महाराष्ट्रातील मुख्य 10 पर्यटन स्थळे(Top 10 Beutiful places in Maharashtra)
महाराष्ट्रातील मुख्य 10 पर्यटन स्थळे(Top 10 Beutiful places in Maharashtra)
10.अलिबाग
अलिबाग
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक पर्यटन स्थळ. या ठिकाणी असणारे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारी येथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालतात. येथील स्वच्छ सुंदर नयनरम्य समुद्रकिनारी पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाहीतर देश-विदेशातून पर्यटक येथे भेट देण्यासाठी येत असतात. अलिबाग हे नाव एका अलि या व्यक्तीचे नावावरून पडले आहे. अली या व्यक्तीकडे खूप साऱ्या बागा होत्या. त्यामुळे या शहराला अलिबाग असे नाव पडले. या ठिकाणी असणारे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा आणि नवीन समुद्र म्हणून या शहराचे नाव अलिबाग असे ठेवण्यात आले. याव्यतिरिक्त ही अलिबाग मध्ये मुरुड बीच, वर्सोली बीच, मुरुड जंजिरा किल्ला अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल.अलिबाग हे पर्यटन स्थळ पुणे शहरापासून 145 km तर मुंबईपासून 95 km एवढे अंतरावर आहेत.
9.माथेरान
माथेरान माथेरान हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरान हे एक हिल स्टेशन असून 2600 ft इतक्या उंचीच्या पठारावर वसलेले आहे. हे पर्यटन स्थळ संपूर्ण लाल पायवाटांनी भरलेले आहे. माथेरान या ठिकाणी आपल्याला एक नव्हे तर तब्बल 38 स्थळ पाहायला मिळतील. या ठिकाणी पॅनोरमा पॉईंट ,लुईसा पॉईंट, सनसेट पॉईंट अशा अनेक ठिकाणांना पाहता येईल. पुणे आणि मुंबईतील पर्यटकांना सहलीसाठी निसर्ग सौंदर्याने घडलेली ही एक उत्तम जागा आहे.
8.कास पठार
कास पठार कास पठार हे सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा शहरापासून हे ठिकाण जवळपास 22 किलोमीटर एवढे अंतरावर आहे. मित्रांनो जर तुम्हाला निसर्गाने भरलेल्या वेगवेगळ्या फुल पाहिजे असेल तर कास पठारावर वेगवेगळ्या प्रकारची दुर्मिळ फुले पाहायला मिळतात.
जवळपास 22 किलोमीटर अनेक ठिकाणांना पाहता येईल. पुणे आणि मुंबईतील पर्यटकांना सहलीसाठी निसर्ग कास पठार कास पठार हे सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ जवळपास 22 km एवढ्या अंतरावर आहे. कसा तिरडा, सोनकी चवर अशी अनेक वेगवेगळ्या प्रकारची फुले पाहता येतात.
7.तारकर्ली बीच
तारकर्ली बीच हा महाराष्ट्रातील प्रमुख आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. तारकर्ली हे कोकणातील एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे. तारकर्ली बीचला जगातील सर्वात स्वच्छ व सुंदर बीच म्हणून ही मान्यता मिळालेली आहे. हा सुंदर बीच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यामध्ये आहे. असे म्हटले जाते की निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या तारसोली बीचला आयुष्यात एक वेळेस तरी नक्की भेट द्यायला पाहिजे. मालवण पासून तारकर्ली हे गाव सात किलोमीटर एवढे अंतरावर आहे. तारकर्ली बीचवर असणारी बांबू आणि सुपारींच्या झाडाची हिरवळ पाहून मन अगदी थक्क होऊन जाईल. हा बीच आरामदायिक वेळ घालवण्यासाठी नक्कीच योग्य पर्यटन स्थळ आहे.
महाबळेश्वर
महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे .सह्याद्री पर्वतरांगांच्या माथ्यावर वसलेले महाबळेश्वर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 1372 इतक्या उंचीवर असलेले आहे. महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ सुंदर निसर्गासाठी आणि स्पेशल पॉईंट साठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असणाऱ्या पॉइंट्स वरून पर्यटक निसर्गाचा मनमोराच आनंद घेत असतात. महाबळेश्वर मध्ये एलफिस्टंट पॉईंट हा सर्वात मोठा पॉईंट आहे. या व्यतिरिक्त या ठिकाणी बरेच पॉईंट पाहायला मिळतील .महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी ऑल टाइम फेवरेट जागा आहे.
गणपतीपुळे
गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे .हे ठिकाण महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. गणपतीपुळे या समुद्रकिनारावर असलेले गणपतीचे मंदिर हे या ठिकाणचे प्रमुख आकर्षण आहे. हे गणपती मंदिर जवळपास 500 वर्ष जुने आहे. गणपतीपुळे हे मंदिर समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने पावसाळ्यात समुद्राच्या लाटा या मंदिरापर्यंत येतात. या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर या मंदिराचे दर्शन घेऊन बरेच लोकप्रिय समुद्रकिनारा पाहण्याचा आनंद घेत असतात. गणपती पुळे समुद्रकिनारा शेंडीकरांचा मठ ,भिडे समाधी चंडिका मंदिर अशा अनेक ठिकाणांना भेट देऊ शकतो.
4. लोणार सरोवर
लोणार सरोवर
लोणार सरोवर हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. लोणार सरोवराची निर्मिती नैसर्गिक घटनेमुळे म्हणजेच उलकापातामुळे झालेली आहे. लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून प्रसिद्ध आहे. या लोणार सरोवराला संपूर्ण जगभरात ओळखतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेसाल्ट खडक आढळतो. लोणार सरोवराच्या संवर्धन करण्यासाठी लोणार या सरोवराला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या सात आश्चर्यांपैकी लोणार सरोवर हे एक आहे.लोणार सरोवर हे एक निसर्ग निर्मित पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी निसर्गप्रेमी आणि देश विदेशातील अनेक पर्यटक आवर्जून येत असतात.
3. अजिंठा लेणी
अजिंठा लेणी हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी येत आहे. अजिंठा लेणी ही महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे .या लेण्यांना भेट देण्यासाठी देश विदेशातून बरेच पर्यटक येत असतात. जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित अजिंठा लेणी या ठिकाणी 29 बौद्ध लेण्या पाहायला मिळतात. या लेण्यांमध्ये गौतम बुद्ध यांची भाव मुद्रा व सुंदर चित्र रंगवलेले आहे. अजिंठा लेणी पाहण्यासाठी वर्षभर खुले असतात. दर रोज सकाळी या लेण्या पाहण्यासाठी प्रवेश केला जातो. औरंगाबाद शहरापासून या लेण्या जवळपास 30km एवढ्या अंतरावर आहेत.
2.लोणावळा
लोणावळा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन पैकी एक आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांच्या मधोमध आहे. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वत रांगेत हे पर्यटन स्थळ वसलेले आहे. या ठिकाणी असणारे निसर्गरम्य वातावरण आणि डोंगरदऱ्या हे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात. लोणावळा या ठिकाणी वाळवंट डॅम ,कारला भाजी लेणी अशा अनेक सुंदर सुंदर ठिकाणांना भेट देता येते. लोणावळा हे पर्यटन स्थळ पुण्यापासून 63 किलोमीटर तर मुंबईपासून 96 km एवढे अंतर आहे.
1. मुंबई
मुंबई हे शहर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थान पैकी एक आहे .मित्रांनो मुंबई हे महाराष्ट्राचे राजधानी असून महाराष्ट्राचा सर्व राजकीय कारभार हा मुंबईतूनच पाहायला जातो. मोठे मोठे उद्योग स्थित आहेत. मायानगरी या नावाने ओळखले जाणारे मुंबई हे शहर हे इंडस्ट्री साठी देखील प्रसिद्ध आहे. व राजकीय परीवर्तन प्रसिद्ध आहे. महालक्ष्मी मंदिर, हाजी अली, अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल. तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर दहा पर्यटन स्थान बद्दल जाणून घेतलेली आहे. ज्याचा उल्लेख आपण या लेखात केलेला नाही तुम्ही महाराष्ट्रातील कोणकोणत्या पर्यटन स्थळ भेट दिली आहे? ते comment करून सांगा.
🙏 धन्यवाद🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा