संत तुकोबारायांच्या पादुकांचा निरास्नान सोहळा

संत तुकोबारायांच्या पादुकांचा निरास्नान सोहळा

राम कृष्ण हरी माऊली
 आजच्या लेखात आपण संत तुकोबारायांच्या पादुकांचा निरास्नान सोहळा कसा पार पडला हे पाहणार आहोत.
लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना आज निरा नदीत स्नान घालण्यात येते. मान्सून उशिरा दाखल झाल्याने आणि रखडलेल्या  निरा नदीपात्र कोरड पडलेलं होतं; त्यामुळे वारकऱ्यांच्या निरास्नानाच्या आनंदावर यंदा विजन पडलं. मात्र वारकऱ्यांनी पाऊस येऊ दे अशी विठुरायाकडे साकडे घातला आहे. सराटी गावाजवळ तुकोबांच्या पादुकांना निरास्नान घातले जातो. यंदा तुकोबांच्या पादुकांना टँकरने स्नान घालण्याची वेळ आली. निरास्नान झाल्यानंतर आता पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. सदाशिवनगर येथे आश्वांची गोल रिंगण आज पार पडणार आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने इंदापूर शहरातील मुक्काम आटोपून सराटी गावाकडे शुक्रवारी प्रस्थान ठेवले. तालुक्यातील शेवटचा मुक्काम असलेल्या सराटी गावात पालखीने सायंकाळी सात वाजता प्रवेश केला होता या ठिकाणी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आज पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे.

सोलापूर येथील अकलुज माने विद्यालयाच्या प्रांगणात गोल रिंगण होणार आहे. पालखीत एकूण तीन फेरीचे रिंगण होतात आणि शेवटच्या फेरीचे रिंगण घोडेस्वार यांनी पूर्ण केले जाणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर