चिंतामणी

चिंतामणी

अष्टविनायक सर्व शुभ शुभकार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पाची सर्वप्रथम पूजा करतात.तसेच महाराष्ट्राचे प्रिय आराध्य दैवत गणपती बाप्पाच आहे.
 आपले इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी बाप्पा चे पूजन करून आशीर्वाद घेतला जातो.
अष्टविनायक महाराष्ट्राच्या आठ मुख्य गणपतींच्या मंदिरांना एकत्रित पणे अष्टविनायक असे म्हणतात.
आजच्या धावपळीच्या काळात या आठ देवळांना भेट दिल्यानंतर मनाला सुख शांती व शांतता लाभते.अष्टविनायक हा शब्द अष्ट आणि विनायक या दोन शब्दांना मिळून बनलेला आहे.अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपले सर्वांचे प्रिय देवता गणपती बाप्पा.याच अष्टविनायका पैकी आज आपण पाहणार आहोत चिंतामणी बाप्पा विषयी.

चिंतामणी बाप्पा थेऊर ता.हवेली ,जी.पुणे येथे स्थित बाप्पाचे मंदिर आहे. अष्टविनायकातील दुसरा मानाचा गणपती म्हणजे चिंतामणी.या गणपतीचे थेऊर येथे  कदंब वृक्षाखाली ठिकाण आहे.भक्तांचे चिंतन हरण करणारा बाप्पा म्हणून या बाप्पाला चिंतामणी असे म्हणतात.पुण्यातील पेशवे घराण्यातील लोक अनेकदा थेऊरला या बाप्पाचे दर्शन घ्यायला यायची.

चिंतमणी बाप्पाची कथा

आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला. जेंव्हा गणासूराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेंव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासूराला उत्तमोत्तम पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ घातले. गणासूराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले. दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला.

गणपतीने गणराजाला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिला. याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेंव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला 'कदंबपूर' असेसुद्धा म्हणतात.

जवळची दर्शनीय स्थळें

  •  थेऊरच्या दक्षिणेकडील डोंगररंगांमध्ये भुलेश्वराचे प्राचीन आणि प्रेक्षणीय शिवमंदिर आहे. अंदाजे अंतर ४० किमी
  • श्री नारायण महाराज यांचा आश्रम व दत्तमंदिर पुणे-दौंड मार्गावर केडगांव येथे आहे. अंदाजे अंतर ४३ किमी
  • थेऊरजवळील लोणीपासून सुमारे चार ते पाच किमी अंतरावर रामदरा हे ठिकाण आहे. येथे पाण्याने वेढलेले शिवमंदिर आहे. अंदाजे अंतर ४ ते ५ किमी
  • थेऊर फाट्याओअसून जवळच पुणे-सोलापूर महामार्गावर उरळीकांचन येथे महात्मा गांधी यांनी स्थापन केलेला निसर्गोपचार आश्रम आहे. अंदाजे अंतर १३ किमी
  • वाघोली-केसनंद या मार्गावर वाडेबोल्हाई मंदिर आहे. अंदाजे अंतर १३ किमी
  • पुणे-नगर मार्गावर तुळापुर येथे भीमानदीकाठी संगमेश्वर मंदिर आणि छत्रपती संभाजीमहाराज यांचे स्मारक आहे. अंदाजे अंतर २१ किमी


इतिहास
 थेऊर येथील गणेश मूर्तीची स्थापना कपिलमुनींनी केली.कपिल मुनी जवळ एक चिंतामणी नावाचे रत्न होते. हे रत्न त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करीत असे. एकदा गाना सूर त्यांच्या आश्रमात आला असता. त्यांनी या रत्नाच्या सहाय्याने त्याला पंचपक्वान्नाचे जीवन दिले. हे पाहून गानासुरूला त्याच रत्नाचा मोहन निर्माण झाला. त्याने कपिल मुलींकडे या रत्नाची मागणी केली व त्यांनी नकार देताच गणात पुराने हे रत्न हिसकावून घेतले.कपिल मुनींनी गणेशाची उपासना केली .विनायकाने प्रसन्न होऊन येथील कदंब वृक्षाखाली गानास्वराचे पारिपत्य केले. तेव्हा मुनींनी विनायकाच्या गळ्यात हे रत्न बांधले. तेव्हापासून गणेशाला चिंतामणी नावाने संबोधले जाऊ लागले .गौतम ऋषींच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी इंद्राने याच गणेशाची आराधना केली असेही ऐकेविता आहे.या क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड येथील मोरया गोसावी संस्थेकडे आहे. चिंचवडच्या मोरया गोसावींनी तपश्चर्या केली असता. विनायकाने वाघाच्या रुपात त्यांना दर्शन दिले. मुळा व मुठा नद्यांनी वेढलेल्या या देऊन गावाला पूर्वी कदंब तीर्थ या चिंतामणीतीर्थ म्हटले जात असे .कदंब वृक्षाच्या खाली हे मंदिर वसलेले आहे. या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वाराच्या प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा असून, येथे शमी व मंदार वृक्ष आहेत. पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे. त्यापुढे गाभार्‍यात डाव्या सोंडेची शेंदूर लावलेली चिंतामणीची स्वयंभू मूर्ती आहे. या पूर्वाभिमुख गणेश मूर्तीच्या डोळ्यात माणिक रत्न आहेत.

स्थान: तालुका- हवेली, जिल्हा -पुणे, पिनकोड 412 110

अंतर: पुणे -सोलापुर ,राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 पासून जवळ .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर