अकलूज मध्ये तुकोबारायांचा तिसरा रिंगण सोहळा 2023
अकलूज मध्ये तुकोबारायांचा तिसरा रिंगण सोहळा 2023
आजच्या या व्हिडिओमध्ये अकलूज मध्ये संत तुकोबारायांचा तिसरा रिंगण सोहळा कसा पार पाडला? हे पाहणार आहोत ..चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया...
संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना निरास्नान घालण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. माने विद्यालयाच्या प्रांगणात रिंगण सोहळा पार पडला. यावेळी अखंड प्रेमभक्तीत अकलूजकरांच्या पाहुणचारात वैष्णव सुखावले. श्री तुकोबारायांच्या सोहळ्याचे व अकलूज करांची नात्याची गुंफण आहे. सोहळ्यातील स्वाराच्या अश्व हा मोहिते पाटील घराण्याचा आहे. तसेच आज त्यांच्या नगरीत सोहळा असल्याने मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत झाले. मोठ्या प्रमाणात अन्नदान व विविध उपक्रम येथे राबविले जातात.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा तिसरा रिंगण सोहळा अकलूज सदाशिव माने या विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी या सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी सुद्धा झाली आहे. डोळ्याची पान फेडणारा हा संत तुकाराम महाराजांचा पालखीचा तिसरा रिंगण सोहळा होता. या सोहळ्याला लाखोंच्या गर्दीत भाविकांनी व अकलूजकरांनी गर्दी केली होती. सगळ्यात अगोदर जेव्हा झेंडेकरी धावले तेव्हाच हेलिकॉप्टर करणे तुकाराम महाराजांच्या पादुकावर पुष्पवृष्टी केली व सोहळ्याला अजूनच रंगत आणली. त्यामुळे संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झालं. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी पूर्ण विद्यालयाचे प्रांगण भरले होते. येथे अकलूज करांना दर्शनासाठी ही पालखी ठेवली होती. या रिंगण सोहळ्या वेळी झेंडेकरी, त्यानंतर विणेकरी ,त्यानंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या माऊली धावल्या व सर्वांचे आकर्षण असणारे ही अश्व धावले. यावेळी दृश्य डोळ्यांना पारणे फेडण्यासारखं होतं. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पार पाडल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी अकलूज येथेच मुक्कामी थांबले व अकलूजकरांना दर्शनासाठी ठेवण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा