राम नवमी 2023:अयोध्येत प्रभू राम जन्मोत्सव साजरा
राम नवमी 2023:अयोध्येत प्रभू राम जन्मोत्सव साजरा
रामनवमी हा दिवस प्रभू रामाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. प्रभू रामाचा जन्म झाला आणि अयोध्या नगरी मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने जन्मोत्सव साजरी करू लागली. हिंदू पंचांगातील पहिला महिना चैत्र महिन्याचा नववा दिवस म्हणजे रामनवमी या दिवशी राम जन्मोत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की चैत्र नवरात्रीनंतर नऊ दिवसांनी ज्या दरम्यान देवी दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते .भगवान राम आणि त्यांचे तीन भाऊ लक्ष्मण ,भरत ,आणि शत्रुघ्न पृथ्वीवर अवतरले होते.
या दिवशी लोक मर्यादा "पुरुषोत्तम "म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान यांना समर्पित मंदिरांना भेट देतात .आणि त्यांना जीवनात आणि आचरणात योग्य मार्ग दाखवण्याची प्रार्थना करतात .पूजा करतात ,उपवासही करतात.रामनवमी उत्सव दरम्यान जगभरातील हिंदू देवी दुर्गा ची पूजा करतात.आणि चैत्र नवरात्र साजरा करतात .यावर्षी रामनवमी 22 मार्चपासून सुरू होत आहे .व गुरुवारपर्यंत गुरुवारी संपणार आहे .हे नऊ दिवस भगवान राम भगवान ,हनुमान आणि देवी दुर्गा यांना समर्पित आहेत. चैत्र नवरात्री दुर्गाच्या नऊ रूपामध्ये विभागलेली आहे.
अयोध्येत रामनवमीचे विशेष महत्त्व
रामनवमीचे अयोध्येत विशेष महत्त्व आहे .कारण येथे रामाचा जन्म झाला आहे. रामनवमी हा दिवस हिंदू पौरांणीक कथा मधील सर्वात पूजनीय व महत्त्वाचा दिवसांपैकी एक आहे. जे हिंदूंसाठी विशेषता भगवान राम आणि विष्णूच्या अनुयायांसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भावीक उपवास करतात. आणि विश्वास ठेवतात की भगवान रामाच्या कृपेने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. इच्छा पूर्ण होतील.रामनवमीच्या दिवशी लांबून लांबून भाविक प्रभू रामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी येतात. इथे रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हे पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. रामनवमीच्या दिवशी भाविक सरयू नदीत स्नान करतात असे म्हटले जाते की रघुनंदन भगवान रामाची पूजा करणाऱ्या कोणत्याही भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. रामनवमीच्या दिवशी कागदावर राम नाम लिहिल्यास अनेक शुभ परिणाम मिळतात व शुभ कार्य लवकर घडून येते.
अयोध्येतील रामनवमी उत्सव
अयोध्या ही प्रभू रामाची भूमी आहे. या दिवशी येथे खूप मोठ्या उत्साहाने रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी आयोध्यातील रस्ते आणि घरे सजवून टाकली जातात. धार्मिक केंद्र रंगीबेरंगी फुलांनी सजवली जातात आणि देवतांच्या मूर्तींना कपडे घातले जातात. स्नान केले जाते आणि सजवले जाते. आयुर्वेदिक मंदिरी या दिवशी पाहण्या जोगे असते. खूप सारे सजावट या दिवशी मंदिरांना केली जाते. आयोधीतील रस्ते आणि घरी सुशोभित आणि उजळून निघालेली असते.
रामनवमी पूजा 2023 शुभ मुहूर्त
चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नव्या दिवशी रात्री नऊ वाजून सात मिनिटांनी 29 मार्च 2023 प्रारंभ होत आहे.चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नव्या दिवशी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी 30 मार्च 2023 समाप्त होणार आहे. रामनवमी 30 मार्च 2023 रोजी साजरी होणार आहे.
आयोध्यातील रामनवमी यांचा विशेष मंत्राचा जप
अयोध्या ज्यांचे धाम आहे,
एक वचनी, एक वाणी,
मर्यादा पुरूषोत्तम,
अशा रघुनंदनाला आमचा प्रणाम आहे…
श्रीरामनवमी निमित्त आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा..!🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा