मोरेश्वर

मोरेश्वर


अष्टविनायक सर्व शुभ शुभकार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पाची सर्वप्रथम पूजा करतात.तसेच महाराष्ट्राचे प्रिय आराध्य दैवत गणपती बाप्पाच आहे.
 आपले इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी बाप्पा चे पूजन करून आशीर्वाद घेतला जातो.
अष्टविनायक महाराष्ट्राच्या आठ मुख्य गणपतींच्या मंदिरांना एकत्रित पणे अष्टविनायक असे म्हणतात.
अष्टविनायक म्हणजे आठ मंदिरांचा समूह.

अष्टविनायक म्हणजे स्वयंभू 8 देवळे आहेत. हे देवळे निसर्गरम्य ठिकाणी आहे.आजच्या धावपळीच्या काळात या आठ देवळांना भेट दिल्यानंतर मनाला सुख शांती व शांतता लाभते.अष्टविनायक हा शब्द अष्ट आणि विनायक या दोन शब्दांना मिळून बनलेला आहे.अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपले सर्वांचे प्रिय देवता गणपती बाप्पा.

या अष्टविनायकामध्ये मोरगावच्य बाप्पाचे स्थान खूप मोठे आहे.पहिला मानाचा बाप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरगावच्या मयुरेश्वरा विषयी आज आपण पाहणार आहोत.

मोरेश्वर हा गणपती अष्टविनायकातील मानाचा पहिला गणपती आहे.अष्टविनायकातील मोरगावचा मोरेश्वर गणपती बाप्पा हे महत्त्वाचे सथान आहे.  या गणपतीस श्री मयुरेश्वर असे ही म्हटले जाते.प्रत्येक घराघरात म्हटली जाणारी आरती 'सुखकर्ता दुखहर्ता' ही आरती रामदास स्वामींनी याच मंदिरात लिहिली असे म्हटले जाते.मंदिराच्या जवळच कार्हा नदी वाहते.बापाच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत.मंदिरा सुंदर असे नक्षीकाम दिसते. या मंदिराच्या जवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा राया यांचे मंदिर सतरा किलोमीटरच आहे.  सिद्धेश्वर गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला जाणारे भक्त जण खंडोबारायाची दर्शन घेतात. खंडोबा रायाचे दर्शन घेणारे मयुरेश्वराचे पण दर्शन घेतात.

मोरेश्वर हे हिंदू मंदिर आहे. या मंदिराला ज्ञानाचे भंडार असलेल्या गणपतीबाप्पाला समर्पित केले असून हे मंदिर पुण्यात स्थित आहे.भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या पुण्याहून 65 किलोमीटर अंतरावर मोरगाव मोरेश्वर मंदिर आहे .अष्टविनायक यात्रा करताना सर्वप्रथम मोरेश्वराचे दर्शन घेतात व येथूनच सुरु होते. अष्टविनायकाची यात्रा. दरवर्षी भक्त जण अष्टविनायकाची यात्रा करत असतात. तेव्हा मोरेश्वराचे हे खूप जण दर्शन घेतात.या बाप्पाला सोनेरी ,नारंगी, पांढरा हे रंग प्रिय आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामती तहसील पासून 35 किलोमीटर अंतरावर मोरगाव आहे. येथूनच जवळ महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा 17 किलोमीटर अंतरावर स्थित आहे.

श्री गणेशाचे हे आद्यपीठ होय.हे क्षेत्र बॉस व आनंद भुवन म्हणून ओळखले जाते.महाराष्ट्रातील साडेतीनमहाराष्ट्रातील साडे तीन गणेश पीठांपैकी हे आद्यपीठ.या स्थानाचे महात्म्य मुद्गुल पुराणातील सहाव्या खंडात समाविष्ट आहे. भूषण ऋषींच्या सांगण्यावरून ब्रम्हा ,विष्णू, महेश, शक्ती व सूर्य या पाच देवतांनी येथे अनुष्ठान करून, गणेश पिठाची स्थापना केली आहे. या स्थानी गणेशाने मोरावर बसून सिंधू व मल्लासुर दैत्याचा संहार केला.या युद्धात गणेशाचे मोर हे वाहन होते. त्यावरून येथील गणेशास मयुरेश्वर व मोरेश्वर असे म्हणतात.येथील मंदिराची उभारणी ब्रम्हदेवाने केली. चिंचवड येथील महान गणेश उपासक श्री मोरया गोसावी यांचे हे जन्मस्थान येथे कर्‍हा नदीच्या पात्रात त्यांना गणेश मूर्ती सापडली. त्यांनी त्या मूर्तीची चिंचवड येथे स्थापना केली. मोरगाव क्षेत्राचे व्यवस्थापन चिंचवड देव स्थानाकडे आहे. वर्षातून दोन वेळा गणेशाची पालखी चिंचवडहून येथे येते. चारशे वर्ष पूर्वी योगींद्र महाराजांचा येथे अवतार झाला. त्यांनी येथे योगींद्र मठाची स्थापना केली.संपूर्ण भारतात गणेश संप्रदायाचा प्रसार केला. गाणपत्य संप्रदायाचे हे प्रमुख केंद्र आहे त्यांनी 228 वर्षांचे आयुष्य लाभले.येथील त्यांची समाधी व स्थान मंदिर दर्शनीय आहे.मयुरेश्वर मंदिरात त्यांचा सुंदर पुतळा आहे. मयुरेश्वराचे दर्शन घेताना समर्थ रामदासांनी सुखकर्ता दुखहर्ता ही आरती उत्स्फुर्तपणे रचली. येथील विजया दशमीचा उत्सव रात्रभर चालतो उत्सवात गणेशास तोफांची सलामी दिली जाते. नंतर गणेशाची पालखी गावात मिरवली जाते व गावातील सर्वांच्या वंशावळीचे वाचन होते.
पुरंदर तालुक्यात कर्‍हा नदीच्या तीरावर उत्तराभिमुख असे हे मंदिर आहे. भोवती तटबंदी असून मंदिराच्या चारही दिशेला चार मिनारासारखे खांब आहेत. मंदिराला पायऱ्या असून तेथेच नगारखाना व बाजूला पायात लाडू धरलेला उंदीर आहे. पुढे अकरा पायर्‍या चढून  गेल्यावर एक दगडी चौथऱ्यावर मोठा आकाराचा गणपती कडे तोंड केलेला नंदी आहे. त्या नंदी पुढे मोठे चपटी व दगडी असे कासव आहे. या कासवा पुढे मुख्य मंदिर लागते. हे दगडी  पाषानात असून येथेही एक मोठा उंदीर आहे. मंदिराच्या गाभार्‍यात डाव्या सोंडेची मयुरेश्वराची मूर्ती आहे. या मूर्तीला तीन डोळे असून डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या पुतळ्यांची मूर्ती आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर