तुळजाभवानी बिलोनी🚩

तुळजाभवानी बिलोनी 🚩

तुळजाभवानी माता मंदिर हे एक हिंदू मंदिर आहे.औरंगाबाद तालुक्यातील वैजापूर येथील बिलोली गावची आई जगदंबा ही नवसाला पावणारी , म्हणजे जागृत देवस्थान आहे.हे वैजापूर तालुक्याच्या बिलोनी या गावी बसलेले आहे.जागृत देवस्थान आहे. उंच टेकडीवर असलेलं मंदिर आजूबाजूला हिरवीगार झाडी एका बाजूला धरण हे सारं दृश्य डोळ्याच पारन फेडणार आहे. मंदिरासमोराच एक दीपमाळ आहे. त्या दीपमाळी वर एक शिलालेख लिहिला आहे. दीप माळेवर जाण्यासाठी आकर्षक पायऱ्या आहे.

औरंगाबाद तालुक्यातील वैजापूर येथील बिलोली गावची आई जगदंबा ही नवसाला पावणारी , म्हणजे जागृत देवस्थान आहे. उंच टेकडीवर असलेलं हे मंदीर,  आजूबाजूला हिरवी झाडी जवळच धरण हे सर्व दृश्य डोळ्याला पारन फेडणार आहे.तुळजाभवानीचा प्राचीन मंदिर येथे आहे.साडेतीन शक्तीपीठांमधील एक जागरूक देवस्थान , तुळजापूरचे तुळजाभवानी या देवीचे उपतुळजापूरचे तुळजाभवानी या देवीचे उपपीठ म्हणून या देवस्थानाला मानले जाते.त्यामुळे अनेक भावी तुळजापूर ऐवजी बिलोनी येथे  तुळजा देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.मंदिरासमोरच भव्य दिव्य अशी दीपमाळ असून, या दीप माळीवर एक शिलालेखख लिहिलेला आहे.
दीपमाळ्यावर जाण्यासाठी आकर्षक पायरी असून दीपमाळीवरती गेल्यावर आकर्षक निसर्ग सौंदर्य न्यायाळयास मिळते.प्रभू रामचंद्र वणवासाला गेले असताना, तुळजाभवानी मातेने त्यांना स्वतः येथे दर्शन  दिल्याचे पुरावे येथील जानकार सांगतात व देतात.नवरात्र मध्ये येथे उत्सव असतो. व संपूर्ण महाराष्ट्रातील भक्त जन दर्शन घेण्यासाठी गर्दीकरत असतात.तुळजाभवानी हे जागरुक देवस्थान असल्यामुळे काही भाविक नवस बोलण्यासाठी येतात. तर काही भाविक नवस पूर्ण करण्यासाठी येथे गर्दी करत असतात.नवरात्रीत नऊ दिवस येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन येथेे केले जाते. बिलोनीच्या ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षी या मंदिराचे काम करत असतात.नवरात्रीच्या वेळी व हनुमान जयंतीच्या वेळी येथे मोठी यात्रा भरते.याचे सर्व आयोजन बिलोनी ग्रामस्थ व ग्रामपंचायत करते.

बिलोनीच्या देवीचेे वैशिष्ट्य
 बिलोनीच्या देवीचे वैशिष्ट्य असे की तुळजापूरच्या तुळजाई देवीचे दुसरे उपपिठ संपूर्ण महाराष्ट्रभरात कोठेही नाही. फक्त आणि फक्त बिलोनी येथेच आहे.व ते जागृत देवस्थान असल्यामुळे येथे भक्त जणांची संपूर्ण नवस पूर्ण होतात.


 सालाबाद प्रमाणे नवरात्राचा अति उत्साहित कार्यक्रम होतो. आणि या कार्यक्रमात नऊ दिवस उत्साहात कार्यक्रम होतात. फक्त पूर्वीचा काळ फार मोठा झाला. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ,प्रभू रामजी चंद्र त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. तसेच या गावचे महत्वाचे की या वर्षापासून नऊ दिवस फराळ त्यानंतर नवरात्र बसणारे सर्वांना येथेच फराळ दोन टाईम केला जातो. आणि ह्याची सेवा बिलोनी गावचे सोनवणे आचारी हे करता समस्त गावकरी मंडळी जाधव,  कदम लिंगायत हे सर्व मंडळी मदत करतात.दुसरा विषय म्हणजे लिंगायत समाजाचे गुरव देवीची पूजाविधि करतात.सालाबाद प्रमाणात हे त्यांचे वर्ष बद्दलते तसा माणूस बदलतो अशी थोडक्यातलिंगायत समाजाचे गुरव  पूजाविधी अतिशय चोख पणे करतात.सालाबाद प्रमाणात हे त्यांचे वर्ष बदलले की माणूस बदलतो. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रावण व्रत

विघ्नेश्वर

महालक्ष्मी मंदिर(अंबाबाई) कोल्हापूर