गणेश चतुर्थी

  गणेश चतुर्थी

श्री गणेश चतुर्थी हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे. गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते.गणेश चतुर्थी या दिवसाला महासिद्धीविनायकी चतुथी किंवा "शिवा" असेही म्हटले जाते. या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आणि स्थान आहे.
हिंदू धर्मात गणपतीला (गणेश) फार महत्त्वाचे स्थान आहे. सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिव-पार्वतीचा पूत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते.
मराठीगणपति
वाहनउंदीर
शस्रपांश , अंकुश , परशु
वडीलशंकर
आईपार्वती
बायकोरिद्धि, सिद्धि
अन्य नाव/ उपनाव ब्राह्मणस्पति, मयूरेश्वर, लम्बोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पाकर्ण

गणपति के बारह नाम 1. वक्रतुंड 2. एक दांत 3. कृष्णपिंगक्ष 4. गजवक्त्र 5. लम्बोदर 6. विकट 7. विघ्नराजेंद्र 8. धूम्रवर्ण 9. भालचंद 10. विनायक 11. गणपति 12. गजानन

मंत्रOm गण गणपतिये नमः
तीर्थ क्षेत्रअष्टविनायक

ज्या दिवशी शंकराने गणपतीला हत्तीचे तोंड लावून त्याला जिवंत केले त्या दिवशी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या दिवसाला गणेश चतुर्थी म्हटले जाते. त्यानंतर 11 दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्थीला गणपतीच्या विसर्जनानंतर संपतो.

महाराष्ट्र, गुजरात आंध्रप्रदेशात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी (साधारणत ऑगस्ट, सप्टेंबर या काळात ) गणेश चतुर्थी येते. घराघरात गणपतीची लहान मूर्ती आणली जाते व 11 दिवस मोठ्या भक्तीभावाने तिची पूजा केली जाते.

चतुर्थी
हिंदू पंचांगानुसार चौथ्या तिथीला चतुर्थी म्हणतात.
ही महिन्यातून दोनदा येते.एक अमावस्येनंतर व दुसरी पौर्णिमेनंतर.पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला कृष्णपक्ष म्हणतात. आणि अमावस्या नंतर येणाऱ्या चतुर्थीला शुक्लपक्ष असे म्हणतात.

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी हा एक धार्मिक व्रत आहे.हा धार्मिक व्रत हिंदू लोक  सणा प्रमाने साजरा करतात.असं भारतातील विविध भागात साजरा केला जातो. मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात सगळ्यात  जास्त हा सण धार्मिक व्रत  म्हणून साजरा करतात. ग्रंथ पुराणानुसार या दिवशीच गणपती बाप्पाचा जन्म झालेला आहे .हिंदू धर्मात या दिवशी गणपतीची पूजा करतात.काही गणेश प्रेमी गाजत बाप्पाची मूर्ती आणून घरात, सार्वजनिक ठिकाणी स्थापित करतात. मोठ्या श्रद्धेने ,आनंदाने ,भक्तिभावाने वाजत गाजत गणपती बाप्पा घरी मिरवणूक करून आणले जातात ,व भक्तिभावाने त्या मूर्तीला स्थापित करतात.
वाजत गाजत आणलेल्या गणपती बाप्पाला भक्तिभावाने सिंहासनावर विराजमान करतात. छान अशी सजावट करतात .मोठ्या थाटाने बाप्पाचे स्वागत गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व भक्तगण मिळून करतात.बाप्पाचे 9दिवस लाड पुरवतात. सगळे भक्तजन बाप्पाचे दर्शन घेतात.बाप्पाचे सुंदर रूप पाहण्यासाठी बाप्पा प्रेमी नऊ दिवस बाप्पा जवळ गर्दी करत अस  तात.

कथा

  शिव पुराणानुसार एकदा माता पार्वती स्नानासाठी जाण्याअगोदर त्यांनी आपल्या अंगावरच्या मळापासून एक मुलगा तयार केला. तो दिसण्यास छान गोजिरा होता ,त्या मुलाला आपल्या द्वार पाल बनवले. व आदेश दिला  आत कोणालाही येऊ देऊ नको.तसेच बालक करत होता.दरवाजातून कोणालाही आत जाऊ देत नव्हता ,व द्वारपाला सारखी दरवाज्याचे सर्व रक्षण करत होता.
     तेव्हा तेथे महादेव आले त्यांनी देवी पार्वतीचा भेटायचे आहे ,असे सांगितले .पण त्या मुलाला पार्वती मातेचा आदेश होता की ,कोणालाही आत येऊ देऊ नये .त्याप्रमाणे तो मुलगा  महादेवांना आत जाऊ देत नव्हता.महादेवांनी आत जाण्याचा प्रयत्न केला.पण त्या मुलाने त्यांना अडवले त्यांना आत जाण्यास मनाई केली असताना महादेवांचे  सैनिक त्या बालकाशी युद्ध करू लागले. महादेवांच्या सैनिक आणि बालकात खूप मोठे महायुद्ध झाले. मोठे मोठे  महारथि  त्या बालकाचे काहीही वाईट करू शकले नाही ,तरी सुद्धा कोणालाही बालक आत जाऊन देत देत नव्हता. महान  महान योद्धे बालका समोर फिके पडले व कोणीही आत जाऊ शकले नाही. या संसारात बालकाला हरवु शकणारा एकही सैनिक महायोद्धा तिथे उपस्थित नव्हता,व तेथे असलेले हे सैनिक एकही त्या बालकास हरवू शकले नाही.व त्यांना ओलांडून आत जाऊ शकले नाही.तेव्हा महादेव खूपच चिडले खूप रागावले व संतापून त्यांनी  बालकावर त्रिशुळ चालवले.तेव्हा बालकाचे डोके कापले गेले. बालकाचे धड एका बाजूला व डोके दुसऱ्या बाजूला जाऊन पडले.बाहेर येताच  हे सगळं पाहून माता पार्वती खूप चिडल्या देवी पार्वती खूप चिडल्या व त्यांनी एक रागाचा भूकंप आल्यागत वातावरण माता  तेथे तयार झाले.  पार्वती  बाहेर येताच ग्रुप रूप त्यांचे धारण झाले. पार्वती चिडलेले रूप पाहून देव सगळे घाबरले. कोणालाच काहीच सुचेना की देवी पार्वती का एवढ्या चिडल्या.व त्यांचा राग एवढा का वाढला बाहेर येताच . पार्वतीचे हे रूप पाहून सगळेच घाबरले आता काय करावे? असे कोणालाच काहीच सुचेना. तेव्हा देवार्शी ऋषि यांनी जगदंबा मातेची स्तुती करत पार्वती यांना शांत केले. 
     महादेवांच्या आज्ञेनुसार नंतर पार्वती शांत झाल्या महादेवांच्या आज्ञेनुसार भगवंता विष्णू उत्तर दिशेच्या  जीवित हत्तीचे डोके कापून घेऊन आले. रुद्राने ते डोकं बालकाच्या शरीरावर ठेवलं. बालकाला पुनर्जन्म दिला. देवी पार्वती खूप आनंदी झाल्या, आनंदाने देवी पार्वतीने बालकाला कवटाळले.आपल्या हृदयाशी लावले. त्याच्यावर प्रेम लुटू लागल्या.पार्वतीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.तेव्हा त्या बालकाला  सगळ्या देवतानी अग्रगण्य असा मान दिला.ब्रह्मा, विष्णू ,महेश यांनी बालकाला सर्वाध्यक्ष म्हणून घोषित केले.भगवंत महादेवांनी म्हटले  गिरीनंदना तु संकट विघ्न संपवणारा देव म्हणून तुझे नाव प्रथम असेल .तू सगळ्यांचा प्रिय बनवून माझ्या सैनिकांचा अध्यक्ष होऊन जा.हे गणेश्वरा तु भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला  चंद्र उगवल्यावर उत्पन्न झाला आहे.या तिथीला उपवास करणाऱ्या सर्व भक्तांचे तु संकटातून मुक्तता करशील. त्यांचे दुःख हरण होईल. त्यांची संकट संपेल आणि उपवास करणाऱ्यांचे मनातील इच्छा पूर्ण होतील .पूर्णत्वास जातील .कृष्ण पक्षाच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणेशा तुझी पूजा केल्यावर ब्राह्मणांना मिठाई द्यावी त्यानंतर गोड भोजन करून स्वतःच्या उपवास सोडेल तो संकटापासून दूर राहील त्याची मनोकामना पूर्ण होईल .पूर्ण वर्ष बाप्पाचा उपवास व्रत केल्याने मनोकामना अवश्य पूर्णत्वास जाईल.
इतिहास
1892 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरवात केली.

पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी हा हेतु त्यामागे होता. सरदार खाजगीवाले यांनी सर्वात प्रथम गणेशोत्सव ग्वाल्हेरला साजरा केला. गणपत घोवडेकर, भाऊ वैद्य, भाऊ रंगारी यांनी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठपना करुन हा उत्सव साजरा केला.

हे पाहून टिळक यांनी पुण्यात केसरीवाड्‌यात सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर काही लोक दीड दिवसांनी, काही पाच, सात किंवा अकराव्या दिवशी गणपतीचे विसर्जन करतात.

गणपती बसल्यनंतर पाच दिवसांनी गौरींचे आगमन होते. त्या दोन दिवस राहतात. सातव्या दिवशी त्यांचेही विसर्जन केले जाते. सार्वजनिक मंडळे या काळात आकर्षक देखावे उभारतात.

यात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक देखावे असतात. अनंत चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढून गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर

औंढा नागनाथ

जगातील एकमेव मंदिर महाराष्ट्रात जिथे महादेवा समोर नंदी नाही...