गणेशोत्सव
गणेशोत्सव
ओम गण गणपतये नमः
गणेश उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. या उत्सवाचा कालावधी दहा दिवसाचा असतो. या उत्सवाची सुरुवात भाद्रपद शुक्ल चतुर्थीला होते .व हा उत्सव अनंत चतुर्थी ला बाप्पाचे विसर्जना नंतर संपतो. गणेशोत्सव साधारणता ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यात असतो. या उत्सवादरम्यान मोठमोठ्या पंगती, व्रत,( उपवास )गणेश बाप्पाचे जप केले जाते .गणेशोत्सव मोठ्या प्रमाणे महाराष्ट्रात साजरा होतो. महाराष्ट्रात अष्टविनायक वसलेले आहे. हे महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे.
या हिंदू कॅलेंडर मध्ये प्रत्येक चंद्र महिन्यात दोन चतुर्थी तिथे असतात आणि तसेच हिंदू धर्म ग्रंथानुसार चतुर्थी तिचा संबंध भगवान श्री गणेशाची आहे. अमावस्या नंतर चतुर्थी किंवा शुल्क पक्षाच्या दरम्यान अमावस्या विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते आणि कृष्णपक्षातील पौर्णिमा किंवा पौर्णिमा चंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते.
विनायक चतुर्थीला दर महिन्याला उपवास केला जात असला तरी, सर्वात महत्त्वाचा विनायक चतुर्थी भाद्रपद महिन्यात होतो. भाद्रपद दरम्यान विनायक चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जात असे म्हणजे केली जाते. गणपती चा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण भारतभरातील हिंदूंनी दर वर्षी गणेश चतुर्थी साजरी केली जात असते. गणेश चतुर्थी उत्सव चातू मार्चमध्ये येते मासा किंवा चा तोमार व्रताचे महत्त्व तुम्हाला पाहण्यास मिळेल. चातुर्मास सणांनी भरलेले असतात.उपासनेच्या दृष्टिकोनातून हे चार महिने खूप महत्त्वाचे आहेत आणि यात अनेक धार्मिक उत्सव साजरे केले जात असतात. श्रावण महिन्यात शिवभक्ती केले जाते.
गणेशोत्सव म्हणजे काय?
गणेशोत्सव हा हिंदू लोकांचा सण आहे. जरी तो संपूर्ण भारतात कमी – अधिक प्रमाणात साजरा केला जात असला तरी महाराष्ट्रातील गणेशोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. पुण्याचा गणेशोत्सव महाराष्ट्रातही सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण चतुर्थी ते भाद्रपद महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत दहा दिवस चालत असतो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी असेही म्हणतात.
गणपती बाप्पा हे हिंदूंची मूळ देवता आहे. हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष स्थान देण्यात आले आहे. मग तो कोणताही धार्मिक सण, यज्ञ, पूजा इत्यादी असो, मग ते एखादे चांगले काम असो किंवा लग्न सण असो, कोणतेही काम पूर्ण झाले, म्हणून गणपती बाप्पाची पूजा सर्वात आधी केली जाते. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, चालुक्य वगैरे सात वाहने गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाला सुरू झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनीही गणेशाची पूजा केली.
यंदाचा विशेष गणेशोत्सव
कोरोनामुळे दोन वर्षे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. परंतु यावर्षी गणेशोत्सव पूर्वी प्रमाणेच धुमधडाक्यात होणार असल्याची ,भूमिका बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून जाहीर करण्यात आले आहे.
येत्या काही दिवसातच आता मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पाद्यपूजन सोहळे पार पडतील आणि गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला सुरुवात करतील. गेले २ वर्ष कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाने दिलेल्या अनेक निर्बंधासह अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र यंदाचा गणेशोत्सव २०१९ पूर्वी प्रमाणे धुमधडाक्यातच साजरा होणार.
यंदा गणेशोत्सव पूर्वीप्रमाणेच धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार असल्याचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या या भूमिकेमुळे गणेशोत्सव मंडळांनी यांच्या या भूमिकेचं स्वागत केले आहे. यंदाचा गणेशोत्सव ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होत आहे. ते ९ स्प्टेंबर २०२२ ला अनंत चतुर्थीला बाप्पाच्या विसर्जनानंतर संपणार आहे.
गणेश चतुर्थी
गणेश उत्सव हा गणेश चतुर्थी पासून सुरु होतो.तर अनंत चतुर्दशीला संपतो. या दहा दिवसाच्या कालावधीला गणेशोत्सव म्हणतात. अनंत चतुर्दशीला बाप्पाची विसर्जन करतात. गणपती बाप्पाला ज्ञान,समृद्धी,सौभाग्याचा देवता म्हणून पूजा केली जाते.
मोदक हा गणपती बाप्पा चा सर्वात आवडता पकवान आहे.या उत्सवाची सुरुवात भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला होते. व अनंत चतुर्थीला शेवट होते. भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी हा गणेशोत्सवातील पहिला दिवस बाप्पाच्या जन्मदिवस म्हणून साजरा .खाली. त्यालाच गणेश चतुर्थी असे म्हणतात. विनायक हे श्री गणेशाचे दुसरे नाव आहे. गणेश चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ ,गोवा ,ओडिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात घरोघरी ,सार्वजनिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाची मूर्ती कच्या मातीची बनवली जाते,किंवा विकत आणली जाते. व घरोघरी सार्वजनिक ठिकाणी बाप्पाची पूजा केली जाते. उत्तर भारतातील काही राज्यात हा गणेश उत्सव काही मंदिरात बाप्पाची अस्थायि प्रतिमा स्थापन करून उत्सव साजरा करतात.
अनंत चतुर्दशी
गणेशोत्सवातील शेवटचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्थीला गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातील महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात हा दिवस गणपती विसर्जन म्हणून साजरा केला जातो. गणेश उत्सवात दहा दिवस पूजन केलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे समुद्र, नदी, तलाव यांमध्ये मोठ्या धूमधडाक्याने विसर्जन केले जाते.
उत्तर भारतात काही ठिकाणी लोक संकल्पाच्या रूपात 14 गाठी वाल्या दोऱ्याला बाजूवर बांधतात. या पवित्र धाग्याला (दोऱ्याला) अनंत म्हटले जाते. म्हणून या उत्सवाला अनंत चतुर्दशी असे म्हणतात.
इतिहास गणेशोत्सवाचा
एक अंदाज आहे की इ.स्.१६३० ते इ.स्.१६ ८० या कालावधीत गणेश चतुर्थी उत्सव, गणेशउत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात एक सार्वजनिक कार्यक्रमाच्या रूपात साजरा केला जायचा. शिवाजी महाराजांच्या काळात गणेशोत्सव व त्यांच्या साम्राज्याचा कुलदेवता या रूपात कायम साजरा केला जायचा. या उत्सवाला इसवी सन १८९३ मध्ये लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाला पुनर्जीवित जाते.सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल चर्चा करताना आतापर्यंत बर्याच ऐतिहासिक घटनांचा वेध आपण घेतला. अगदी पेशवाईच्या काळात साजरा होणारा दरबारी थाटाचा गणेशोत्सव, त्यानंतर ब्रिटिश राजवटीमुळे गणेशोत्सवाचे बदलत गेलेले स्वरूप आणि १८९० नंतरच्या काळात या गणेशोत्सवाचे सार्वजनिकरीत्या झालेले पुनरुज्जीवन! १८९३ साली साजरा केल्या गेलेल्या गणेशोत्सवाची प्रेरणा ग्वाल्हेरच्या दरबारात साजरा होणार्या गणपतीच्या उत्सवापासून नानासाहेब खाजगीवाले यांनी घेतली आणि इकडे तशाच पद्धतीचा उत्सव सुरू करण्यासाठी आपल्या सहकार्यांना गळ घातली. यातूनच भाऊ रंगारींच्या घरी सभा भरली आणि सार्वजनिक स्तरावर गणपती बसवण्याचे नक्की होऊन तसा तो उत्सव साजरा झालाही. लोकमान्य टिळकांनी जरी आपला स्वतःचा सार्वजनिक स्वरूपाचा गणपती १८९४ साली विंचूरकर यांच्या वाड्यात बसवला असला तरी त्यापूर्वीच पुण्यात नानासाहेब खाजगीवाले, गणपतराव घोटवडेकर आणि भाऊ रंगारी यांनी १८९३ साली गणपती बसवला होता, याचे संदर्भ पूर्वी सांगितले आहेत. गणपतीच्या मिरवणुकीला आलेले वेगळेपण खुद्द लोकमान्य टिळक मान्य करतात, तर मग आम्ही तरी त्यावर वाद कशाला घालावा? टिळकांनी त्यावर लेखनही केले आहे, त्यामुळे टिळकांच्याही पूर्वी पुण्यात सार्वजनिक गणपती बसवला जाऊ लागला होता हे मान्य करायलाच हवे. टिळकांच्या पूर्वी पुण्यात सार्वजनिकरित्या गणपती बसवला जात असे हे मान्य केले तरी, त्याचे स्वरूप नेमके कसे होते? पुढे स्वातंत्र्य चळवळीला चालना देण्यासाठी टिळकांनी या उत्सवाचा जसा साधन म्हणून वापर करून घेतला तसा काही हेतू या उत्सवकर्त्यांचा होता का, या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे.पुरातन उत्सव असल्याने आपल्याला हवे तसे स्वरूप त्यास देणे अवघड आहे, असे टिळक म्हणतात. याचे कारण टिळकांना गणेशोत्सवाला पुरातन रूपापुरते मर्यादित ठेवायचे नव्हते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. टिळकांना वेगवेगळ्या मार्गाने या उत्सवाचा उपयोग करून घ्यायचा होता. सुरुवातीची वर्षं यासाठी त्यांना महत्त्वाची वाटत होती. अगदी आरंभीच्या एक-दोन वर्षात उत्सव पार पडल्यानंतर टिळक स्वतः ‘केसरी’त अग्रलेख लिहून मिरवणुकीत गैरप्रकार होऊ न दिल्याबद्दल आणि शांतता व सुव्यवस्था राखल्याबद्दल सर्व पोलिसांचे आभार मानत असत. देखावे, मेळे यांचे ‘केसरी’तून जाहीर कौतुकही करत. प्रसंगी काही चुकीचे घडताना दिसले तर त्यावर बोट ठेवून ते सुधारण्याचा मार्गही टिळक सांगत.
टिळकांच्या सर्वस्पर्शी नेतृत्वाची ही पावती म्हणावी लागेल. तुम्ही म्हणाल, या सगळ्यात भाऊसाहेब किंवा त्यांचे सहकारी कुठेच दिसत नाहीत. सार्वजनिक उत्सवाच्या आरंभाचे श्रेय त्यांना दिले तरी लोकजागरणाचे आणि पुढच्या नेतृत्वाचे काय? सुरू केलेल्या कार्याला नेतृत्व नसेल तर ते कार्य पुढे कसे चालणार? केवळ उत्सव सुरू करून फायदा, काही साधले जात नसते तर हाती घेतलेले कार्य पुढेही तसेच सुरू राहावे यासाठी लढावे लागते, खरी कसोटी तेव्हा लागते. भाऊसाहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी हा उत्सव सुरू केला खरा पण त्याचे नियोजन, आयोजन आणि सर्वसमावेशक नेतृत्व करायला टिळक पुढे झाले नसते तर.....?
महाराष्ट्रातिल प्रसिद्घ गणेशोत्सव
लालबागचा राजा =दक्षिण मुंबईमध्ये स्थित जगात लोकप्रिय सार्वजनिक गणेश मंडळ आहे .लालबागचा राजा या गणेश मंडळाची स्थापना इ.स. 1934 मध्ये झाली. हे मंडळ सार्वजनिक गणेश मंडळा आहे. मुंबई लालबागचा राजा हे मंडळ परळी मध्ये स्थित आहे.
पुण्यात पाच मानाचे गणपती=पुण्यात पाच मानाचे गणपती आहेत. कसबा पेठ, तांबडी, जोगेश्वरी ,गुरुजी तालीम, तुळशीबाग, केसरीवाडा या व्यतिरिक्त दगडूशेठ ,हलवाई मंडई, बाबू गेनू, व जिलब्या मारुती ही काही मोठी मंडळी आहेत. पुण्यातील हिराबाग मंडळ हे भव्य देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे.
. लोकमान्य टिळक यांनी 1894 सालि सार्वजनिक गणेश मंडळ उत्सवाची सुरुवात केली. गणेश उत्सवा निमित्ताने सर्व जाती-धर्माचे लोकांना एकत्र येता यावे. या उद्देशाने लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. ज्या उद्देशाने टिळक गणेशोत्सव चालू केला तो आजतागायत चालूच आहे गणेशोत्सवाच्या दरम्यान अनेक धार्मिक सार्वजनिक सामाजिक कार्य केले जाते या उत्सवाला सार्वजनिक सर्वजण एकत्र येतात.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा