श्रावण महिना
श्रावण महिना
द्वादशस्वपि मासेषु श्रावणो मेऽतिवल्लभ: । श्रवणार्हं यन्माहात्म्यं तेनासौ श्रवणो मत: ।।
श्रवणर्क्षं पौर्णमास्यां ततोऽपि श्रावण: स्मृत:। यस्य श्रवणमात्रेण सिद्धिद: श्रावणोऽप्यत: ।।
यायचा अर्थ श्रीशंकर म्हणतात मला सगळ्या महिन्यांमध्ये हा महिना सगळ्यात जास्त आवडता आहे.या महिन्यात नक्षत्र युक्त पौर्णिमा असते, त्यामुळे या महिन्याला श्रावण महिना असे म्हणतात.सगळे महात्मा लोक या महिन्यातच पूजाअर्चा करून विद्या आत्मसात करतात. महिन्यात चंद्र श्रवण नक्षत्रात जातो म्हणून या महिन्याला श्रावण महिना असे म्हणतात.
अधिक श्रावण
अधिक श्रावण मास साधारणपणे आठ, अकरा एखाद्यावेळी एकोणीस वर्षानंतर येतो.या अधिक मासात सण येत नाहीत.एकादशी सोडून कोणताही सण अधिक मासात नसतो.या महिन्यात येणाऱ्या शुक्ल एकादशीला आणि वद्य एकादशीला साधारणतः एकादशीला कमला एकादशी म्हणतात. या महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशीला कमला एकादशी असेच म्हणतात.ज्या वर्षी अधिक श्रावण येतो त्या वर्षी पाच महिने चातुर्मास असतो.या चातुर्मासात लग्न सोहळे होत नाहीत. लग्न सोहळ्याच्या तिथीच या चातुर्मासात नसतात .
चातुर्मासात गेलेली व येणारी वर्ष.
इसवी सन १९०१, १९०९, १९२०, १९२८, १९३९, १९४७, १९५८, १९६६, १९७७, १९८५, २००४ आणि २०२३, २०४२, २०६१...वगैरे.
श्रावण महिन्यातील सण
- श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी)))
- श्रावण शुद्ध पंचमीला नागदेवतेची पूजा करतात म्हणून या पंचमीला नागपंचमी असे म्हणतात.या या दिवशी नाग देवतेची पूजा करण्याची प्रथा रुढी परंपरेने खूप दिवसापासून भारतात चालू आहे.
- श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठीच्या दिवशी कल्की जयंती असते.श्रावण शुक्ल त्रयोदशी- नरहरी सोनार जयंती.
- श्रावण पौर्णिमा-रक्षाबंधन ,नारळी पौर्णिमा
- नारळी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी नारळ समुद्रात टाकले जाते,म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.
- रक्षाबंधन बहिण आपल्या भावाला या दिवशी राखी बांधते म्हणून या सणाला किंवा या श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा म्हणतात.
- श्रावण वद्य प्रतिपदा
- श्रावण वद्य अष्टमी-श्रीकृष्ण जन्माष्टमी
- श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात. किंवा श्रीकृष्ण जयंती असेही म्हणतात. कारण या दिवशी श्री कृष्णाचा जन्म झाला होता.
- पिठोरी अमावस्या \दर्भ ग्रहणी अमावस्या -पोळा
- श्रावण महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात.संततिच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती महिला पिठोरी व्रत करतात.
- या दिवशी काही ठिकाणी पोळा हा सण साजरा केला जातो. हा सण बैलाचा संबंधित येतो.या दिवशी बैलांचा साज शृंगार करून त्याची मिरवणूक काढली जाते.
श्रावण महिन्यातील व्रत
सोमवार
चातुर्मासामधील सर्वात श्रेष्ठ महिना हा श्रावण महिना आहे. अनेक शिवभक्त श्रावणी सोमवारी उपवास करतात. एक वेळेस जेवण करून संध्याकाळी व्रत सोडण्याची रीत आहे. समुद्रमंथन झाल्यानंतर त्यामधून बाहेर पडलेले हलाहल विष शंकराने प्राशन करून मनुष्यांवरील धोका टाळला. त्यामुळे भगवान शंकराचे मनुष्य वर्गावर असलेले हे ऋण फेडण्यासाठी श्रावणी सोमवारी विशेष पूजा करून त्याच्याप्रती आदर व्यक्त केला जातो. अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे.
मंगळवार
मंगळवार :- श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगलागौरीचे व्रत केले जाते. हे व्रत नवोढा (नवविवाहित) मुलींचे नित्य आहे. विवाहानंतर पाच किंवा सात वर्षे हे व्रत करतात. या व्रताच्या देवता शिव, गणेश यांच्याबरोबर गौरी आहे. पूजनाचा मंत्र ः पुत्रान् देहि धनं देहि सौभाग्यं देहि मङ्गले। अन्यांश्च सर्वकामांश्च देहि देवि नमोऽस्तु ते।। पूजन झाल्यावर या व्रताची कहाणी ऐकावी.
बुधवार
बुधवार :- महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुध-बृहस्पती पूजनाचे व्रत केले जाते. बुध-बृहस्पतीचे (गुरू) चित्र घेतात किंवा रेखाटतात. त्याची पूजा करतात. दहीभाताचा नैवेद्य दाखवितात. सात वर्षांनंतर काही स्त्रिया याचे उद्यापन करतात.
गुरुवार
गुरुवार :- श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पतीपूजन करण्यास सांगितले आहे. यांची देवता बृहस्पती (गुरू) आहे.
शुक्रवार
शुक्रवार :- श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका पूजन करण्यास सांगितले आहे. ही बालसंरक्षक आहे. पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधाने भिंतीवर जिवंतिकेचे चित्र काढतात. आता सर्वत्र छापील चित्र मिळते. जिवंतिकेचे ध्यान असे आहे : जरे जिवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि। रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोऽस्तुते।। जिवंतिकेची पूजा करून देवीला ओवाळतात व देवीची प्रार्थना करतात- ‘अक्षतां निक्षिपाम्यम्ब यत्र मे बालको भवेत्। तत्र त्वया रक्षणीयो जीवन्ति करुणार्णवे।।’ हे करुणामयी माते, मी जिकडे अक्षता टाकते, त्या दिशेला असणाऱ्या माझ्या बालकाचे तू रक्षण कर. आपल्या इकडे जरा-जिवंतिका म्हणतात. यात जरा ही देवीसुद्धा बालकांचे रक्षण करणारी आरविवारहे.
शनिवार
श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे, असे मानले जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा