अष्टविनायक

अष्टविनायक

अष्टविनायक सर्व शुभ शुभकार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पाची सर्वप्रथम पूजा करतात.तसेच महाराष्ट्राचे प्रिय आराध्य दैवत गणपती बाप्पाच आहे.
 आपले इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी बाप्पा चे पूजन करून आशीर्वाद घेतला जातो.
अष्टविनायक महाराष्ट्राच्या आठ मुख्य गणपतींच्या मंदिरांना एकत्रित पणे अष्टविनायक असे म्हणतात.
अष्टविनायक म्हणजे आठ मंदिरांचा समूह .

  1. मोरेश्वर -मोरगाव जि. पुणे 
  2. चिंतामणी -थेऊर ता. हवेली, जि. पुणे 
  3. गजमुख (सिद्धिविनायक)- सिद्धाक, ता.श्रीगोंदे, जि.अहमदनगर
  4. महागणपती- रांजणगाव,ता. शिरूर, जि. पुणे  
  5. विघ्नेश्वर-ओझर,ता. जुन्नर ,जि. पुणे  
  6. गिरीजात्मक-  लेण्याद्री.   
  7. वरद विनायक- महाड ,जिल्हा खालापूर ,कुलाबा
  8. बल्लाळेश्वर- पाली ,ता. सुधागड ,जि.कुलाबा.
 अष्टविनायक म्हणजे स्वयंभू 8 देवळे आहेत. हे देवळे निसर्गरम्य ठिकाणी आहे.आजच्या धावपळीच्या काळात या आठ देवळांना भेट दिल्यानंतर मनाला सुख शांती व शांतता लाभते.अष्टविनायक हा शब्द अष्ट आणि विनायक या दोन शब्दांना मिळून बनलेला आहे.अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपले सर्वांचे प्रिय देवता गणपती बाप्पा.
 अष्टविनायक हे मंदिर मोरगाव, रांजणगाव ,ओझर, पुणे, पाली आणी महाड, सिद्धटेक, अहमदनगर या जिल्ह्यात अष्टविनायक वसलेले आहे.हे अष्टविनायक मंदिरे  पुणे जिल्ह्यात 6 व 2 रायगड जिल्ह्यांत आहे .रायगड जिल्ह्यातील मंदिरे पुण्याजवळच आहे.

मोरेश्वर

मोरेश्वर हा गणपती अष्टविनायकातील मानाचा पहिला गणपती आहे.अष्टविनायकातील मोरगावचा मोरेश्वर गणपती बाप्पा हे महत्त्वाचे सथान आहे.  या गणपतीस श्री मयुरेश्वर असे ही म्हटले जाते.प्रत्येक घराघरात म्हटली जाणारी आरती 'सुखकर्ता दुखहर्ता' ही आरती रामदास स्वामींनी याच मंदिरात लिहिली असे म्हटले जाते.मंदिराच्या जवळच कार्हा नदी वाहते.बापाच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत.मंदिरा सुंदर असे नक्षीकाम दिसते. या मंदिराच्या जवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबा राया यांचे मंदिर सतरा किलोमीटरच आहे.  सिद्धेश्वर गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला जाणारे भक्त जण खंडोबारायाची दर्शन घेतात. खंडोबा रायाचे दर्शन घेणारे मयुरेश्वराचे पण दर्शन घेतात.

चिंतामणी

 अष्टविनायकातील दुसरा मानाचा गणपती म्हणजे चिंतामणी.हा गणपतीचे थेऊर येथे  कदंब वृक्षाखाली ठिकाण आहे.भक्तांचे चिंतन हरण करणारा बाप्पा म्हणून या बाप्पाला चिंतामणी असे म्हणतात.पुण्यातील पेशवे घराण्यातील लोक अनेकदा थेऊरला या बाप्पाचे दर्शन घ्यायला यायची.

सिद्धिविनायक

सिद्धटेक चा गणपती बाप्पा ला सिद्धिविनायक असे म्हणतात.अष्टविनायकातील हा तिसरा  गणपती बाप्पा आहे.हा गणपती उजवी सोंड असणारा एकमेव गणपती बाप्पा आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठी  वसलेल आहे.सिद्धिविनायक हे मंदिर स्वयंभू असून .याच्या गाभाऱ्याचे रुंदी खूप मोठी आहे.

महागणपती

रांजणगाव येथे वसलेल्या गणपती बाप्पाला महागणपती असे म्हटले जाते.गणपतीबाप्पाला तालुका शिरूर जिल्हा पुणे लागतो.अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती बाप्पा आहे.हे बाप्पाचे स्वयंभू स्थान आहे.हे पुणे अहमदनगर महामार्गावर, शिरूर तालुक्यातील हे ठिकाण आहे. हे गणपती बाप्पा आपल्याला दिसून येतात.सर्व  अष्टविनायक गणपती बाप्पा मध्ये हा बाप्पा सर्वात  शक्तिशाली समजला जातो.या बाप्पा ची सोंड  उजवीकडून, असून हा कमळावर विराजमान आहे.
श्रींच्या मूर्तीला दहा हात अशी प्रसन्न मूर्ती आहे.
या स्थानाबद्दल एक आख्यायिका आहे की – शिवशंकरांनी त्रिपुरासुराला थोडी शक्ती दिली होती. या शक्तीचा गैरवापर करून त्रिपुरासुरा स्वर्ग आणि पृथ्वीच्या लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी, अशी वेळ आली की जेव्हा भगवान गणेशाला नमन करून भगवान शिव यांना त्रिपुरासुर मारले गेले. म्हणूनच या गणेशास ‘त्रिपुरिवाडे  महागणपती’ असेही म्हणतात.


विघ्नेश्वर

अष्टविनायका पैकी विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे.
श्रींच्या डोळ्यात माणिक व कपाळावर हिरा आहे.अशी श्रींची मूर्ती प्रसन्न वाटते.मंदिराच्या  चहुबाजूंनी तटबंदी असून कुकडी नदीच्या तीरावर हे हे मंदिर आहे.सर्वात श्रीमंत समजला जाणारा गणपती बाप्पा म्हणजे विघ्नेश्वर.पप्पा विघ्नांचे हरण करतो म्हणून या बाप्पाला विघ्नेश्वर असे म्हणतात.प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश याला विघ्नेश्वर असे म्हणतात.शिवाजी महाराजांचा जन्म किल्ला असलेला शिवनेरी किल्ला इथून जवळच आहे.

गिरिजात्मक

अष्टविनायकापैकी सहावा गणपती बाप्पा म्हणजे गिरिजात्मक. लेण्याद्री तेथे असलेल्या गणपती बाप्पाला श्री गिरिजात्मक असे म्हणतात. शिवनेरी जुन्नर तालुकाच्या कुकडी नदीच्या परिसरातील ही स्वयंभू गणपती बाप्पा चे ठिकाण आहे.श्री गणेशाची मूर्ती दगडाने कोरलेली आहे.मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे चारशे पायऱ्या आहे.गिरिजात्मक हे ठिकाण लेण्याद्री पासून सात किलोमीटर अंतरावर आहे.

वरद विनायक

अष्टविनायकांपैकी सातवा बाप्पा म्हणजे वरदविनायक. विनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा विनायक आहे.हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात.वरद विनायकाचेमंदिर साधे कौलारू घुमट असून सोनेरी कळस आहे.कळसावर नागाची नक्षी आहे. महाड हे ठिकाण पुणे-मुंबई महामार्गावर खालापूर  दरम्यान येते.

बल्लाळेश्वर

पाली येथे वसलेल्या अष्टविनायकापैकी हा आठवा गणपती बाप्पा आहे.  या गणपती बाप्पाला बल्लाळेश्वर म्हणतात.हे पूर्वाभिमुख मंदिर आहे. हे स्वयंभू बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचे मंदिर आहे.हे अंबा नदीच्या काठी आहे.विनायकाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. हे मंदिर चिरेबंदी आहे.मंदिरात मोठी घंटा असून ति चीमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर