अखंड हरिनाम सप्ताह
अखंड हरिनाम सप्ताह
हरिनाम सप्ताह हा वारकरी सांप्रदायिक ,धार्मिक, सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे.
लेने को हरिनाम।
देणे को अन्नदान।।
वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाला मोठे महत्त्व आहे.महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सावता माळी, संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंगातून, निरुपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याच काम केलं.
इतिहास अखंड हरिनाम सप्ताह
संत बहिणाबाई आपल्या या अभंगात वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ कशा पद्धतीने रोवली गेली याची माहिती देतात. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी या भूमीत वारकरी संप्रदायाचा पाया रचला. आणि तुकोबारायांनी त्यावर कळस चढवायच काम केलं.
सगळ्यात पहिले किर्तन संत नामदेवांनी केले. किर्तनाची परंपरेला संत नामदेव यांनी केली. संत नामदेव महाराज पहिले किर्तन कार म्हणून ओळखले जातात. जेव्हा संतनामदेव महाराज कीर्तन करायचे , तेव्हा ज्ञानोबाराय टाळकरी म्हणून तर गोरोबा काका पखवाद वाजवून त्यांना साथ द्यायचे. चंद्रभागेच्या तिरी हे किर्तन रंगाचे पार पाडायचे . इथूनच खर्या अर्थाने वारकरी कीर्तन परंपरेला सुरुवात झाली. व ती आजतागायत चालू आहे.याच वेळी संत ज्ञानेश्वरांनी वाङमय लिहायला सुरुवात केली.तेव्हा ज्ञानेश्वरी गाथा चे पारायण करू लागले. पहिले व्यक्तिगत पारायण म्हणून करायचे. काही ठिकाणी व्यक्तिगत तर काही ठिकाणी सार्वजनिक पारायण होऊ लागली. सार्वजनिक पारायण सात दिवसाची करण्यात विष्णुबुवा जोग महाराज ,मामासाहेब दांडेकर यांनी सार्वजनिक स्वरूप या सात दिवसाच्या पारायणाला दिले.यातूनच अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला. सप्ताह म्हणजे वारकरी संप्रदायाची उपासना. सात दिवसात संतांचे अखंड नामचिंतन सतत चालु असते.
स्वरुप
पारायणाचा दिनक्रम
पहाटे काकडा आरती. त्यानंतर ज्ञानेश्वरी किंवा गाथ्याचे सामुदायिक पारायण. दुपारी प्रवचन होते. संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री हरिजागरण म्हणजेच कीर्तन केले जाते. असा साधारण हरिनाम सप्ताहाचा दिनक्रम असतो.
महाराष्ट्रात शेकडो वर्षांची परंपरा असलेले अखंड हरिनाम सप्ताह आजतागायत चालू आहेत. उदाहरण द्यायचे झालेच तर वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील संत शंकरस्वामी संस्थान फडाचा 277 वर्षांचा सप्ताह, सद्गुरु गंगागिरी महाराजांचा 175 वा सप्ताह याचसोबत देहूकरांचा फड, वासकर फड, देगलूरकर फड यांसारख्या फडांच्या देखील पिढ्यांपिढ्यांच्या परंपरा हा सप्ताह साजरा करत आहेत. सप्ताह करतांना असा आघात आहे की, पहिल्या दिवसाचे कीर्तन हे नामपर म्हणजे नाम महात्म्य सांगून देवाच्या स्वरुपाच वर्णन करणार असावं. दुसर्या आणि तिसर्या दिवसाचे संत महात्म्य म्हणजेच संतांच चरित्र सांगितलं पाहिजे. चौथ्या आणि पाचव्या दिवशी भक्तीपर. सहाव्या दिवशी वेदांताचे अभंग यावर तर सातव्या दिवसाचे मागणीपर आणि आठव्या म्हणजेच शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन केले जाते.
महाराष्ट्राच्या सगळ्यात गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह पार पडतो.यावेळी गावातील संस्था, टाळकरी ,गायनकार, गावांचे मुख्य व्यक्ती मिळून हे सप्ताहाचे आयोजन करतात.जेव्हा एखाद्या गावात सप्ताह होतो.तेगाव आजूबाजूच्या गावांना निमंत्रण देतात. व सर्वजण मिळून सप्ताहाचा आनंद घेतात.
जसे लग्न समारंभात पिढीने पिढी बदल होत आहे.तसेच सप्ताहही दरवर्षी नवनवीन कार्यक्रम डेकोरेशन करून मोठ्या थाटात पार पाडले जातात . पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी सप्ताह चे स्वरूप बदललेले आता दिसते.आधुनिक सप्ताह आता झाला असे. सर्व टाळकरी , माळकरी, विणेकरी गायनकार,पखवादे मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.सप्ताहाला सर्वोत्तम डेकोरेशन, मोठमोठी व्यासपीठ,मंडप ,साऊंड सिस्टिम ,सोशल मीडिया, बॅनर ,कार्यक्रम पत्रिका ,टीव्हीवर थेट प्रक्षेपण अशी सर्वोत्तम साधन सप्ताहाला आयोजक आयोजन करून देतात ,असे आधुनिक स्वरूपात आता सात दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताह पार पडतो.
कार्यक्रम पत्रिका
अखंड हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम पत्रिका खूप वैशिष्ट्यपूर्ण असते.पत्रिकेची सुरुवात भजनांच्या ओळीने करतात.त्यानंतर सप्ताहला लाभलेले आशीर्वाद ,मार्गदर्शनकार ,आयोजक यांचे फोटो लावले जाते,नंतर तारीख वेळ नमूद करतात .खाली सात दिवस सप्ताहला लाभलेले कीर्तनकार यांची यादी असते .ज्याच्याकडून भोजन व्यवस्था आहे त्यांची नावे ही असतात.नंतर गायक ,भजनी, भजनी मंडळ यांच्या गावांची नावे नमूद केलेली असतात . नंतर साऊंड सिस्टिम ,कार्यक्रम पत्रिका, बॅनर, शूटिंग यांची जबाबदारी घेणाऱ्ची नावे व शेवटी गावातील सर्व संस्था ,भजनी मंडळ, आयोजक, संयोजक यांची नावे असतात .
पोशाख
टाळकरी, माळकरी, वादक ,विणेकरी ,पेटी वाजक, कीर्तनकार, सर्वजण पांढरेशुभ्र कपड्यावर हजर राहतात. डोक्यावर पांढरीशुभ्र (गांधी) टोपी, खांद्यावर उपरणे, गळ्यात टाळ, कपाळावर बुक्का, असा एकंदरीत पेहराव सर्वांचा सात दिवस नित्यनेमाने दिसतो. कीर्तनकार पण पांढराशुभ्र फेटा बांधून कीर्तनाच्या वेळी साधारणतः नऊ ते अकरा हजर राहतात .सोबत चोपदार राहतो .कीर्तनकार कीर्तन करायला आले की विणेकरी त्यांना विणा देतात . व एकमेकांचे पाया पडतात. लगेच ऐकू येते.
राम कृष्ण हरी
म्हणजे कीर्तनाची सुरुवात झाली.
रुप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥
बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवरू ॥
अशा पद्धतीने सात दिवसाच्या सप्ताहात विविध महाराजांची कीर्तन होतात. सप्ताहाचा शेवट काल्याच्या कीर्तनाने होतो. श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगांची माहिती यावेळी सांगितली जाते. साधारण शेवटच्याच दिवसाचे कीर्तनकार मुक्कामी थांबून दुसर्या दिवशी सकाळी काल्याचे कीर्तन करतात. हे कीर्तन सकाळी साधारण दहाला सुरू होते. या कीर्तनात कृष्णाच्या विविध लीला सांगणार्या गौळणी म्हटल्या जातात. शेवटी दह्याच्या प्रसादाचं मडकं फोडून काला साजरा केला जातो. दुपारी सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसाद दिला जातो. यावेळी सप्ताहासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं अशा मंडळींचे आयोजकांच्या वतीने आभार मानून सप्ताहाची सांगता होते.
जय जय राम कृष्ण हरी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा