आषाढी अमावस्या दिपोत्सव

आषाढी अमावस्या दिपोत्सव

आषाढी अमावास्या या दिवशी आद्रा नक्षत्र वृद्धि योग आणि नाग करण येत आहेत.या दिवशी वृद्धि योग असल्यामुळे आर्थिक संकट दूर होतील.  यामुळे सुख संपत्ती प्राप्त होईल व आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल.नाग करणामुळे कालसर्प दोष, नाग दोष ,ग्रहण दोष ,राहू-केतू दोष हे या येणार नाहीत.



सणासुदीत, दररोज ,पूजापाठ करत असताना आपण विधिवत पद्धतीने पूर्ण करतो. ते कार्य  प्रत्येक शुभकार्यात पहिले दीपप्रज्वलन करतात. मग पुढील कार्यक्रम सुरू होतो. प्रत्येक वेळी पहिले दीपप्रज्वलन करायचे हे विधिवत खूप जुनीपरंपरा आहे.यापद्धतीत पूर्वजांचा काहीतरी उद्देश नक्की असेल. 



दिव्यांच्या प्रकाशातच अंधकाराचा हरण होत असतं.
आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमवस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरु होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे.
या दिवशी सकाळीच घरातील, दिवे, समया, निरांजने, लामण दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. दिवे चकचकीत करुन पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करुन सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून प्रज्वलित करुन ही दीप पूजा केली जाते. काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करुन त्यांचीही पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते. अनेकजण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात. सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते.



दीप अमवास्येच्या दिवशी भगवान शंकर, पार्वती, आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात. काही ठिकाणी महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला १०८ प्रदक्षिणाही करतात. या दिवशी पितरांना तर्पण देत पुरणाचा नैवैद्य दाखवल्यास पितर प्रसन्न होतात असं मानलं जातं. गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्या व्रत करतात, पूजा करतात आणि दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष व पापांपासून मुक्त केले जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी उपवास ठेवल्याने मृत पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते असे मानले जाते. या दिवशी झाडं लावून ग्रह दोष शांत होतो असंही सांगितलं जातं. या दिवशी पिंपळ, केळी, लिंबू किंवा तुळशीचं रोपटं लावलं जातं. या दिवशी गंगास्थान आणि देणगी देण्यालाही फार महत्व असतं. या दिवशी माशांना पिंपळाच्या झाडाला 108 फेरे मारतात व पूजा करतात. 



काय आहे दीप अवस्याचे महत्व :

  • गरूड पुराणानुसार, प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे महत्व सांगण्यात आले आहे, त्याप्रमाणे आषाढ महिन्यातील अमावस्येला दीप पूजन करण्याचे महत्व सांगण्यात आले आहे.
  • अनेक लोकं या पवित्र दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच त्यांच्या नावाने दान सुद्धा केले जाते.
  • या दीप पू़जनात घरातील दिव्यांबरोबरच कणकेचे दिवे बनवण्याचे सुद्धा महत्व सांगितले जाते. या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पुर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते. या दिवशी एखादे झाड लावल्यास ग्रह दोष देखील शांत होतो.


दीप पूजन कसे करावे


  • महिलांनी या दिवशी सकाळीच घरातील दिवे,निरांजन,समई,लामण स्वच्छ करुण ठेवावे. तसेच सर्व दिवे पाटावर मांडून त्यांची पूजा करावी. पाटाभोवती रांगोळी काढून सुवासिक फुलांनी  त्याची सजावट करावी.
  • सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून दिप प्रज्वलित करावे. अशा प्रकारे आषाढी दीप अमवस्या साजरी करण्यात येते. तसेच काही ठिकाणी ओल्या मातीच्या दिव्यांची पूजा करण्यात येते.
  • हळद,कूंकू,अक्षता,फूले वाहून दिव्यांची पूजा केली जाते.तर अनेकजण कणकेचे उकडलेले गोड दिवे तयार करुन नैवैद्य दाखवतात व सांयकाळी सर्व दिव्यांची आरती करण्याता येते.
  • शुभंकरोती ही प्रर्थना करुन लहान मुलांना सांयकाळी ओवाळलं जात. लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असे मानले जाते म्हणून या दिवशी त्यांना ओवाळण्यात येते.

दीप प्रज्वलन मंत्रोपचर


शुभं करोति कल्याणम् 
आरोग्यम् धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय
दीपकाय नमोऽस्तुते ॥

दीपो ज्योति परं ब्रह्म
 दीपो ज्योतिर्जनार्दन: ।
दीपो हरतु मे पापं 
संध्यादीप नमोऽस्तुते ॥



दीपाराति

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार
 |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||

तिळाचे तेल कापसाची वात |
दिवा जळो मध्यान्हरात |
दिवा लावला देवांपाशी |
उजेड पडला तुळशीपाशीं |
माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||

दीपज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन |
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोऽस्तुते|| 3 ||

अधिराजा महाराजा वनराज वनस्पती।
इष्टदर्शनं इष्टानं शत्रूणां च पराभवम् |
मुले तु ब्रह्मरुपाय मध्ये तु मध्यविष्णुरुपिण: |
अग्रतः शिवरुपाय अश्वत्थाय नमो नमः ||

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर