संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण इंदापूर मध्ये पार पडले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण इंदापूर मध्ये पार पडले.
राम कृष्ण हरी माऊली प्रियंका Devotional youtube channel वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
पांडुरंगा भेटायची आस ,
आतुरले नयन, विठ्ठल वाणी विठ्ठल,
अशा जय घोष करीत वारकरी वारीची वाट चालत आहे. आषाढी एकादशी वारी निमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 338 वा पालखी सोहळा सुरू आहे. पुंडलिक वरदे , ज्ञानोबा तुकाराम ,जयघोष टाळ, मृदुंगाचा गजरात, अश्व नेत्र दीपक प्रदक्षिणा करीत रिंगण सोहळा पार पाडला. पाहूया हा रिंगण सोहळा कसा पार पडला. संत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकी मधला मुक्काम आटोपून इंदापूर शहरात दाखल झाले. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण इंदापूर मध्ये पार पडले. इंदापूरच्या रयत शिक्षण संस्थेच्या कदम विद्यालयाच्या प्रांगणावर गोल रिंगण सोहळा पार पडला, याची देही याचा डोळा असा देखावा हा रिंगण सोहळा होता. जशी का रिंगणाला सुरुवात झाली, तसा ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात सगळा आसमंत दुमदुमून गेला होता. या सगळ्यात मानाचा अश्व जसा का धावला तसा समद्यांनी ज्ञानोबा तुकोबाची एक जयघोष करायला सुरुवात केली. त्यानंतर रिंगणामध्ये डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊली रिंगणात आल्या व रिंगणाला हुरूप आलं. हा सोहळा पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी मंडळी येतात. खांद्यावर भव्य पताका ,आणि विठू नामाचा जयघोष ,सगळ्या आस म्हणतात टाळ चिपळ्यांचा सोबत ज्ञानोबा तुकारामचा गजर अखंड सुरू होता. मग आपल्या पोलीस बांधवांनी ही सुद्धा रिंगणाला फेरी मारली यानंतर विनेकारी रिंगणात धावली बघा.
.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिला गोल रंगाम बेलवर पार पडला आहे यावेळी शेकडो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी रिंगण पाहायला गर्दी केली होती तर इंदापूर येथे तुकोबांच्या पालखीचे गोल रिंगण पाहायला देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
काय आहे गोल रिंगण…
गोल रिंगणामध्ये पालखी भोवती नागरिक मानवी साखळी करून फेर धरतात. त्यानंतर दोन मानाचे घोडे गोलाकार फिरतात. मात्र यामध्ये एकच घोडेस्वार असतो. दुसऱ्या घोड्यावर संत तुकाराम स्वार असतात; असा वारकऱ्यांचा विश्वास आहे. त्यानंतर या गोलाकार यांना उचलण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी असते. त्यानंतर उभ्या रिंगणादरम्यान वारकरी सरळ रेषेत उभ्याने राहून उड्या मारतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा