नागपंचमी
नागपंचमी
मराठी दिनदर्शिकानुसार मराठी पाचवा महिना म्हणजे श्रावण महिना.या महिन्यात चंद्र श्रवण नक्षत्रात जातो म्हणून या महिन्याला श्रावण महिना म्हणतात. सर्वात आवडता महिना माझा म्हणजे श्रावण महिना. हा महिना इंग्रजी कॅलेंडर नुसार,जुलै किंवा ऑगस्ट या महिन्यात येतो.या महिन्याला पावसाचा महिना असेही म्हणतात. कारण या महिन्यात जास्तीत जास्त पाऊस होतो. व सगळीकडे हिरवे हिरवे वातावरण होते. हिरवा शालू धरती माता परिधान करते.
महिन्यातील पाचव्या दिवसाला पंचमी म्हणतात.
श्रावण महिन्यातील पाचव्या दिवसाला नागपंचमी असते.
ज्या पंचमीला नगदेवताचि पूजा होते तिला नागपंचमी म्हणतात.श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते.हा हिंदूंचा मानलेला मोठा सण आहे.या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते.काही ठिकाणी नागदेवतेला दूध सुद्धा दिले जाते.
अनेक गावांमध्ये कबड्डी किंवा कुस्ती या खेळांचे आयोजन ही स्पर्धा या नागपंचमी दिवशी ठेवले जाते.
कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस म्हणजे श्रावण महिन्यातली शुद्ध पंचमी.नागदेवता च्या कृतज्ञतेने साठी नागपंचमी हा सण साजरा केला जातो.त्या दिवसापासून नाग पूजा व नागपंचमी प्रचलित आली असे मानले जाते.
नागपंचमीचे महत्व
नागपंचमीचे महत्व म्हणजे सक्रिय सापांना शांत म्हणजे आणि पावसाळ्यात जेव्हा लपण्याच्या ठिकाणावरून बाहेर येतात.तेव्हा पाऊस आणि पूर यामुळे त्यांना मानवांसाठी धोका होण्यापासून परावृत्त करणे.नागपंचमी सण देशभरात साजरा होत असला तरी मुख्यत्वे महाराष्ट्र राज खूप पाऊस प्रमाणात नागपंचमी सण साजरा केला जातो.मुंबई जवळील बत्तीस शिराळा गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी खूप प्रसिद्ध आहे.असे ही मानले जाते की जे लोक काल सर्प योगाने त्रस्त आहे. ते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्या नकारात्कम परिणामापासून मुक्तीता होऊ शकते.
नागपंचमी चा इतिहास
नागपंचमीचा सण सुरू झाला तेव्हा सापांचा राजा तक्षक याने राजा जनमेजयचे ची वडील परीक्षेत यांना दमारून त्यांचा वध केला.त्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी, राजा जनमेजयने संपूर्ण नागदेवतेचा नायनाट करण्यासाठी एक यज्ञ केला.ज्या दिवशी हा यज्ञ ब्राह्मण अस्तीका ऋषींच्या हस्तक्षेपामुळे बंद झाला.तो दिवस नागपंचमीचा दिवस होता तेव्हापासून नागदेवतेची पूजा केली जाते.तेव्हापासून श्रावण महिन्यातल्या पाचव्या दिवशी नागपूजेने तो दिवस साजरा केला जातो.
आणखी एक पौराणिक कथा म्हणजे या दिवशी भगवान श्री कृष्ण यांनी कालिया नागाचा वध केला होता. व सर्व गोकूळ वासियांना कालिया नागापासून वाचवले होते. तेव्हापासून दरवर्षी नागपंचमी हा सण साजरा केला जातो.
नागपंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा करताना म्हटला जाणारा मंत्र:
'' नाग प्रीता भवंति शांतीमाप्नोति
बिया विबोह
सशांती लोक मा साध्या
मोडते शष्ठित सम:"
नागपंचमी साजरी करण्या मागील वैज्ञानिक दुष्टिकोन
सापाच्या अंगावर काळे केस असतात, सापाच्या डोक्योवर नागमणी असतात, तसेच साप पुंगीच्या व बासरीच्या तालावर नाचतात, साप दूध व लाह्या खातात, सापाच्या शरीरात हाडे नसतात, रात्री शिळ घातल्यावर साप घरात येतो, सापाला रातराणीचा वास आवडतो, सर्पदंश झालेल्या व्यक्तिला कडूनिंबाचा पाला खायला दिल्यास गोड लागतो, मांडूळसापावर मंत्रविधी केल्याने पैशांचा पाऊस पडतो,धामणीच्या शेपटीत काटा असतो. ती गायी-म्हशीच्या नाकात शेपटी घालून त्यांना मारते. धामण गायी-म्हशीच्या पायाला विळखा घालून दूध पिते,सर्पविष मंत्रोपचाराने उतरवता येते,साप धनसंपत्तीचे रक्षण करतो,गरोदर स्त्री आणि साप यांची नजरानजर झाल्यास सापाचे डोळे जातात,सापांच्या जुळ्यामधला एखादा मारला तर दुसरा साप बदला घेतो अशा अनेक अंधश्रध्दा आपल्याकडे आहेत. या सर्व अंधश्रद्धाना कोणताही शास्त्रीय आधार नाही हे अभ्यासांती सिद्ध झाले आहे. सापास कान नसतात. त्यामुळे त्यास ऐकू येत
नाही. साप मांस भक्षक असल्याने उंदीर, पाली, बेडूक हेच प्राणी खातात. सापाचा मेंदू हा मानवाप्रमाणे विकसीत नसल्याने साप कोणावर डुख धरत नाहीत. हिंदी चित्रपटातील सापांच्या कथा ह्या कपोल कल्पित असल्यामुळे अंधश्रध्दा समाजात पसरवितात. एकंदरीतच मानव क्षणोक्षणी आत्मकेंद्री वृत्तीचे दर्शन घडवत आहेत. सापाविषयी समज व गैरसमज, अंधश्रध्दा व खरी शास्त्रीय माहिती या विषयावर समाजात जाऊन प्रबोधन करून नवीन पिढी समोर ज्ञान समृद्ध आदर्श निर्माण करण्यासाठी नागपंचमी साजरी करणे गरजेचे आहे. सणाच्या निमित्ताने समाजात प्रबोधन करताना प्रामुख्याने साप हा पर्यावरणाचा प्रमुख घटक, त्याच्या विषाचे औषधामधील स्थान, अन्नसाखळीतील महत्त्व; तसेच त्याच्याबद्दल असलेल्या अंधश्रद्धांचे निर्मूलन आदी विषयावर चर्चा करून सापाविषयीचे सर्व गैरसमज दूर केले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवल्यास साप हेच शेतक-यांचे मित्र आहेत. म्हणून नाग व मानव यांची मैत्री व्हावी, स्नेह वृध्दींगत व्हावा. मानवाच्या मनातील भिती नष्ट व्हावी हा उद्देश डोळयासमोर ठेवून नागपंचमीला प्रतिकात्मक नागाची पूजा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. वैज्ञानिक दृष्ट्या समृद्ध असणाऱ्या नागपंचमी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा