्ट्र देशात  वसलेल्या लिंगाला सोमनाथ ज्योतिर्लिंग असे म्हणतात.
शिव पुराणानुसार जेव्हा चंद्रमाला दक्ष प्रजापतीने क्षयरोग होण्याचा शाप दिला होता. तेव्हा येथे बसून चंद्रमानी तप केला. व श्रापापासून मुक्तता प्राप्त केली .
असे पण मानले जाते की या शिवलिंगाची स्थापना चंद्र देवांनी केली आहे. विदेशी आक्रमणामुळे हे शिवलिंग सतरा वेळा नष्ट झाले व पुन्हा व्यवस्थित झाले.व  सतरा वेळा सोमनाथ ज्योतिर्लिंग नष्ट होऊन ते पुर्ववत होते.

मल्लिकार्जुन
बारा ज्योतिर्लिंगापैकी दुसरे मानले जाणारे ज्योतिर्लिंग म्हणजे मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन हे आंध्रप्रदेश येथे स्थित आहे. श्रीशैल्य येथे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे.


महाकालेश्वर
बारा ज्योतिर्लिंगापैकी महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे तिसरी ज्योतिर्लिंग आहे. महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश येथे स्थित आहे. उज्जैन आंध्र प्रदेश हे महाकालेश्वरासाठी खूप प्रसिद्ध आहे.

ओंकारेश्वर
बारा ज्योतिर्लिंग पैकी चौथी मानले जाणारे ज्योतिर्लिंग म्हणजे ओमकारेश्वर ज्योतिर्लिंग.ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश मधल्या खंडवा जिल्ह्यामध्ये आहे.

वैजनाथ 
वैजनाथ हे महाराष्ट्र परळी बीड जिल्ह्यामध्ये वसलेले आहे .उत्तर भारतातील झारखंडमधील देवघर येथे स्थित असलेल्या वैद्यनाथ देवस्थानात वैजनाथ ज्योतिर्लिंग मानतात.

भीमाशंकर 
भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र स्थित आहे.ज्योतिर्लिंग तालुका खेड जिल्हा पुणे येथे स्थित आहे.महाराष्ट्रातील सर्व भक्तजन भीमाशंकर ज्योतिर्लिंग अभयारण्यात खूप मोठ्या प्रमाणे भेट देन्यास जात असतात. व ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी जात असतात.

रामेश्वर 
बारा ज्योतिर्लिंगापैकी सातवे मानले जाणारे ज्योतिर्लिंग म्हणजे रामेश्वर ज्योतिर्लिंग.रामेश्वर ज्योतिर्लिंग हे तामिळनाडू येथे स्थित आहे.रामेश्वर ज्योतिर्लिंग श्री रामेश्वर तालुका व रामनाथपुरम जिल्हा लागतो.

नागनाथ 
नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे मानले जाणारे ज्योतिर्लिंग म्हणजे नागनाथ ज्योतिर्लिंग आहे.हे महाराष्ट्र हिंगोली येथे आहे.उत्तर भारतातील गुजरातच्या द्वारकेतील नागेश्वर देवस्थान आज नागनाथ ज्योतिर्लिंग असे मानले जाते, मानतात.

विश्वेश्वर 
विश्वेश्वर हे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी 9 ज्योतिर्लिंग आहे.विश्वेश्वर हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे स्थित आहे.

 त्र्यंबकेश्वर
बारा ज्योतिर्लिंगापैकी दहावे मानले जाणारे ज्योतिर्लिंग म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात स्थित आहे.

केदारनाथ
 बारा ज्योतिर्लिंगापैकी अकरावे मानले जाणारे ज्योतिर्लिंग म्हणजे केदारनाथ ज्योतिर्लिंग. हे उत्तराखंड येथे स्थित आहे. केदारनाथ ज्योतिर्लिंग  रुद्रप्रयाग जिल्हा येथे स्थित आहे.

घृष्णेश्वर
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र वेरुळ येथे स्थित आहे. यास तालुका खुलताबाद व जिल्हा औरंगाबाद लागतो. बारा ज्योतिर्लिंगापैकी बारावे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे.

राज्यानुसार बारा ज्योतिर्लिंग ठिकाणांचे वर्गीकरण


राज्यज्योतिर्लिंग ठिकाणे
1)आंध्र प्रदेश1
2)गुजरात1
3)मध्य प्रदेश2
4)महाराष्ट्र5
5)तामिळनाडू1
6)उत्तर प्रदेश1
7)उत्तराखंड1
एकूण12

अशा प्रकारची बारा ज्योतिर्लिंगे आपल्या भारत देशामध्ये आहेत.  भारत देशांमधील या बारा ज्योतिर्लिंगांची नावे व त्यांची ठिकाणे आणि राज्य यासंदर्भात सविस्तर माहिती 12 Jyotirlinga या भागातून आपण घेतलेली आहे. 

 अधिक जाणते होण्यासाठी  माहितीने भरपूर आमचे इतर लेख वाचू शकता.  वरील 12 Jyotirlinga   या लेखात दिलेली माहिती उपयुक्त असून आपल्या मित्र मैत्रिणी पर्यंत शेअर करून सहकार्य करावे.  धन्यवाद!

विचारले जाणारे प्रश्न

 महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत?

महाराष्ट्रामध्ये  5 ज्योतिर्लिंग आहेत. पूर्ण भारत देशामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत.

सर्वाधिक ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यामध्ये आहेत?

सर्वाधिक ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत.

रामेश्वर के ज्योतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे?

रामेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण तमिळनाडू राज्यामध्ये आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर